सब नंगाशी तर मग पतंजली जिन्स हवी कशाला ?

'संकल्प सिध्दी करून बाबा ज्ञान यज्ञ मांडतात आणि कंडोमचा इतिहास राधीकेला सांगतात !' हे विद्रोही कवी विश्वंभर वराट यांचे शब्द आज शंभर टक्के खरे आहेत. कारण योग ही तथागत बुद्धांची देणं आहे पण ह्याचा बाजार मांडून आपलं दूकान थाटणारा रामदेव बाबा मात्र योग शिबिर असलेल्या ठिकाणी वजनकाट्यात फलका मारून लोकांना माझ्यामुळे लाभ होत आहे असं भासवून जनतेची फसवणूक व पिळवणूक करतो. आता तर हा बाईल्या तिरळ्या आमच्या महिलांच्या साडी चोळीलाच हात घालत असेल तर याचा रांझ्याचा पाटील का करू नये ? म्हणून तर दिग्विजय सिंह यांनी या रामदेव बाबा ला 'ठग' व पैशाची हेराफेरी करणारा असं म्हणल होत.

0 312
सब नंगाशी तर मग पतंजली जिन्स हवी कशाला ?

नवनाथ दत्तात्रय रेपे 

‘भट बोकड मोठा” या पुस्तकाचे लेखक
मो. ९७६४४०८७९४

 

‘संकल्प सिध्दी करून बाबा
ज्ञान यज्ञ मांडतात
आणि कंडोमचा इतिहास
राधीकेला सांगतात !’
हे विद्रोही कवी विश्वंभर वराट यांचे शब्द आज शंभर टक्के खरे आहेत. कारण योग ही तथागत बुद्धांची देणं आहे पण ह्याचा बाजार मांडून आपलं दूकान थाटणारा रामदेव बाबा मात्र योग शिबिर असलेल्या ठिकाणी वजनकाट्यात फलका मारून लोकांना माझ्यामुळे लाभ होत आहे असं भासवून जनतेची फसवणूक व पिळवणूक करतो. आता तर हा बाईल्या तिरळ्या आमच्या महिलांच्या साडी चोळीलाच हात घालत असेल तर याचा रांझ्याचा पाटील का करू नये ? म्हणून तर दिग्विजय सिंह यांनी या रामदेव बाबा ला ‘ठग’ व पैशाची हेराफेरी करणारा असं म्हणल होत. हाच ठग एकदा आंदोलन करत असताना अंदोलनस्थळी मध्यरात्री पोलिसांनी लाठीचार्ज व अश्रूधूर सोडला तेव्हा रामदेवने स्टेजवरून खाली उडी घेतली. एका महीलेची पांढरी सलवार कमीज त्याने घातली पण दाढी लपेना म्हणून ती दुप्पट्यानं झाकून पळायचा प्रयत्न केला. पण या भागूबाई रामदेवला पोलिसांनी ताब्यात घेऊन देहराडूनच्या विमानात कोंबून यानंतर दिल्लीत पाय ठेवायचा नाही अशी तंबी दिली. तो रामदेव देहराडून येते येताच प्रसारमाध्यमांनी त्याच चित्रिकरण केलं तेव्हा तो पांढरा सलवार कमीज घालून महीलेच्या वेशात होता. (वाचा योगी भांडवलदार) महीलांची वस्त्रे परिधान करणारा हा दाढीवाला हेमल्या जेव्हा भर कार्यक्रमात आमच्या महीलांच्या साडीचोळी पर्यंत तिरप्पा डोळा घालतो तेव्हा उपस्थित महीला फीदीफीदी हसतात ही खुप मोठी शोकांतिका आहे. रामदेव व मनुस्मृतीचे समर्थक जर महीलांच्या मानसिकतेची लिटमस टेस्ट करताना आजही आम्ही शांतच का बसणार आहोत ? महीलेची वस्त्रे परिधान करणारा कान्ह्या महीलांना नागडं पाहण्याची इच्छा व्यक्त करतो तेव्हा चित्राताई वाघ कुठे चित्रे काढत बसल्या आहेत हा प्रश्न पडतो. कारण पत्रकार परिषदेत पत्रकारांवर जोरजोरात आकांडतांडव करत व्यक्त होणा-या चित्राताई रामदेव बाबावर व्यक्त होताना कुठेच का दिसत नाहीत ? महीलांनी काही नाही घातलं तरी चांगल्या दिसतात असं म्हणत फिदीफिदी असणारा तिरप्या डोळ्याचा चंदनतस्कर बाबा पजतंली जिन्स विकतो कशाला ? म्हणून म्हणाव वाटत की, ‘सब नंगाशी तर मग पतंजली जिन्स हवी कशाला ?’

