संगीतसूर्य केशवराव भोसले यांची १३३ वी जयंती कोल्हापुरात साजरी 

0 93

संगीतसूर्य केशवराव भोसले यांची १३३ वी जयंती कोल्हापुरात साजरी 

 

कोल्हापूर : आधुनिक भारतीय संगीत रंगभूमीचे शिल्पकार संगीतसूर्य केशवराव भोसले यांचा १३३ वा वाढदिवस कोल्हापुरात (महाराष्ट्र) विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.

संगीतसूर्य केशवराव भोसले राष्ट्रीय सांस्कृतिक परिषद (भारत गणराज्य) आयोजित या जयंती सोहळ्याच्या पहिल्या सत्राचे उद्घाटन संगीतसूर्य केशवराव भोसले यांचे पणतू शिवश्री अशोक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. संगीतसूर्य केशवराव भोसले यांचे नातू शिवश्री मोहनरावजी शिंदे अध्यक्षस्थानी होते . मराठा सेवा संघ कोल्हापूरचे अध्यक्ष महिपती बाबर, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष रुपेश पाटील, महावितरणचे मुख्य अभियंता अंकुश कावळे तसेच नात सुमतीबाई पाटील पण उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संगीतसूर्य केशवराव भोसले राष्ट्रीय सांस्कृतिक परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.सतीश पावडे यांनी केले. नंदकुमार वानखेडे यांनी परिषदेचा वर्षभराचा प्रगती अहवाल सादर केला. आभार प्रदर्शन प्रकाश लेणेकर यांनी केले तर संचालन प्रसिद्ध उद्घोषक अर्चना कदम (सांगली) यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिजाऊ वंदना घेण्यात आली. नंतर महाराष्ट्रातील प्रसिद्ध समाजसेवक, विचारवंत, लेखक प्रा. हरी नरके यांच्या अकाली निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यात आला.
दुसऱ्या सत्रात डॉ.गणेश शिंदे आणि भूषण संजय पाटील दिग्दर्शित प्रस्तावित माहितीपट “संगीतसूर्य” आणि प्रकाश लेणेकर प्रस्तुत “संगीतसूर्य ललित कला केंद्र” या प्रकल्पाचे उद्घाटनही पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. तिसऱ्या सत्रात प्रसिद्ध इतिहासकार, लेखक व वक्ते प्रा. इंद्रजित सावंत आणि नाटककार, दिग्दर्शक, समीक्षक डॉ. सतीश पावडे यांची प्रख्यात निवेदिका पल्लवी यादगिरे-वैद्य यांनी मुलाखत घेतली. चौथ्या सत्रात संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या वंशजांचा सत्कार सुप्रसिद्ध पत्रकार, लेखक उदय कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली व इतिहास संशोधक डॉ.देवीरानी पाटील, मराठा सेवा संघ अमरावतीचे सचिव संजय ठाकरे, नृत्यांगना व जिजाऊ ब्रिगेड कार्यकर्ती मंजू ठाकरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.कर्नाटकचे प्रदेशाध्यक्ष अमीर अत्तार यांनी प्रस्ताविक केले व शेवटी आभार प्रदर्शन जन्मोत्सव सोहळ्याचे समन्वयक धीरेंद्र घारड यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय कार्याध्यक्ष विशाल इंगोले, राष्ट्रीय समन्वयक अश्विनी रोकडे, दिक्षा कांबळे यांनी परिश्रम घेतले. (सादरीकरण – एड. आशिष हाडके – राष्ट्रीय समन्वयक – जनसंपर्क आणि सोशल मीडिया)

Leave A Reply

Your email address will not be published.