किल्ले धारूर येथिल महाविद्यालयास ‘राजमाता जिजाऊ’ चे नाव द्या संभाजी ब्रिगेडची मागणी

0 152

किल्ले धारूर येथिल महाविद्यालयास ‘राजमाता जिजाऊ’ चे नाव द्या संभाजी ब्रिगेडची मागणी

 

किल्ले धारुर : शहरातील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयास ‘राजमाता जिजाऊ महाविद्यालय हे नाव देण्यात यावे यासाठी मा. श्री .प्राचार्य गोपाळराव काकडे यांना निवेदनाद्वारे संभाजी ब्रिगेड किल्ले धारूर तालुक्याच्या वतीने मागणी करण्यात आली आहे.
मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाने किल्ले धारूर सारख्या ग्रामीण भागात उच्च शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिलेली असून किल्ले धारुर शहरातील सर्व समाजाची मुले व मुली यांनी या महाविद्यालयात शिक्षण घेतलेले आहे व घेत आहेत. किल्ले धारुर शहरातील मंडळाच्या महाविद्यालयास कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय असे नाव आहे. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या सर्व शाळा महाविद्यालयांना समाजसुधारकांची, राजे महाराज, गड किल्ल्यांची व इतर मान्यवरांची नावे दिलेली आहेत परंतु अद्याप प्राचार्य काकडे यांना माजी विद्यार्थ्यांनी मागणी करुनही नाव दिलेले नाही. या महाविद्यालयास माजी विद्यार्थ्यांनी यापुर्वीही किल्ले धारुर शहरातील आपल्या मंडळाच्या महाविद्यालयाचे नामकरण “राजमाता जिजाऊ महाविद्यालय” असे करावे या संदर्भात माजी विद्यार्थ्यांनी २०१६ ते २०१८ या कालावधीत व २०२३ मध्ये माजी विद्यार्थी, सामाजिक संघटना यांनी निवेदनाद्वारे मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, सचिव व प्राचार्य यांना प्रत्यक्ष भेटून मागणी केलेली आहे.
महाविद्यालयाचे विविध क्षेत्रात विद्यार्थी कार्यरत असून या महाविद्यालयाची प्रेरणा येणाऱ्या काळात नवीन पिढीच्या मनात राहावी यासाठी या महाविद्यालयाचे नामकरण “राजमाता जिजाऊ महाविद्यालय” या नावाने करण्यात यावे. आजपर्यंत या महाविद्यालयाने उत्तम दर्जाचे शिक्षण देत डॉक्टर, इंजिनिअर, शिक्षक, वकील, व्यापारी, उद्योजक, देशाच्या सैनिक दलात, पोलिस विभागात, महसूल विभागात व अन्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे अनेक विद्यार्थी घडवले आहेत.
किल्ले धारुर शहरातील नागरिकांनी व माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचा विकास करण्यात खारीचा वाटा उचलला आहे. देशातील ऐतिहासिक समाजसुधारक व राजे महाराज यांचा इतिहास पाहिल्यास ‘राजामाता जिजाऊ’ यांचे कार्य महान व अभिमानास्पद आहे, त्यामुळे महाविद्यालयास “राजमाता जिजाऊ महाविद्यालय” हे प्रेरणादायी नाव दिल्यास या महाविद्यालयाचे विद्यार्थी असल्याचा अभिमान वाटणार आहे. महाविद्यालयाचे नावांबाबत आपण इतर नावांचा विचार करु नये कारण ऐतिहासिक महादुर्ग किल्ला असलेल्या भुमीत राजमाता जिजाऊ यांच्या नावाने या महाविद्यालयास नाव शोभून दिसणार आहे.
संस्थेच  अध्यक्ष, सचिव व प्राचार्य यांनी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे नाव बदलून लवकरात लवकर “राजमाता जिजाऊ महाविद्यालय” नाव द्यावे अशी विनंती संभाजी ब्रिगेड धारूर तालुक्याच्या वतीने करण्यात आली. यावेळी संभाजी ब्रिगेड चे धारूर तालुका अध्यक्ष रमेश मोरे, दादासाहेब चव्हाण, पवन निक्ते,जनक फुन्ने, कुलदीप सौंदरमल हे उपस्थित होते.
संभाजी ब्रिगेड चे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.