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने ठाण्यातील हायलँड भागात पतजंली योगपीठ आणि मुंबई महिला पतंजली योग समितीच्या वतीने शुक्रवारी योग विज्ञान शिबीर आणि महिला संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस व खा. श्रीकांत शिंदेही उपस्थित होते. यावेळी रामदेव बाबा म्हणाला की, महिलांना योगासाठी घातलेले ड्रेस बदलता आले नाही. साड्या नेसायला वेळ नाही मिळाला तरी काही समस्या नाही. आता घरी जाऊन साड्या नेसा. साडी नेसली तरी महिला चांगल्या दिसतात. महिला सलवार सूट मध्येही चांगल्या दिसतात. अमृता फडणवीससारख्याही चांगल्या दिसतात. आणि माझ्या नजरेने पाहिले तर काही नाही घातले तरी त्या चांगल्या दिसतात.’ (न्यूजटाऊन २५ नोव्हें. २२) बाबाचे हे वक्तव्य ऐकूण तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहत नाही. पण दुसरा प्रश्न पडतो की, या कार्यक्रमात रामदेव बाबाने जे वक्तव्य केले ते ऐकून उपस्थित महीलांनी या बाबाचे पायतानाने तोंड का फोडले नसेल ? उपस्थित महीलांना आणि मंचावरील उपस्थित असलेल्या अमृता फडणवीस यांना बाबाचं वक्तव्य चांगलं वाटतं का ? सगळीकडे महीला मुली कपडे घालूनच वावरताना दिसतात मग ह्या दिड डोळ्याचा संन्याशी बाबाने कोणत्या महीलेला नागडं बघितले आहे ? बायकांना उघड नागडं बघितल्यास जर तिरळ्या चंदनचोराला चांगल वाटत असेल तर मग या तळरेंद्र बाहुबलीला नेत्रसुख देण्यासाठी कोणाला कार्यक्रमाचे आयोजक कोणाला नागडं करण्याचा विचार करत आहेत ? ह्या वक्तव्याचा निषेध न करणारे कार्यक्रमाचे आयोजक कोणत्या मनोवृत्तीचे प्रदर्शन देत आहेत ? महीलांनी काहीच न घालल्यास त्या चांगल दिसतात म्हणणा-या ह्या तिरळ्या डोळ्याच्या बाबाने पतंजली जिन्स काय रामदासाच्या लंगोटीवर घालण्यासाठी उत्पादित केली आहे का ? महीलेचा सलवार घालून पृष्ठभागाला पाय लावून पळणा-या ह्या तिरळ्याला महीलांनी नग्न राहणं चांगलं वाटतं असं तो स्वतः म्हणतो तेव्हा कार्यक्रमाचे आयोजक काय हातात बांगड्या घालून बसले होते का ? महीला व मुलींच्या इज्जतीची लक्तरे काढली जात असताना स्टेटरवरील महीला जर गप्प बसत असतील तर या महीला म्हणण्याच्या लायकीच्या आहेत का ?. म्हणून तर विद्रोही कवी विश्वंभर वराट म्हणतात की,
‘साधु वेषातील बहुरूपी आहे
भोगी बाबा ‘हा’रामदेव
नग्न महिलांची आशा करतो
हा तर वाटतो बाबा कामदेव !’

 

