राजर्षी शाहू महाराज वेदोक्त प्रकरण व मराठा आरक्षण 

0 278

राजर्षी शाहू महाराज वेदोक्त प्रकरण व मराठा आरक्षण 

 

दिपक इंगळे

राष्ट्रीय किसान मोर्चा

 

१९१८ ला साऊथ ब्युरो कमिशन भारतात आले.
कशासाठी आले ?

१८८५ ला जी काँग्रेस स्थापन करण्यात आली होती , त्या काँग्रेसच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी . काय होती काँग्रेसची मागणी ?

” इंग्रजांच्या शासन-प्रशासनात आम्हाला ( 👶 युरेशियन ब्राह्मणांना ) भागीदारी / हिस्सेदारी / वाटा अर्थात आरक्षण द्या . ‘

त्यावेळी काँग्रेससोबत आणखी काही लोकांनी इंग्रजांच्या शासन प्रशासनात प्रतिनिधित्वाची मागणी केली होती . कोणत्या लोकांनी ?

1⃣ मा.भास्करराव जाधव ( मराठा – कुणबी )
मागणी:- मराठा-कुणबी-ओबीसी साठी प्रतिनिधित्व .

2⃣ डॉ.बी.आर.आंबेडकर
मागणी:- अस्पृश्यांसाठी प्रतिनिधित्व

3⃣ बॅ.मोहम्मदअली जिना – बॅरिस्टर
मागणी:- मुसलमानांसाठी प्रतिनिधित्व

भास्करराव_जाधव ही साधारण व्यक्ती नव्हती . त्यावेळी मॅट्रिकला ते मुंबई इलाख्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले होते व बी.ए.ला मुंबई विद्यापीठात फर्स्ट क्लास होते .

मराठा-कुणब्याचं पोरगं एवढं शिकलं म्हणून महाराजांनी हत्तीवरुन साखर वाटली होती .

पुढे ते एम.ए. झाले व एल.एल.बी.परीक्षेची तयारी करीत असताना राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना बोलावून घेतले व दि.1⃣ जून.1⃣8⃣9⃣5⃣ रोजी दीडशे रुपये पगारावर सहाय्यक सरसुभे म्हणून त्यांची संस्थानमध्ये नेमणूक करण्यात आली व पुढील शिक्षणाकरिताही त्यांना मदत केली.

त्यावेळचे सहाय्यक सरसुभे म्हणजे आजचा कलेक्टर अर्थात .जिल्हाधिकारी होय .

#काँग्रेस सर्वांसाठी प्रतिनिधित्वाची मागणी करीत होती तर मग या तिघांनी वेगळी मागणी का केली ?

कारण या तिघांचाही काँग्रेसवर #विश्वास नव्हता .

कारण ;

काँग्रेसची मागणी ही केवळ युरेशियन ब्राह्मणांसाठी होती.

काँग्रेसची स्थापना – गोखले , आगरकर , टिळक ,चटर्जी , मुखर्जी , बॅनर्जी ….. ब्राह्मणांनी केली होती .

( नाव मात्र सर अॅलन ह्युमचे पुढे करण्यात आले होते.)

# म्हणून काँग्रेस हा केवळ आणि केवळ ब्राह्मणांचा पक्ष आहे. #ब्राह्मणांचा_सर्वात_मोठा_पक्ष_काँग्रेस_आहे . ही सर्वात मोठी एक नंबरची ब्राह्मणवादी पार्टी आहे .

म्हणून तर ब्राह्मणेतरांना त्या पक्षात #घरगड्यासारखे राबावे लागते .

मा.भास्करराव जाधव ,डॉ.बी.आर.आंबेडकर आणि बॅ.जिना या तिघांनाही हे पक्के माहीत होते की,काँग्रेसची प्रतिनिधित्वाची मागणी ही केवळ #युरेशियन_ब्राह्मणांसाठीच होती . म्हणून वरील तिघांनी वेगळ्या प्रतिनिधित्वाची मागणी इंग्रज सरकारकडे केली .

🔹 मराठा-कुणबी-ओबीसी,अस्पृश्य व मुसलमान या तिघांचाही काँग्रेसवर विश्वास नव्हता आणि हेच लोक सध्या काँग्रेसला हात देतात,मदत करतात,वाढवितात व स्वत : ची गुलामी पक्की करतात ,

” We are not only slaves but we are enjoying slavery ”

” आम्ही केवळ गुलाम नाही आहोत तर गुलामीत आनंद मानणारे लोक आहोत . ”

🔹ज्यावेळी मा.भास्करराव जाधव व डॉ.बी.आर.आंबेडकरांनी वेगळी प्रतिनिधित्वाची मागणी केली,तेंव्हा #बाळ गंगाधर टिळकांच्या लक्षात आले की,वरील दोघांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या सांगण्यावरून वेगळी प्रतिनिधित्वाची मागणी केली आहे .

