अशोक स्तंभ कलंकित करणारे हात ध्वजाचा गौरव करू लागले ?

1 1,176
अशोक स्तंभ कलंकित करणारे हात ध्वजाचा गौरव करू लागले ?

 

✍️ नवनाथ दत्तात्रय रेपे
‘भट बोकड मोठा’ या पुस्तकाचे लेखक

 

भारताचे राष्ट्रीय चिन्ह अशोक स्तंभाची ज्यांच्या सरकारने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या पुर्वसंध्येला ज्या हातांनी नासधूस करून ते कलंकित केले, त्याच भाजपचे पुरस्कृत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे ‘घर घर तिरंगा‘ चे आव्हाण करताना दिसतात. त्यांच ते आव्हाण अनेक लोक स्विकारतात तर काही लोक त्यावर प्रतिप्रश्न करतात ही किमया केवळ भारतीय संविधानाची आहे. कारण त्यामुळेच बोलण्याचा अधिकार मिळाला आहे. पण ज्यांच्या डोळ्यादेखत दिल्लीत जंतरमंतर येथे संविधान जाळल जात आणि नरेंद्र मोदी, भाजप व संघ समर्थक केवळ बघ्याची भूमिका घेतात ते लोक आज आम्हाला तिरंगा लावा म्हणतात तेव्हा नवल वाटत. कारण नरेंद्र मोदी ज्या आरएसएसचे पुरस्कृत प्रधानमंत्री आहेत त्या संघाने मागिल ५२ वर्ष त्यांच्या शाखावर कधीच तिरंगा फडकावला नाही त्यांना आम्हाला तिरंगा लावा म्हणण्याचा नैतिक अधिकार तरी आहे का ?कारण बाळासाहेब आंबेडकर हे त्यांच्या राष्ट्रद्रोही संघ परिवाराचा वैचारिक भ्रष्टाचार मध्ये पान क्र.१४ वर म्हणतात की, भारत व पाकीस्तान ही राष्ट्रे वेगवेगळ्या दिवशी स्वातंत्र्य झाली तेव्हा १४ आँगस्ट १९४७ रोजी पाकीस्तान व १५ आँगस्ट १९४७ रोजी भारत स्वातंत्र झाला. त्यादिवशी देशभरात आनंदोत्सव साजरा केला जात असताना मात्र राष्ट्रीय स्वंयसेवक संघाने १५ आँगस्ट १९४७ हा दिवस काळा दिवस म्हणून साजरा केला. त्यादिवशी सायंकाळी संघ कार्यालयात दिवे लावायचे नाहीत असा आदेश संघाने सर्व शाखांना दिला. १५ आँगस्ट १९४७ हा काळा दिवस म्हणून संघाने पाळला असला तरी त्यांच्या सर्व शाखावर १४ आँगस्ट १९४७ हा ‘पाकिस्तान स्वातंत्र्यदिन’ संघाने साजरा केला.
तिरंगा ध्वज हा राष्ट्राची शान आहे त्याचा प्रत्येक भारतीय सन्मान करतो, त्याचा सन्मान करावा लागतो हे न सांगताही शाळेतील छोटी छोटी मुल देखिल ध्वजाचा मान सन्मान करतात पण आज जे भाजपचे लोक इतरांच्या पुढे जे देशभक्तीच आभाळ हेपलतात हे केवळ फुसका बार आहे. कारण त्यांचे जे आदर्श आहेत ते माफीवीर सावरकर राष्ट्रध्वज तिरंगा विषयी म्हणतात की, भगव्या ध्वजाशिवाय इतर ध्वजाला सलाम करू शकत नाही. तर माधव गोळवळकर म्हणतात की, भारताचा ध्वज हा एकाच रंगाचा असावा, कारण तीन हा आकडा अशुभ आहे त्यामुळे तीन रंगाचा ध्वज हानिकाकारक आहे (गोळवळकर अप्रत्यक्षपणे तिरंगा ध्वजाला विरोध करतात). तर शामाप्रसाद मुखर्जी म्हणतात की, जे लोक चूकुन सत्तेत आले त्यांनी भलेही आमच्या हाती तिरंगा ध्वज दिला असला तरी हिंदू त्याचा सन्मान कधीच करणार नाहीत.’ अस गोळवळकर यांचे मताप्रमाणे तीन आकडा अपशकुशनी असलेल्या ह्या त्रिकुटाने राष्ट्रीय ध्वज तिरंगा विषयी आपले विचार व्यक्त करून त्याचा अवमान केला त्या तीन जाणानी लिहलेल्या पुस्तकाचे व ह्या विषारी त्रिकुटांच्या प्रतिमांचे भाजप कार्यालयासमोर नरेंद्र मोदी दहन का करत नाहीत ?ह्यांच्या प्रतिमांचे जेव्हा जाहीरपणे भाजपचे लोक दहन करतील तेव्हाच आम्ही यांचे उपदेश मान्य करू अन्यथा आम्ही ह्या देशद्रोह्याचं काय म्हणून ऐकावं ?.
