राष्ट्रवादीचे युवा नेते योगेश साखरे यांचा भारत राष्ट्र समितीमध्ये जाहीर प्रवेश

0 178

राष्ट्रवादीचे युवा नेते योगेश साखरे यांचा भारत राष्ट्र समितीमध्ये जाहीर प्रवेश

 

किल्ले धारूर : शेतकऱ्यांना आपला विकास साधायचा असेल तर कष्टाबरोबर आपल्या कष्टाची जाणीव ठेवणा-या राजकीय पक्षाच्या हाती सत्तेची सुत्रे देण्यासाठी तत्पर असल पाहीजे त्यासाठी भारत राष्ट्र समिती हाच पर्याय शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती निर्माण करेल असे मत योगेश साखरे यांनी व्यक्त केले.

शेतकरी व विकास हा एकमेव मुद्दा केंद्रस्थानी ठेऊन नऊ वर्षाच्या काळात तेलंगणात मुख्यमंत्र्यांनी आमुलाग्र बदल केला. येणा-या २०२४ मधील विधानसभा व लोकसभा निवडणुकीत धर्मांध व घराणेशाही जोपासणा-या पक्षांना हद्दपार करण्यासाठी मतदारांनी भारत राष्ट्र समितीच्या पाठीमागे उभे राहून तेलंगणाप्रमाणे विकास घडविण्यासाठी के. चंद्रशेखर राव यांच्या उमेदवारांना मत दिले पाहीजे असंही त्यांनी सांगितले.

दुष्काळ, शेतकऱ्यांचे प्रश्न, पाणी प्रश्न या बाबतीत बीअआरएस या पक्षाने केलेले कार्य उल्लेखनीय आहे. शेतकरी व विकास हे एकमेव मॉडेल डोळ्यासमोर ठेवत राज्यात पक्षाची वाटचाल सुरू असल्याचे मत योगेश साखरे यांनी मांडले. सामान्य शेतकरी कुटुंबाच्या जीवनात परिवर्तन निर्माण करण्यासाठी माझा लढा सुरूच राहणार असल्याचेही योगेश साखरे यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.