तेंव्हा बाळ गंगाधर टिळकांनी वरील दोघांच्या मागणीला विरोध करायचे ठरविले.परंतु विरोध कसा व कोठे करायचा ?

कारण कोल्हापूरमध्ये जाऊन राजर्षी छत्रपती शाहू महाराजाना विरोध करायचा म्हटले ; तर राजर्षी छत्रपती शाहू महाराज पहिलवान होते,हे टिळक जाणून होते .

त्यामुळे टिळकांनी ही रिस्क घेतली नाही,परंतु विरोध तर करायचा , प्रतिक्रिया तर द्यायची ……

🔹 मग टिळक कोल्हापूर आणि बेळगावच्या मध्यवर्ती ठिकाणी अथणी नावाचे गाव आहे,जेथे इंग्रजांचे थेट प्रशासन होते , त्या अथणीत जाऊन टिळकांनी सभा घ्यायचे ठरविले .

त्यानुसार दि.1⃣24⃣ फेब्रुवारी १९१८ ला त्यांनी अथणीत जाहीर सभा घेतली ,

व त्या जाहीर सभेत टिळक म्हणाले “तेली तांबोळी आणि कुणबटांनी विधिमंडळात जाऊन काय नांगर हाकायचा आहे ?

कुणबी ही जात आहे व #कुणबट ही अत्यंत द्वेषाने चिडून दिलेली शिवी आहे .

बाळ गंगाधर टिळकांनी अथणीच्या जाहीर सभेत समस्त मराठ्यांना “ कुणबट ” अशी शिवी दिली व समस्त मराठ्यांचा अपमान केला.

तरीही आपण मराठा-कुणबी-ओबीसी त्यांना लोकमान्य म्हणतात . खरे तर भटमान्य किंवा #ब्राह्मणमान्य म्हणायला हरकत नाही .

🔹टिळक तेली-तांबोळी आणि कुणबी बांधवांना विधिमंडळात जाऊ द्यायला तयार नव्हते तरी सुद्धा ब्राह्मण बनिया प्रचार प्रसार माध्यमांनी टिळकांना ” तेल्या तांबोळ्याचे पुढारी ” आणि “लोकमान्य” पदव्या देऊन गौरव केला .

खरे तर टिळक ब्राह्मण सोडून कोणालाच मान्य नव्हते व टिळकांनाही ब्राह्मणेत्तर मान्य नव्हते .

मग टिळक ” लोकमान्य ” कसे ?

यावर मूलनिवासी बहुजनातील #मराठा बांधवातील शिकलेल्यांनी जरूर विचार करावा .

आश्चर्य म्हणजे मराठा-कुणबी-ओबीसी,अस्पृश्य,आदिवासी आणि मुसलमान टिळकांना ” लोकमान्य ” म्हणतात आणि टिळक बहुजनापैकी कोणालाच विधिमंडळात जाऊ देऊ इच्छित नव्हते आणि कोणी जाण्याचा प्रयत्न केला तर त्यांना शिवी देवून विरोध करीत होते .

🔹 आपल्या मूलनिवासी बहुजन समाजातील बालवाडी ते Ph.D च्या मुलांना टिळकांची कोणती वाक्ये माहीत आहेत ?

” मी शेंगा खाल्ल्या नाहीत.मी टरफले उचलणार नाही.”

” स्वराज्य हा माझा जन्म सिद्ध अधिकार आहे आणि तो मिळविणारच . ”

” सरकारचे ( इंग्रज ) डोके ठिकाणावर आहे काय ? ” वगैरे-वगैेरे

परंतु – ” तेली,तांबोळी आणि कुणबटांनी विधिमंडळात जाऊन काय नांगर धरायचा आहे ? ” हे वाक्य मात्र माहीत नाही .

कारण ते अभ्यासक्रमातून शिकविलेच जात नाही. म्हणून आपल्या सर्व समस्यांच्या मुळाशी युरेशियन ब्राह्मणांनी तयार केलेला #खोटा_अभ्यासक्रम आहे .