तिरंगा झेंडा कोणतरी सांगत म्हणून ती लावायची गोष्ट नाही. कारण येथिल चार पाच वर्षांच मुल देखिल तिरंगा हाती घेऊन मिरवत ते काय मोदींनी भाषण केल म्हणून नव्हे तर त्यांच्या जुणूकामध्येच देशभक्ती आहे हा त्याचा पुरावा असतो. पण नवाज शरीफाच्या गळ्यात गळा घालून स्वतःचा मागचा मळा प्रदीप जोशीला रेशिमबागेत दान देणारा व्यक्ती आम्हाला तिरंगा लावण्याचा सल्ला का म्हणून देतो याचा विचार बहुजन समाज करणार आहे की नाही ?कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्यानंतरही राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या RSS.org व त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर तिरंग्याचे चित्र का टाकल नाही ?त्यामुळे आरएसएसला नेटक-यांकडून ट्रोल करण्यात येत आहे. त्यावर आरएसएसकडून सारवासारव करताना प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी म्हटलं की, ‘आरएसएसने ‘हर घर तिरंगा‘ आणि ‘आझादी का अमृत महोत्सव’ कार्यक्रमांना आधीच पाठिंबा दिला आहे. सरकार, खाजगी संस्था आणि संघाशी संबंधित संघटनांनी अमृतमहोत्सवी कार्यक्रमांचे आयोजन केले पाहिजे, असं आवाहन केल्याचंही त्यांनी सांगितले.’ पण जेव्हा नेटक-यांनी ट्रोल करायला चालू केले तेव्हा हे संघोटे पोपटासारख बोलताना दिसतात. ‘आझादी का अमृत महोत्सव’ ला पाठींबा देणा-या संघोट्यांना तिरंगा का नकोसा वाटतोय ?इतरांना सहभागी व्हा म्हणणा-या संघाने तिरंगा न लावता केवळ इतरांना आव्हाण कराव हे योग्य आहे का ?म्हणजेच संघोट्यांचे धोरण म्हणजे लोका सांगे ब्रम्हज्ञान स्वतः मात्र कोरडे पाषाण असेच नाहीतर कसे आहे ?ज्या संघाने तीन रंग अपशकून असतात म्हणून तिरंगा नाकारला त्यांनी काय म्हणून बहुजनांना तिरंगा लावण्याचे सल्ले द्यावेत म्हणून तर राहुल गांधी म्हणतात की, ज्यांच्या मातृसंस्थेने (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ) स्वातंत्र्यानंतर ५२ वर्षापर्यंत त्यांच्या मुख्यालयावर तिरंगा फडकवला नाही.
दिल्लीत लाल किल्ला परिसरात स्मृती इराणी यांनी कार्यकर्त्यांसोबत स्कुटीवर तिरंगा रँली काढली तेव्हा उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी  खासदारांसाठीच्या तिरंगा रॅलीला झेंडा दाखवत उद्घाटन केलं. (लोकसत्ता ०५ जूलै २२) ह्या संघोट्या पिलावळी जिथे पोसल्या गेल्या त्या संघाने मात्र अजूनही तिरंगा का लावला नाही ?ह्याच उत्तर हे रँलीत तिरंगा घेऊन फिरणारे भाजपाई संघोटे देतील का ?आपल्या राष्ट्रध्वजाचे महत्व व अभिमान समस्त भारतीयांना आहे मात्र देशात योगदिवस साजरा करताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी मिडिया समोर राष्ट्रध्वजाने स्वत:चा चेहरा, नाक व तोंडावरचा घाम पुसून राष्ट्र ध्वजाचा अवमान केला तेव्हा या घटनेचा एकाही भाजप किंवा  आरएसएसच्या भक्ताने साधा निषेधही केला नाही. अश्या लोकांना स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याचा अधिकार तरी आहे का ?