आता पंचनामे करायला नका, मैतालाच या

0 135

आता पंचनामे करायला नका, मैतालाच या

 

बीड : अवकाळी पावसासह गारपिटीने जिल्हाभरात चांगलेच झोडपले आहे. फळबागा आणि शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे  बीडच्या काही भागांमध्ये शेतकऱ्यांची जनावरेही दगावली आहेत. मात्र, शासनाकडून अपेक्षित प्रतिसाद आणि मदत न मिळाल्यामुळे अनेक शेतकरी हवालदिल झाले आहेत. आता पंचनामे करण्यासाठी नको तर मैतासाठी या, अशी प्रतिक्रिया एका शेतकऱ्याने दिली.

या अवकाळी पावसामुळे फळबागासह पालेभाज्या त्यात  पालक, टोमॅटो, कांदा सोबत ऊस देखील पूर्णपणे जमीन दोस्त झाला आहे. बीड जिल्ह्यातील अनेक रस्ते आपण हिमालयात आलोत की काय असा देखील प्रकार या अतिवृष्टीने पाहायला मिळाला. या पावसात आष्टी असेल पाटोदा केज त्यासोबत जिल्ह्यातील अनेक तालुक्यात या गारपिटीने हाहाकार माजला.

या शेतकऱ्यांना पंचनामे लवकरात लवकर करणे देखील गरजेचे आहे. प्रसंग सांगताना शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येत होतं. हे नुकसान कसं भरून निघणार या शेतकऱ्यांना सरकार कसा न्याय देणार हे  पाहणे गरजेचे आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.