जसे टिळक अथणीला म्हणाले की,” तेली,तांबोळी आणि कुणबटांनी विधिमंडळात जाऊन नांगर हाकायचा आहे काय ? ” असेच ते सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर या ठिकाणीही जाहीर सभेत बोलले .

🔹सदर सभेला #राष्ट्रसंत_गाडगेबाबा उपस्थित होते . टिळकांना तेली-तांबोळी-कुणबी बांधवांचा एवढा #राग , एवढा #तिरस्कार होता की , त्यांनी तो राग व तिरस्कार पुन्हा दुसऱ्यांदा पंढपूरच्या सभेत व्यक्त केला .

आणि आम्ही मराठा-कुणबी-ओबीसी लोक,अगदी शिकले – सवरलेले विचारवंत सुद्धा त्यांना लोकमान्य म्हणतो व त्यांच्या स्वातंत्र्याच्या योगदानाचे कौतुक करतो .

तर सदर सभेला राष्ट्रसंत गाडगेबाबा उपस्थित होते . हे टिळकांनी स्टेजवरून पाहिले व म्हणाले , “ गाडगे महाराज , आम्हाला मार्गदर्शन करा . ” अशी विनंती केली .एवढ्या लोकांत विनंती केल्यामुळे राष्ट्रसंत गाडगेबाबांना नाही म्हणता आले नाही.

ते स्टेजवर गेले,माईक हातात घेतला व म्हणाले ,

” टिळक महाराज , म्या चुकलो , म्या परीट , म्या धोबी , पिढ्यानपिढ्या तुमची मळलेली कपडे #धुवायचे माझे काम , म्या मार्गदर्शन कसा करू ?”

🔹राष्ट्रसंत गाडगे बाबांनी वरील प्रश्न विचारून #टिळकांच्या_तोंडात_सणसणीत_बाटाचा_बूट_मारला . परंतु मूलनिवासी बहुजन समाजातील लोकांना वरील गोष्ट माहीतच होऊ दिली नाही . बरील गोष्टीला अभ्यासक्रमातून वगळण्यात आले .

राष्ट्रसंत गाडगे बाबांनी टिळकांच्या शिवीला सणसणीत उत्तर दिले . कसे ? कारण टिळक म्हणायचे , ” तेली , तांबोळी आणि कुणबटांनी विधिमंडळात जाऊन काय नांगर हाकायचा आहे ? ”

याचा अर्थ टिळक-ब्राह्मणेतर लोकांनी #मनुस्मृतीने नेमून दिलेली जातवार कामेच करावीत , असा जाहीर सभेत दम देऊन आदेश देतात .

म्हणून गाडगेबाबा त्यांना म्हणाले,” मी,तर परीट, मी तर घोबी . माझे काम तुमची मळलेली कपडे धुणे हे आहे . मार्गदर्शन करणे माझ्या जातीचे काम नाही . मग मी मार्गदर्शन कसा करू? ”

🔹कोणत्याही शाळेत , कोणतेही शिक्षण न घेतलेल्या राष्ट्रसंत गाडगेबाबांना शिकलेल्या टिळकांचे स्वातंत्र्याचे आंदोलन कळत होते आणि आजच्या Ph.D वाल्यांना ते कळत नाही , कारण अभ्यासक्रम .

एवढेच नव्हे तर पुढे गाडगेबाबांनी टिळकाला एक विनंती केल, ” टिळक महाराज , कायबी करा पण आम्हाला बामण करा. ”

हा दुसरा बाटाचा बूट राष्ट्रसंत गाडगेबाबांनी टिळकांच्या तोंडात मारला . राष्ट्रसंत गाडगेबाबा असे का म्हणाले ?
कारण टिळकाच्या शिवीचा मतितार्थ असा होता की , ब्राह्मण सोडून कोणीही विधिमंडळात जाऊ नये.

म्हणून राष्ट्रसंत गाडगे महाराज त्यांना म्हणाले की,आम्हाला विधिमंडळात जायचे आहे परंतु आम्ही बामण नाही . आणि तुम्ही म्हणता की बामण सोडून बाकीच्यांनी म्हणजे ब्राह्मणेतरांनी विधिमंडळात जायचे नाही . म्हणून आम्हाला बामण करा . ”

म्हणून असे नाईलाजाने म्हणावे लागते की कोणत्याही विद्यापीठातून कोणतीही Degree न घेता , गाडगेबाबांना टिळकांचे स्वातंत्र्याचे आंदोलन कळत होते आणि आज आपल्यातील उच्चशिक्षितांना ते समजत नाही ,कारण अभ्यासक्रम ,

🔹याचा अर्थ टिळकाचे स्वराज्याचे आंदोलन हे केवळ युरेशियन ब्राह्मणांसाठी होते.त्यालाच ते Home Rule चळवळ म्हणायचे तर असे होते बाळ गंगाधर टिळकांचे स्वराज्याचे आंदोलन .

