ठाकरेंसाठी तिरुपतीला पायी जाताना शिवसैनिकाचं निधन

0 83

ठाकरेंसाठी तिरुपतीला पायी जाताना शिवसैनिकाचं निधन

 

बीड :शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दीर्घायुष्य लाभो यासाठी बीड मधील शिवसैनिक सुमंत रुईकर यांनी २०२१ मध्ये तिरुपती बालाजीसाठी पायी यात्रा काढली होती. परंतु, या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. रुईकर कुटुंबाची जबाबदारी ठाणे जिल्हा शिवसेनेनं घेतली होती. एकनाथ शिंदे यांनी मंत्री असताना दिलेला शब्द आज मुख्यमंत्री असताना पूर्ण केला आहे.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि येणाऱ्या काळातील महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकावा असा नवस या कडवट शिवसैनिकाने केला होता. बीड ते तिरुपती बालाजी असा पायी जाण्याचा संकल्प केला. त्यांनी त्याच दिशेने प्रवास सुरू होता. मात्र, कर्नाटक पर्यंत पोहोचल्यावर त्यांचा मृत्यू झाला. या मृत्यूनंतर संपूर्ण रुईकर कुटुंब उघड्यावर आले. घरातील पत्नी, मुलगी, मुलगा आणि वयोवृद्ध वडील रुईकरांवर अवलंबून होता.
Leave A Reply

Your email address will not be published.