आरजेडीचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव निर्दोष

0 21

आरजेडीचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव निर्दोष

पाटणा : पटना खासदार व आमदार न्यायालयाच्या विशेष न्यायदंडाधिकारी सारिका बहलिया यांच्या न्यायालयाने शनिवार रोजी आरजेडीचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांची बदनामीकारक विधाने केल्याच्या प्रकरणात पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.
लालू प्रसाद यादव पहिल्या शिफ्टमध्ये विशेष न्यायालयात हजर होते पण आजारपणामुळे ते निकाल लागण्यापूर्वीच तेथून निघून गेले. दुसºया शिफ्टमध्ये त्यांचे वकील सुधीर सिन्हा आणि एजाज अहमद यांच्या विनंतीवरून विशेष न्यायालयाने वकिलांच्या उपस्थितीत हा निर्णय दिला.
तक्रारदार उदयकांत मिश्रा यांनी २०१७ मध्ये लालू प्रसाद यादव यांच्या विरोधात तक्रार पत्र क्रमांक ४५ ३० (उ)/२०१७ मध्ये हा खटला न्यायालयात दाखल केला होता. यात लालू यादव ९ सप्टेंबर २०१७ रोजी भागलपूरला जात असताना त्यांनी कुटुंबातील सदस्य उदयकांत मिश्रा आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यातील संबंधांवर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. त्यामुळे तक्रारदाराचा मान-सन्मान दुखावला गेली असे म्हटले होते़

 

Leave A Reply

Your email address will not be published.