थोडक्यात टिळक केवळ त्यांच्या जाती बांधवांसाठी अर्थात युरेशियन ब्राह्मणांसाठी इंग्रजांच्या शासन-प्रशासनात प्रतिनिधित्व मागत होते आणि दुसऱ्या कोणी म्हणजे ब्राह्मणेतरांनी त्या फंदात पडू नये म्हणजे प्रतिनिधित्वाची मागणी करु नये , असे त्यांना वाटत होते व जर कोणी ब्राह्मणेतरांनी प्रतिनिधित्वाची मागणी केलीच तर त्यांना जाहीर सभेत जातवार शिवी देऊन विरोध करीत होते .

म्हणून भारतात स्वातंत्र्याची दोन आंदोलने होती.

युरेशियन ब्राह्मणांचे -कशासाठी ?
इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त होण्यासाठी आणि

मूलनिवासी महापुरुषांचे आंदोलन – कशासाठी ? युरेशियन ब्राह्मणांच्या अर्थात वर्णव्यवस्था,अस्पृश्यता व जातीव्यवस्था यातून मुक्त होण्याचे.

आपल्या लोकांना एकच आंदोलन माहीत झाले.कोणते ? युरेशियन ब्राह्मणांच्या स्वातंत्र्याचे.आपल्या मूलनिवासी महापुरुषांच्या स्वातंत्र्याचे आंदोलन माहीतच झाले नाही कारण अभ्यासक्रम.

🔹कुळवाडीभुषण , बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज , राष्ट्रसंत तुकाराम महाराज व सर्वच मूलनिवासी संत , राष्ट्रपिता जोतिराव फुले , राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले , राजमाता अहिल्यामाई होळकर , राजर्षी छत्रपती शाहू महाराज , ई . व्ही . पेरियार , राष्ट्रसंत गाडगे महाराज , विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर , कर्मवीर भाऊराव पाटील , साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे … या सर्व मूलनिवासी महापुरुषांचे स्वातंत्र्याचे आंदोलन वेगळे होते .
ते युरेशियन ब्राह्मणांच्या गुलामीतून मुक्त होण्याचे होते .

आणि टिळक,आगरकर,गोखले,रानडे,गांधी,नेहरु यांचे स्वातंत्र्याचे आंदोलन वेगळे होते . ते इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त होण्याचे होते .

🔹प्रतिनिधित्व हा लोकशाहीचा आत्मा आहे, प्राण आहे. लोकशाहीतून प्रतिनिधित्व हा आत्मा,प्राण वजा केले तर बाकी शून्य राहील .

आज भारतातील लोकशाही प्रतिनिधित्वहीन लोकशाही आहे . खरे तर ती लोकशाही नसून ब्राम्हणशाही आहे, पेशवाई आहे .

हा सर्व प्रताप ” पुणे-कराराचा ” आहे आणि पुणे करार हा मोहनदास करमचंद गांधीमुळे झाला .

याचा अर्थ लोकशाही प्रतिनिधित्वहीन होण्यास केवळ मोहनदास करमचंद गांधीच जबाबदार आहेत.

हे सर्व Real Representatives संसदेत व विधान सभेत न गेल्यामुळे झाले आहे आणि Real Representatives अर्थात खरे-खुरे प्रतिनिधी विधिमंडळात किंवा संसदेत जाऊ नयेत , हाच खरा पुणे-कराराचा उद्देश आहे.

त्यामुळेच डॉ.आंबेडकर पुणे-करार झाला तर ….. मला समोरच्या विजेच्या खांबाला फाशी दिली तरी चालेल .

परंतु मी पुणे करारावर सही करणार नाही असे म्हणाले होते व गांधी,पुणे करार झाला नाही तर मी जीव देईन असे म्हणाले होते .

याचा अर्थ डॉ.आंबेडकर पुणे करार होऊ नये म्हणून फासावर जायला तयार होते व गांधी पुणे करार झाला नाही , तर मरायला तयार होते. यावरून पुणे-करार किती महाभयंकर आहे , हे वाचकांच्या लक्षात येईल .

