मणिपूर घटनेप्रकरणी मॉडेल कॉलनीत निषेध आंदोलन

0 69

मणिपूर घटनेप्रकरणी मॉडेल कॉलनीत निषेध आंदोलन

 

श्रीरामपूर : मणिपूर मधील घडणाऱ्या घटना पाहता येणारी पिढीसाठी कुठला समाज निर्माण करतोय असा संतप्त सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष ॲड. अभय छाजेड यांनी उपस्थित केला. निमित्त होते अशांत मणिपुरच्या घडणाऱ्या घटनांच्या निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग अल्पसंख्यांक विभाग, असंघटित कर्मचारी काँग्रेस व लोक आहेत आयोजित निषेध आंदोलनाचे. हे निषेध आंदोलन
24 जुलै संध्या. 7 वा गोलंदाज चौक मॉडेल कॉलनी येथे झाले जात, धर्म, लिंग, भाषा या भेदांच्या पलीकडे जाऊन म्हणून आपण एक माणूस म्हणून विचार करणार की नाही आत्मचिंतन करण्याची आज गरज आहे असं पुढे ते म्हणाले
महाराष्ट्र प्रदेश असंघटित काँग्रेसचे अध्यक्ष सुनील शिंदे म्हणाले की दोन महिलांची विवस्त्र व्यवस्था दिंड काढण्याची घटना असो की दिवंगत स्वातंत्र्य सैनिकाच्या पत्नीला जिवंत जाळल्याची घटना या माणुसकीच्या काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटना आहेत. याप्रसंगी लोकायतच्या समन्वयिका कल्याणी दुर्गा म्हणाल्या की फक्त ह्या निषेध आंदोलना पुरता न थांबता येत्या काही दिवसात गोलंदाज चौक परिसरातील गणेश मंडळ, समाज मंदिराच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन मणिपूर अशांत का होतं यावर चर्चा, कॅण्डल मार्च आयोजित झाले आहेत. याद करो संविधान का नारा, अमन शांती और भाईचारा व सामील व्हा सामील व्हा मणिपूरसाठी सामील व्हा अशा घोषणा यावेळी घेण्यात आल्या.
यावेळी अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष यासिन शेख, जावेद भा निलगर,कैलास मंजाळकर,चव्हाण,गणेश गुगळे, आकाश कांबळे, संजय मोरे,अजित जाधव , एस के पळसे,घनश्याम निम्हण,हर्षेद्र वाघमारे, योगेश वंजारी, अभिजीत बाबर, चिंटू चव्हाण,पेशने, आकाश रेणुसे, आशिष गुंजाळ,लोकायतचे कार्यकर्ते श्रीकुष्ण कुलकर्णी, ऋषिकेश येवलेकर उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन राहुल वंजारी यांनी केलं भर पावसातही नागरिक या आंदोलनात सहभागी झाले.

Leave A Reply

Your email address will not be published.