सेवालयातील पाच जोडप्यांनी बांधल्या सत्यशोधकी पध्दतीने रेशीमगाठी

0 179

सेवालयातील पाच जोडप्यांनी बांधल्या सत्यशोधकी पध्दतीने रेशीमगाठी

 

लातूर : जिल्ह्यातील असा तालुक्यातील हासेगावच्या सेवालयातील एचआयव्ही संक्रमित ५ जोडप्यांचे विवाह थाटामाटात हॅपी इंडियन व्हिलेजमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत सत्यशोधकी पध्दतीने झाले.

शनिवार, दि. २२ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास चंद्राच्या शितल छायेत, बँड बाजाच्या मंगलमय सुरात, स्पिकरच्या शीतल स्वरात हा विवाह सोहळा उत्साहात झाला. लातूरजवळील हासेगाव येथे समाजसेवक प्रा. रवी बापटले यांनी २००७ मध्ये सेवालय नावाचा प्रकल्प सुरू केला. त्या वेळी सेवालयात दाखल झालेली बालके आता सज्ञान झाली आहेत. आतापर्यंत यातील १८ जोडप्यांचे विवाह झाले आहेत. यातील ७ जोडपी हॅपी इंडियन व्हिलेजवर राहत आहेत. त्यांना एचआयव्ही मुक्त मुलेही जन्मली आहेत. आज त्यांचे संसार सुखाने सुरू आहेत. आता अन्य एचआयव्ही संक्रमित ५ जोडप्यांचे विवाह प्रा. रवि बापटले यांच्या पुढाकारातून होते. ते विवाह दि. २२ रोजी सायंकाळी ६:३० वाजता सत्यशोधकी पद्धतीने उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.

Leave A Reply

Your email address will not be published.