संभाजी ब्रिगेड च्या मागणीला यश

0 87

संभाजी ब्रिगेड च्या मागणीला यश

अनेक वर्षापासून ठाण मांडून बसलेल्या नायब तहसीलदार सह विविध कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या झाल्या बदल्या

 

परळी (वार्ताहर) : अनेक वर्षापासून परळीमध्ये ठाण मांडून बसलेल्या विविध कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या तात्काळ बदल्या करण्यात याव्यात. ही मागणी संभाजी ब्रिगेडने मागच्या काही दिवसापासून लावून धरली होती. त्या मागणीला पूर्णपणे यश आले असून परळीचे नायब तहसीलदार यांच्यासह विविध कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या बदल्या झाल्या आहेत.मागच्या अनेक वर्षापासून परळीमध्ये ठाण मांडून बसलेले अधिकारी/ कर्मचारी हे पूर्णपणे राजकीय नेत्यांचे खाजगी नोकरांसारखे काम करत होते ही बाब लोकशाहीसाठी अत्यंत घातक ठरत होती. त्यामुळे संभाजी ब्रिगेडने मागच्या काही दिवसापासून हि मागणी लावून धरली होती या अधिकारी/ कर्मचाऱ्यांना तात्काळ हलवण्यात यावे, निवडणुकीमध्ये प्रत्यक्ष – प्रत्यक्ष सहभाग असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या होऊ घातलेल्या नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी या अधिकाऱ्यांच्या बदल्या होणं अनिवार्य होतं म्हणून संभाजी ब्रिगेड च्या माध्यमातून यांच्या बदल्याची मागणी लावून धरली संभाजी ब्रिगेडच्या मागणीला यश आले असून प्रशासनाचे संभाजी ब्रिगेडच्या वतीने अभिनंदन व आभार व्यक्त करत असल्याचे मत संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष देवराव लुगडे महाराज यांनी व्यक्त केले आहे. तसेच यापुढे येणाऱ्या अधिकारी/ कर्मचारी यांनी इथल्या प्रस्थापित राजकीय पक्षांची दलाली किंवा त्यांच्या मर्जीनुसार काम न करता प्रशासनाचे अधिकारी /कर्मचारी या अनुषंगाने त्यांनी काम करावे अशा पद्धतीची संभाजी ब्रिगेडच्या वतीने अपेक्षा असल्याचे मत संभाजी ब्रिगेडच्या तालुकाध्यक्ष देवराव लुगडे महाराज यांनी व्यक्त केले.

Leave A Reply

Your email address will not be published.