तुला आगे ना पिछे, तुला कोणी नाहीये. कधी झोळी लटकवशील आणि निघून जाशील

0 111

तुला आगे ना पिछे, तुला कोणी नाहीये. कधी झोळी लटकवशील आणि निघून जाशील

 

 

जळगाव : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी (२३ एप्रिल) जळगावमधल्या पाचोऱ्यातील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करत ठाकरे म्हणाले की,लोक माझ्यावर आरोप करतात की मी घरी बसून सरकार चालवलं. पण मी घरी बसून जे केलं ते तुम्ही वणवण फिरूनही करू शकला नाहीत हे कबूल करा. मी घरी बसून महाराष्ट्र सांभाळत होतो म्हणून ही जनता इथे आली आहे. हे लोक घराणेशाहीबद्दल बोलतात, परंतु घराणेशाहीला एक परंपरा असते. तुला आगे ना पिछे, तुला कोणी नाहीये. कधी झोळी लटकवशील आणि निघून जाशील. पण माझ्या जनतेच्या हातात भिकेचा कटोरा देऊन जाशील त्याचं काय करायचं? ते म्हणतात ना, मी फकीर आहे, मग झोळी लटकवून निघून जाशील, पण माझ्या जनतेच्या हातात भिकेचा कटोरा देऊन जाशील त्याचं काय करायचं.

राहुल गांधींनी प्रश्न विचारला आहे, तो प्रश्न त्यांना एकट्याल्याच पडला नाही, तर जनतेला आणि शेतकऱ्यालाही पडला आहे. शेतकऱ्याला प्रश्न पडलाय की, मी मरमर मरतोय पण माझं कर्ज काही फिटत नाही, परंतु पंतप्रधानांचा मित्र गेल्या ५ ते १० वर्षात जगातला दुसऱ्या क्रमांकावरचा सर्वात श्रीमंत व्यक्ती कसा बनला? खरंच तो इतका यशस्वी झाला का? तसं असेल तर त्याची यशोगाथा काढा आणि द्या ती शेतकऱ्याला, कसं व्हायचं श्रीमंत हे सांगा अस उद्धव ठाकरे म्हणाले.या सभेत उद्धव ठाकरे यांनी जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंपासून ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली. पुलवामा हल्ल्याबाबत माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केलेल्या वक्तव्यावरून ठाकरे यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना लक्ष्य केलं.

Leave A Reply

Your email address will not be published.