महिला संघटेनेच्या वतीने मणिपूर घटनेचा जिजाऊ ब्रिगेडकडून तिव्र निषेध

1 159

महिला संघटेनेच्या वतीने मणिपूर घटनेचा तिव्र निषेध
_________________________
जिजाऊ ब्रिगेड सह विविध महिला संघटना आक्रमक
_________________________
मारेगाव (प्रतिनिधी) : गेल्या दोन अडीच महिण्यापासून मणिपूरात धर्मांध शक्तीने धुमाकुळ घालत भरदिवसा अनेकाचा बळी घेऊन दंगल घडवून नागरीकांचा अतोनात छळ सुरु आहे, तसेच दोन नग्न महिलाची धिंड काढून माणुसकिला काळिमा फासण्याचे प्रकार होत असताना केन्द्रातील सत्ताधारी मात्र मुग गिळून चुप असल्याने मणिपुर येथील महिलेवर अत्याचार करणाऱ्या नराधरामाला फाशीची शिक्षा देण्यात यावी यासाठी घटनेचा तिव्र निषेध करित जिजाऊ ब्रिगेड, सन्मान स्त्रि शक्ती संघटना, ओबीसी महिला संघटना, जनहित महिला संघटना व शेकडो महिला रस्त्यावर उतरून घटनेचा निषेध करित मारेगांवचे तहसिलदार . उत्तम निलावाड यांचे मार्फत महामहिम राष्ट्रपती दौपदी मुर्मु यांना निवेदन सादर करून मनिपुर आरोपीला कठोर शिक्षेची मागणी करण्यात आली .
यावेळी सन्मान स्त्रि शक्ती फॉउन्डेशनच्या किरण देरकर , जिजाऊ ब्रिगेडच्या लिना पोटे, ओबीसी महिला संघटनेच्या इंदुताई किन्हेकर, जनहित महिला संघटनेच्या कविता मडावी सह अरुणाताई खंडाळकर नगरसेविका वर्षा किंगरे, नगरसेविका मालाताई बदकी, जिजाताई वरारकर शोभा घागी, अरुणा ठाकरे, वंदना बोंडे, मंगला आसेकर तमन्ना शेख सह शेकडो महिला उपस्थित होत्या .

1 Comment
  1. भय्याजी उईके says

    मी ग्रामन्नतीचा, ग्रामन्नती हा सदर समाज माध्यमातून आलेल्या लिंक वरुन वाचला बहुजनांना त्यांचे संभ्रमित झालेले बौद्धीक विचार कार्यन्वित करणारे आहे. कारण आता यासारखे वृत्तपत्र दुर्मिळ आहेत कारण गोदी मीडियाने विकत घेतले आहे. ग्रामन्नतीचे मनस्वी स्वागत

Leave A Reply

Your email address will not be published.