मोंढामार्केट येथील फळ विक्रेत्यांचे नवीन जागेत स्थलांतर करण्यात यावे – संभाजी ब्रिगेडची निवेदनाद्वारे मागणी

0 56

मोंढामार्केट येथील फळ विक्रेत्यांचे नवीन जागेत स्थलांतर करण्यात यावे – संभाजी ब्रिगेडची निवेदनाद्वारे मागणी

 

परळी (वार्ताहर) : भाजीपाला विक्रेत्यांचे स्थलांतर ज्याप्रकारे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवीन जागेत करण्यात आले तसेच स्थलांतर फळ विक्रेत्यांचे करण्यात यावे. अशी संभाजी ब्रिगेडच्या वतीने लेखी निवेदनाद्वारे कृषी उत्पन्न बाजार समितीकडे करण्यात आली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेत किरकोळ भाजीपाला विक्रेत्यांचे स्थलांतर मागच्या काही दिवसापूर्वी झाले आहे. त्याबद्दल कृषी उत्पन्न बाजार समितीचे संभाजी ब्रिगेडच्या वतीने अभिनंदन केले आहे.
भाजीपाला विक्रेत्यांना रोडवर विक्री करताना खूप मोठ्या प्रमाणात अडचणीला सामोरे जावं लागत होते, ती अडचण आता दूर झाली आहे. तसेच फळ विक्रेत्यांचे सुद्धा स्थलांतर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवीन जागेत म्हणजे भाजीपाला विक्रेत्याच्या शेजारी करण्यात यावे. कारण फळ विक्रेते हे मोंढ्यामध्ये आहेत आणि भाजीपाला विक्री हे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवीन जागेमध्ये होत आहे. या दोन्ही मधील अंतर खुप असून भाजीपाला खरेदी करण्यासाठी परळी शहरातील वयोवृद्ध पुरुष, महिला, नागरीकांना भाजीपाला खरेदी सोबत सोबत फळ खरेदी सुद्धा करायची असते अशा परिस्थितीमध्ये एक किलोमीटरचे अंतर पायी चालत येऊन फळ खरेदी करावी लागत आहे. नागरीकांची हि गैरसोय टाळण्यासाठी व फळ विक्रेते मोंढ्यामध्ये रस्त्यावर फळ विक्री करतात तिथं मोठ्या प्रमाणात रहदारीचा प्रश्न निर्माण होत असतो. फळ विक्रेत्यांचे स्थलांतर केले तर एकतर मोंढ्यातील रहदारी सुरळीत राहील आणि भाजीपाला खरेदी करण्यासाठी आलेल्या लोकांना फळ खरेदी करणे सुद्धा सोपे जाईल. या दृष्टीने फळ विक्रेत्यांचे तात्काळ स्थलांतर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवीन जागेत करण्यात यावे अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने लेखी निवेदनाद्वारे कृषी उत्पन्न बाजार समितीकडे केली असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष देवराव लुगडे महाराज यांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.