डॉ.आंबेडकर पुणे-करारास तयार नव्हते,कारण त्यांना संसदेत खरे खुरे प्रतिनिधी Real Representatives पाठवायचे होते आणि गांधी पुणे-करार का करू इच्छित होते ? कारण त्यांना सवर्णांच्या दयेवर जगणारे ( दलाल – भडवे – पिट्ट गद्दार – मुकी जनावरे- शेपटी हलविणारी कुत्री- पाय चाटणारे- पायाचे तळवे चाटणारे लाळ गाळणारे- केवळ जांभई देणारे ….. हे सर्व शब्द डॉ . आंबेडकरांनी वापरले आहेत . ) संसदेत पाठवायचे होते .

याचा अर्थ डॉ.आंबेडकर एससी,एसटी,ओबीसी व यातून धर्मपरिवर्तीत आणि महिला यांना अर्थात मूलनिवासी लोकांना राज्यकर्ती , शासनकर्ती जमात बनवू इच्छित होते .

व गांधी केवळ ब्राह्मण-क्षत्रिय-वैश्य ( बनिया ) यांना अर्थात विदेशी युरेशियन लोकांना शासनकर्ती जमात बनवू इच्छित होते . हा या दोघांतील खरा संघर्ष होता आणि आपापले उद्धिष्ट साध्य करण्यासाठी दोघेही जीव द्यायला तयार होते .

🔹 सारांश- राजर्षी शाहू महाराज आणि डॉ.आंबेडकर मूलनिवासी लोकांना युरेशियन ब्राह्मणांच्या आणि गांधीच्या गुलामीतून मुक्त करु इच्छित होते . गांधी पुन्हा आम्हाला वर्णव्यवस्थेचे गुलाम बनवू इच्छित होते .

पुणे करार , एससीला प्रत्यक्षपणे लागू आहे . हा पुणे-करार एसटीची मागणी नसताना एसटी वर थोपलेला आहे आणि मराठा-कुणबी-ओबीसींना हा पुणे करार अप्रत्यक्षपणे पक्षपातळीवर लागू केला आहे.

तसेच हा पुणे-करार धर्मपरिवर्तित लोकांना देखील पार्टी स्तरावरती लागू केला आहे आणि आता पंचायतराज मध्ये महिलांनाही लागू केला आहे . थोडक्यात हा पुणे-करार आज सर्व ब्राह्मणेत्तरांसाठी लागू आहे.

याचा अर्थ ब्राह्मणेतरांचे खरे-खुरे प्रतिनिधी,लढणारे-झगडणारे प्रतिनिधी,लोकहिताचे कायदे करणारे प्रतिनिधी , समाजाबद्दल खरी-खुरी कळकळ आणि तळमळ असणारे प्रतिनिधी लोकांच्या तक्रारी , लोकांची गाऱ्हाणी मांडणारे प्रतिनिधी , लोकांच्या हिताचे , कल्याणाचे कायदे करणारे प्रतिनिधी , संसदेत व विधिमंडळात जाऊ नयेत हाच पुणे कराराचा खरा हेतू आहे .

म्हणून तर बाबासाहेब मला समोरच्या खांबाला फाशी द्या परंतु मी पुणे – करारावर सही करणार नाही असे म्हणाले होते .

🔹जर , मराठा- कुणबी – ओबीसी , एससी , एसटी व यातून धर्मपरिवर्तित आणि महिलांचे खरे-खुरे प्रतिनिधी आज निवडून गेले असते तर

मराठा-कुणबी-ओबीसी बांधवांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळाले असते .

एससीचा कोटा पूर्ण केला असता,त्यांच्यावर अन्याय अत्याचार झाले नसते.

एसटीच्या जमिनी सरकारने जबरदस्तीने व्यापाऱ्यांना दिल्या नसत्या

ओबीसी व भटक्या-विमुक्तांची जातवार जनगणना झाली असती .

5⃣ भटक्या-विमुक्तांना रेणके आयोग लागू झाला असता.

6⃣ मुसलमान बांधवांसाठी सच्चर कमिशन लागू झाले असते.

7⃣ महिलांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात जातवार प्रतिनिधित्व मिळाले असते .

8⃣ एल.पी.जी. व सेझला विरोध झाला असता .

9⃣ उच्च व व्यावसायिक शिक्षणाचे #खाजगीकरण झाले नसते .

🔟 किरकोळ व्यापाराचे मॉलमध्ये रूपांतर झाले नसते.

1⃣1⃣ प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाचा बट्याबोळ झाला नसता.

