श्री संत तुकाराम मंदिरात चोरट्यांची मारहाण

0 59

श्री संत तुकाराम मंदिरात चोरट्यांची मारहाण

 

बीड : तालुक्यातील मौजे अंजनवती येथील वस्ती या ठिकाणी श्री संत तुकाराम संस्थान मंदिरात मध्यरात्री तीनच्या सुमारास चोरट्यांनी दार तोडून प्रवेश केला. चोर घुसल्याचं समजताच घरातील दोन महिलांनी प्रतिकार केला. मात्र चोरट्यांच्या ताकदीपुढं महिलांची ताकद कमी पडली. आणि या चोरट्यांनी दोन महिलांना बेदम मारहाण केली. यात दोन्ही महिला गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर बीडमधील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. घटनेची माहिती नेकनूर पोलीस प्रशासनाला कळताच पोलीस घटनास्थळी ठाण मांडून आहेत. थानिक गुन्हे शाखा आणि श्वान पथकांनी या परिसराची पाहणी केली आहे.

मौजे अंजनवती येथील श्री संत तुकाराम संस्थान मंदिरात मध्यरात्री पुजारी कृष्णा जोशी यांच्या रूमला चोरट्यांनी बाहेरून कडी लावली. त्याचवेळी शेजारच्या रूममध्ये झोपलेल्या कृष्णा जोशी यांची पत्नी गीता जोशी (वय ४५) यांना या चोरट्यांची कुणकुण लागली. त्यांनी या चोरट्यांना विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र यामध्ये चोरट्यांनी गीता यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी कृष्णा जोशी यांच्या सासू उषा प्रल्हाद लेले यांच्या कानावर हा सगळा प्रकार पडताच त्यांनीही या चोरट्यांचा विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनाही चोरट्यांनी बेदम मारहाण करून गंभीररित्या जखमी केलं. या दोघींवर बीड येथील खासगी रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. घटनास्थळावर पोलीस प्रशासनाने ठाण मांडून या ठिकाणी श्वान पथकानेही या संपूर्ण परिसराची पाहणी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.