भारतीय बेरोजगार मोर्चा तर्फे बेरोजगार जोडो यात्रा संपन्न

0 48

भारतीय बेरोजगार मोर्चा तर्फे बेरोजगार जोडो यात्रा संपन्न

 

जळगाव : आज दि.१५/०५/२०२३ रोजी भारतीय बेरोजगार मोर्चा तर्फे बेरोजगार जोडो यात्रा रॅली चे आयोजन करण्यात आले होते सदर यात्रा ही छत्रपति शिवाजी महाराज यांच्या पुतळा ते जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय याठिकाणी सकाळी १० ते १२ वेळेत काढण्यात आली यानंतर यात्रेचे रूपांतर प्रबोधन सभे मधे झाले.रॅली चे नेतृत्व मा. सिद्धांत मौर्य (राष्ट्रीय प्रचारक भा.बे.मो.) व गायकवाड सर यांनी केले.
बेरोजगार जोडो यात्रा का काढण्यात आली. तर स्वतंत्र भारतात बेरोजगारी खुप झपाट्याने वाढत आहे सहकारी क्षेत्रात लोकसंख्येनुसार रोजगार उपलब्ध नाही,भारतात कमीत कमी ४० कोटी युवा बेरोजगार युवाचा हाताला काम नाही,प्रति दिवसाला ३८ सुशिक्षित बेरोजगारांना आत्महत्येचा मार्ग नाईलाजाने अवलंबिला आहे तसेच भारतात सहकारी क्षेत्राचे खाजगीकरण करून नोकऱ्या संपवली जात आहे अश्या असंख्य प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी बेरोजगार जोडो यात्रेचे आयोजन केले होते.

भारतीय बेरोजगार मोर्चाच्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले त्यात जो पर्यंत रोजगार उपलब्ध होत नाही तोपर्यंत केंद्र व राज्य सरकार अनुक्रमे ६०-४० अनुपात बेरोजगारी भत्ता देण्यात यावा. प्रत्येक सहकारी क्षेत्रात लोकसख्येनुसार रोजगार उपलब्ध करावा. प्रत्येक क्षेत्रात रिक्त असलेली पदे तात्काळ भरण्यात यावी. सरकारी भरतीचे फॉर्म चे परीक्षा शुक्ल १००/- रू पेक्षा जास्त नसावे. जे युवक युवती नोकर भरतीची परीक्षा देण्यासाठी बाहेरगावी जातात त्यांचा येण्या जाण्याचा खर्च संबंधित राज्य सरकारने करावा. १०वी, १२वी व Graduate युवक युवतींना त्यांच्या योग्यतेनुसार ५ वर्षाच्या आत रोजगार उपलब्ध करून देण्यात यावे या मागण्या आहेत.

यावेळी उपस्थित सुमित्र अहिरे सर (राज्य सहस्योजक बहुजन क्रांती मोर्चा), भगवान कांबळे (जिल्हाधक्ष्य असंघटित कामगार क्षेत्र),देवानंद निकम जिल्हाध्यक्ष भारत मुक्ति मोर्चा),विजय सुरवाडे(जिल्हा कार्याधक्ष्य बहुजन मुक्ती पार्टी),सुनील देहदे (शहर संयोजक बहुजन क्रांती मोर्चा)राहुल सोनावणे (कोषद्धक्ष्य भारत मुक्ती मोर्चा)खुशाल सोनावणे,इरफान शेख,गोकुळ चव्हाण,राकेश गायकवाड,कुंदन तायडे,सम्यक तायडे,प्रथमेश महाले,पंकज तायडे,संतोष पावरा,सेवालाल पावरा,हृषिकेश सुरवाडे शितल ताई नंन्वरे, सखुबाई धनगर, जनाबाई सोनवणे, संगिता देहडे, सुनिता पवार, संध्या कोचूरे, मनिषा साबणे, कल्पना सपकाळे, वंदनाताई तायडेप्रतिभाताई, शितल सोनवणे, धर्मराज सपकाळे, सिध्दार्थ तायडे, आदित्य देहडे, रोहित सोनवणे, आकाश कदम, धम्मारत्न इंदवे,प्रभाकर साबणे तसेच समस्त जिल्हा भरातून विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते या यात्रेत सामील झाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.