हरियाणा राज्यातील सैद अलिपुर येथिल रामदेव बाबा याला त्यांच्या वडीलांनी चोरीच्या प्रकरणावरून बेदम चोप दिला होता तेव्हा त्याने घर सोडलं. त्यानंतर त्याने ९ एप्रिल १९९५ ला शंकर देव यांच्या कडून शिक्षा घेताना आजन्म ब्रह्मचारी राहण्याचं, लग्न न करण्याच, कुटुंबापासून अलिप्त राहण्याच, भौतिक संपदा पासून दूर गरिबीत आणि प्रसिद्ध परांगमुख राहण्याच वचन घेतलं. नंतर या वचनांना तिलांजली देत दिव्य फार्मसीच्या माध्यमातून रामदेव बाबा पोत्यानं पैसा जमा करू लागला पण तो लोकांना वेड्यात काढून. यानंतर ज्या शंकरदेव यांचेकडून दिक्षा घेतली त्यांनाच रामदेवाची माणसं नजर ठेवू लागली. एकदा त्याचा पोटाचे स्नायू गर गर फिरणार प्रकार हा योग प्रकार नाही म्हणत आस्था च्या सीईओ नी प्रक्षेपित केला नव्हता. २००४ -०५ मध्ये ५३ हजार आयकर भरताच रामदेवच्या आश्रमावर धाड पडली तेव्हा तेव्हा टॅक्स डेप्युटी कमिशनर जितेंदर राणा म्हणतात की, अनेक व्यवहार यांनी कागदावरच येऊ दिले नाहीत, दिव्य फार्मसीने २००५ पर्यंत किमान ५ कोटींचा आयकर चोरला. १९९५ ते २००३ पर्यंत ज्या एन पी सिंह (स्वामी योगानंद) यांच्या नावावर दिव्य योग मंदिर ट्रस्टचा परवाना होता तो नुतनीकरणास त्यांनी नकार दिला. त्यानंतर २७ डिसेंबर २००४ रोजी स्वामी योगानंदाचा खून झाला. पुढे दहा महीन्यांनी २५ आक्टोबर २००५ रोजी बी बी जुयाल या तपास अधिकाऱ्यांने अपराधी सापडत नाहीत म्हणून केस बंद केली. (वाचा गाॅडमॅन टु टायकून दी अनटोल्ड स्टोरी ऑफ बाबा रामदेव) असा चोरीचा इतिहास असलेला हा विघ्नसंतोषी महीलांचा अवमान करणारा मनुस्मृतीचा समर्थक कान्ह्या जर तुमच्या घरच्या इभ्रंतीवर घात घालतानाही तुम्ही शांतच बसणार असाल तर तुमचा आणि मनु समर्थक कान्ह्याचा उद्देश वेगळा आहे असं म्हणताच येणार नाही. म्हणून तर विद्रोही कवी विश्वंभर वराट म्हणतात की, 
‘हा बाबा शोभत नाही
की नाही गुरू योगमन
हा तर वस्त्रहरण करणारा
निघाला आधुनिक दुर्योधन !’

 

रामदेव बाबाने शंकरदेव यांच्याकडून घेतलेली दिक्षा व त्यांना दिलेली वचने कशी धाब्यावर बसवली हे जाणून घेण्यासाठी प्रियंका पाठक लिखित ‘गाॅडमॅन टु टायकून दी अनटोल्ड स्टोरी ऑफ बाबा रामदेव’ हे पुस्तक वाचणं महत्वाच आहे कारण त्यात लिहिलं आहे की, रामदेव व बाळकृष्ण जे करतात ते त्यांचे गुरू शंकरदेव व करमवीर यांना आवडत नव्हते. कारण रामदेव बाबा हे घेतलेल्या दिक्षेच पालन करत नव्हते. त्यानंतर रामदेवने ४ फेब्रुवारी २००५ मध्ये ‘पतंजली योगपीठ’ ची स्थापना केली. आस्थाचे किरीट मेहता सांगतात की, ‘रामदेव बाबाला कोणीही रिकाम्या हाताने भेटत नव्हत, कुणी एक लाख तर कोणी दोन लाख देत होतं.’ रामदेवच्या हरिद्वारच्या योगा केंद्राचे आजीवन सदस्य होण्यासाठी अडीच लाख मोजावे लागत होते. रामदेव आपल्या कामगारांना अल्प वेतन देत होता. एकदा त्यांच्या कंपनीने ४६ कामगारांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना जेलबंद केल. काही कामगारांनी दिव्य ची दोन औषध ‘कुलिया भस्म’ आणि ‘योनामृत बाटी’ चे स्मॅम्पल ब्रिन्दा करात यांचेकडे देऊन त्यांना सांगितले की, या उत्पादनात अफगाणिस्तानातून आयात केलेल्या रानमांजराचे विर्योत्पादक ग्रंथीचे अंड तसेच हरणाची शिंगे व मानवी कवट्या औषधांमध्ये नियमित घातल्या जातात. त्या सॅम्पलचा आयुष मंत्रालयाने डिसेंबर २००५ मध्ये दिलेल्या अहवालानुसार त्या औषधांमध्ये मानवी डीएनए सापडल्याच सांगितले.’ मग हे पुस्तक वाचून जर तिरळ्या आणि त्याची उत्पादने विक्री करणा-या स्टोअरला लोकांनीच पेटवून दिले त्याचा दोष कोणाला द्यावा ?.