1⃣2⃣ देशात भ्रष्टाचार वाढला नसता.

1⃣3⃣ १२१ करोडपैकी ८३ करोड लोक भूकबळीच्या शिखरावर पोहचले नसते . ..वगैर – वगैरे

म्हणून तर राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी मा.भास्करराव जाधव व डॉ.आंबेडकर यांना इंग्रजांना वेगळे प्रतिनिधित्व मागण्याचा सल्ला दिला होता आणि मा.भास्करराव
जाधव व डॉ.आंबेडकरांच्या वेगळ्या प्रतिनिधित्वाला बाळ गंगाधर टिळकाने सभेत रागाने बेभान होऊन , शिवी देऊन विरोध केला होता .

🔹अर्जुन सेन गुप्ता अहवालानुसार….

आज भारतात प्रतिनिधित्वहीन लोकशाही असल्यामुळे,

१२१ करोडपैकी २९ करोड लोकांचे दरडोई उत्पन्न केवळ ६ रुपये म्हणजे महिना १८० रुपये आहे.

२६ करोड लोकांचे दरडोई उत्पन्न केवळ ११ रु . म्हणजे महिना ३३० रु . आहे .

आणि २८ करोड लोकांचे दरडोई उत्पन्न केवळ २० रु . म्हणजे महिना ६०० रुपये आहे .

म्हणजे २९+२६+२८=८३ करोड लोकांचे दरडोई उत्पन्न . कमीत कमी ६ रु व जास्तीत जास्त २० रु . आहे .

याचा अर्थ १२१ करोडपैकी ८३ करोड लोकांना दरमहा ६ रु . ते २० रुपयात जीवन जगावे लागत आहे आणि विशेष म्हणजे हे सर्व मूलनिवासी बहुजन आहेत . यात एकही युरेशियन ब्राह्मण नाही .

या ८३ करोड लोकांकडे निवडणुकीचा फॉर्म भरायला देखील पैसा नाही . निवडणुकीच्या प्रचारावर खर्च करणे तर दूरच . त्यांच्याकडे उमेदवारी अर्ज भरायला देखील पैसा नाही .

याचा अर्थ आज १२१ पैकी ८३ करोड लोकांना निवडणूक प्रक्रियेतून बाहेर काढले आहे . म्हणजे मराठा- कुणबी -ओबीसी , एससी , एसटी व त्यातुन धर्मपरिवर्तीत व महिला या ८५ टक्के मूलनिवासी बहुजनांना निवडणूक प्रक्रियेच्या बाहेर काढले आहे . त्यांना खरे-खुरे प्रतिनिधित्व नाही .

आज केवळ १५ टक्के ब्राह्मण , क्षत्रिय , वैश्य यांची व पुणे करारामुळे निर्माण झालेल्या दलाल व भडव्यांचीच लोकशाही आहे . असे होऊ नये म्हणून तर राजर्षी छत्रपती शाहू महाराज वेगळे प्रतिनिधित्व मागत होते .

लेख समाप्त

●●●●●●

वरील माहिती ही डी.आर.ओव्हळ लिखित ” राजातील माणूस आणि माणसातील राजा राजर्षी शाहू महाराज ” या ग्रंथातील आहे , मी केवळ लेखक आणि आपण यांच्यामध्ये दुवा आहे . अधिक माहिती साठी जिज्ञासूंनी मूळ संदर्भ ग्रंथ जरूर वाचावा.

वरील मूळ संदर्भ ग्रंथ हा खालील संदर्भ साहित्याचा आधार घेऊन लिहिले गेले आहे .

¶ संदर्भग्रंथ :-

१) लोकांचा राजा – शाहू छत्रपती प्रा.अशोक राणा

२) समाजक्रांतिकारक – राजर्षी शाहू छत्रपती ( हिंदी ) : सौ.वसुधा ज , पवार

३) वैज्ञानिक संस्कृतीचा दार्शनिक : वीर उत्तमराव मोहिते

४) Chhatrapati Shahu And His Reservation Policy : Dr. M.B. Nalawade

५) Chhatrapati Shahu The Pillar or Social Democracy:
Editor
Late Shri P. B. Salunkhe
Ex . MLA – Kolhapur Executive Editor
Principal ( Dr. M G Mali )
MA MEd . Ph.D.

Publisher – The Education Department Government or Maharashtra , Mumbai 400 032

६) राजर्षी छत्रपती शाहू महाराज गौरव ग्रंथ

Leave A Reply

Your email address will not be published.