शिळामंदिराच्या निमित्तानं अनगडशा फकिरबाबाचे अदृश्य रट्टे आठवले भावांनो ! लै लै लै नादखुळा किस्सा हाय

0 242

शिळामंदिराच्या निमित्तानं अनगडशा फकिरबाबाचे अदृश्य रट्टे आठवले भावांनो ! लै लै लै नादखुळा किस्सा हाय

किरण माने (अभिनेते)

 

…”तुक्या, तुझ्या अभंगात वेदांचे अर्थ आहेत. तू खालच्या जातीचा असल्यामुळे तुला ते बोलण्याचा अधिकार नाही. तुझ्यासारख्या शुद्राच्या ब्राह्मण लोकही पाया पडतात हे शास्त्रविरूद्ध आहे.” असं म्हणत रामेश्वर भटानं गाथा इंद्रायणी नदीत बुडवण्याची शिक्षा दिली.

…गाथा बुडवताच तुकोबारायांचे निंदक, जातवर्चस्ववादी शत्रू आनंदानं नाचू लागले. ट्रोलिंग करू लागले,”आधी समाजसेवेसाठी गहाणखतं बुडवलीस..आता गाथा गेली. बस बोंबलत. जीव दे.” असं तोंडावर म्हनायला लागले… दूसर्‍याचं वाईट झालं, पोटापाण्यावर गदा आली, तो आयुष्यातनं उठला, की अशा कारस्थानी जमातीला लै अवसान येतं.

…पन आपला तुकोबाराया खराखुरा लोकप्रिय सेलिब्रिटी होता. गाथा पाण्यात बुडवावी लागली म्हनून सगळा मराठी मुलूख दु:खी झाला. तुकोबाराया अन्नपानी सोडून, दु:खी होऊन एका खडकावर बसून राहीले आहेत, हे कळताच चारीबाजूंकडून मैलोनमैल चालत भाविक,वारकरी त्यांच्या ‘सपोर्ट’साठी येऊ लागले. आजकाल ‘हॅशटॅग आय सपोर्ट’ वाली मोहीम असते ना, तसंच होऊ लागलं !

…हा सपोर्ट पाहून वाघोलीला बसलेल्या रामेश्वर भटाच्या पायाखालची जमीन सरकली. तो वाघोलीहून पुण्याला नागनाथाच्या दर्शनाला यायला निघाला. वाटेत अनगडशा बाबाची विहीर लागली. रामेश्वर भट तिथं अंघोळीसाठी थांबला. विहीरीचा मालक अनगडशा फकीर कलंदर अवलीया होता. जो मुसलमान असूनही तुकोबांचा चाहता होता. आजबी तुम्ही देहूला गेलात तर चौदा टाळकर्‍यांची कमान हाय. त्यात उजव्या बाजूला सगळ्यात वर अनगडशा फकिरांची मूर्ती हाय. रामेश्वरभटाला रस्त्यात लागलेली ती विहीर आनि अनगडशाचा तक्क्या गूळ आळीला आजबी हाय.

…तर असा एक ‘चमत्कार’ सांगीतला जातो की, त्या विहीरीत अंघोळ केल्यावर रामेश्वरभटाच्या पाठीचा असह्य असा दाह झाला.. आगआग झाली पाठीची. अक्षरश: तो लोळू लागला.. शेवटी दाह शमावा म्हनून रामेश्वर भट तुकोबारायांच्या चरणाशी आला.. तुकोबारायांची माफी मागीतली !

…आपन विवेकी विचारसरनीचे आहोत मित्रांनो. प्रत्येक गोष्टीमागं ‘लाॅजिक’ असतं. बिनबुडाचे ‘चमत्कार’ वगैरे होत नसतात. तुकारामांची गाथा बुडवनार्‍या रामेश्वर भटाच्या पाठीचा दाह असा अचानक, उगीचंच झाला आसंल का वो? अनगडशाबाबा फकीर हा तुकोबांचा अतिशय अतरंगी भक्त मानला जातो. त्यानंच बहुदा महोदयांची पाठ सडकून काढली असावी. एकीकडे चोहोबाजूंनी तुकोबांना मिळनारा सपोर्ट आनि दूसरीकडे अशी पाठ सोलवटून निघनं याचा एकत्रित परीनाम झाला… रामेश्वर भट ताळ्यावर आला. त्यानं माफी मागून तुकोबाचरनी आश्रय घेतला.

…अलिकडं देहूत असे अनेक रामेश्वर भट तुकोबाचरनी आपली सेवा रूजू करायला आलेले बघून काळीज सुपाएवढं होतं. आजबी तुकोबा आनि अनगडशा फकीर एक झाले, तर अनेक कारस्थान्यांच्या पार्श्वभागाचा दाह होऊ शकतो आनि ते सूतासारखे सरळ होऊ शकतात, याची खात्री पटली !

ठ्ठलइठ्ठलइठ्ठलइठ्ठलइठ्ठलइठ्ठलइठ्ठल

Leave A Reply

Your email address will not be published.