 

हा तिरळ्या नावाचा भांडवलदार लोकांचे खिस्से कापून गडगंज संपत्तीचा मालक होतोय, पण तो जी उत्पादने विकतोय ती खरंच त्या पात्रतेची आहेत का ? कारण पतंजलीच्या मार्फत विकले जाणारे गायीचे तुप हे गायीचे नसून ते इतर पाळीव प्राण्याचे आहे ? म्हणून तर पंजतलीचे सीईओ पात्रा सांगतात की, ‘ते बकरीच्या, का म्हशीच्या, का जर्शी गाईच्या दुधापासून बनल आहे हे स्वतः रामदेव बाबा सुद्धा सांगू शकणार नाही, कारण वेगवेगळ्या राज्यातल्या दूध संकलन केंद्राकडून ते एकत्रित केलेल असतं. त्यातही रामदेवबाबा सरळ ‘साय’ मागवून त्यापासून तूप बनवतो.’ तसेच पंजतली कंपनीविषयी विदेशी बॅक विश्लेषक आनंद शहा म्हणतात की, कारखान्यांची स्थिती काही चांगली नाही….. मध आणि तूप कारखान्यात स्वच्छता पाळलेली नाही. (योगी भांडवलदार) मग शुद्ध देशी म्हणून विकले जाणारे हे गायीचे तुप नाही हे समजल्यास त्याला जर लोकांनी खिस्सेकापू म्हटले तर त्यांचा दोष काय ? त्यामुळे स्वदेशीच्या नावाखाली भारतीयांची खिस्से कापणारा हा चंदनचोर आमच्या लोकांच्या खिश्यातील पैसे चोरतो कारण आमच्या लोकांच्या डोळ्यात त्याने स्वदेशीची धूळ फेकली आहे. जिथे मध आणि तुप तयार केलं जातं तिथेच जर घाणीचे साम्राज्य असेल तर त्यापासून लोकांच्या आरोग्याचं नुकसान झाल्यास हा तिरळ्या काय दाढीचे केस देणार आहे ? त्यामुळे मानवी कवट्या व काळवीटाची सिंगे मिश्रीत असलेली उत्पादने केव्हा होळी करणार आहोत ?

 

तिरळ्याला जर लोकांना नागडच बघायचं आहे तर मग पतंजली जिन्स काय फक्त उपटायला काढली का ? यापुर्वीही या शेंदरी गोठ्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर व पेरियार रामास्वामी यांचेवर चिखलफेक करून आपण मनुस्मृतीचे समर्थक असल्याचा पुरावा दिला होता. पण आज तर तो आमच्या घरापर्यत येऊन महीलांच्या साडीचोळीला हात लावत असेल तर आता या बाबाचा कायद्याने रांझ्याचा पाटील करायची वेळ आली आहे असं वाटतं. पण ते तेव्हाच शक्य होईल जेव्हा तुम्हाला ह्या तिरळ्याचे काळे कारनामे माहीत करून घेणे आवश्यक आहे. पण आपल्यातील काही उच्चशिक्षित अन् सद्सद्विवेक बुद्धीने कमी असलेले लोक बाबाच्या अंगावर असलेलं शेंदरे वस्त्र बघून त्याचे आणि त्याच्या कारनाम्यांचे समर्थन करतात त्यांना थेट विद्रोही कवी विश्वंभर वराट यांच्याच शब्दात सांगावं वाटतं की, 
शेंदरी रंगाचा दगड दिसला। देव प्रगटला हूल झाली॥१॥
भाव तेथे देव म्हणू लागे थोर। बांधले मंदिर भाविकांनी॥२॥
नवशांना देव झाला की जागृत। लागला अंगात घुमायला॥३॥
म्हणे विश्वंभर नव्हता शेंदूर। वेड्याने ढोपर पुसलेले॥४!!
Leave A Reply

Your email address will not be published.