देशातला पहीला आतंकवादी म्हणून ‘नथुराम गोडसे याच नाव घेतल जात, त्याच्या चरणावर नतमस्तक होऊन नाक घासणारे हेच भाजपचे लोक इतरांना काय म्हणून झेंडा लावण्याचा सल्ला देतात ?संविधानाने प्रत्येक व्यक्तीला मताचा अधिकार दिला आहे, मात्र त्यांच्या मताची हेराफेरी करून मालेगाव बाँम्बस्पोटातील आरोपीला जर हे खासदार करत असतील तर त्यांनी ज्या देशभक्तीच्या गप्पा मारल्या त्या का म्हणून आम्ही ऐकाव्यात ? संघाच्या शाखेत जाऊन पुरुषांना काखेत ओढून घेणारे नरेंद्र मोदी जेव्हा घरा घरात तिरंगा लावा अस आव्हाण करतात तेव्हा नवल वाटत कारण ह्या संघाच्या कार्यालयावर मागील ५२ वर्षात कधी तिरंगा फडकवला होता का ?त्यामुळे इतरांना तिरंगा लावण्याचा सल्ला देण्याचा मोदींना नैतिक अधिकार आहे का ?भारतीय संविधानाची वारंवार पायमल्ली करून दिल्लीत जंतरमंतर येथे संविधानाची होळी ज्या संघाच्या समर्थकांनी केली त्या संघोट्यांनी काय म्हणून देशभक्ताची प्रमाणपत्रे वाटप करावीत ?तसेच सर्वांना समान हक्क अधिकार देणारे संविधान असताना त्यापेक्षाही वर्णव्यवस्थेला खतपाणी घालणारी मनुस्मृती ही भाजपच्या लोकांना श्रेष्ठ वाटते, त्या माकडांनी काय म्हणून आम्हाला तिरंगा लावण्याचा सल्ला द्यावा ?देशात महागाई व वाढती बेरोजगारी यामुळे जनता त्रस्त असतानाच अन्नधान्यावर जीएसटी कर लादून गरीबांना लुटणाऱ्या भाजप सरकारला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याचा नैतिक अधिकार आहे का ?संविधानाने लिहण्या बोलण्याचा अधिकार दिला असताना जर नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे, गौरी लंकेश व कलबुर्गी यांच्यासोबत वैचारिक वाद न करता हे संघोटे थेट व्यक्तीस्वातंत्र्याचा खून करत  असतील तर बहुजन समाजाने काय म्हणून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करावा ? कारण देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्य वर्षात जर व्यक्तीस्वातंत्र्याचा दिवसाढवळ्या खून होत असेल तर सुवर्ण महोत्सवी वर्षात नेमक काय असेल, अशी भिती वाटल्याशिवाय राहत नाही.
मोदींच्या पावलावर पाऊल ठेवत काही संघ धार्जिणे अभिनेते तिरंगा लावा अस आव्हाण करताना दिसतात तेव्हा त्यांना सांगावं वाटत की, हे सल्ले १४० कोटी जनतेला देण्यापेक्षा नवाज शरीफांच्या वाढदिवसाला गळ्यात गळे घालून तोंड काळे करणा-या मोदींना द्यावा कारण तिरंगा लावावा हे त्यांनी आम्हाला मुळीच सांगण्याची गरज नाही कारण तिरंगा हा आमची आण बाण आणि शाण आहे. म्हणून तर सचिन पाटील लिहतात की, देशाचा तिरंगा हा आमच्या मनात, श्वासात, कृतीत व मनात खोलवर रुजला आहे. त्याच्यावरील प्रेमाचा असा बाजार मांडायची आम्हांला गरज नाही. कारण तो स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षांनी आम्ही रुजवलेला नाही. त्यामुळे तिरंगा कधी आणि कुठे फडकवायचा हे आम्हाला सांगायची गरज नाही. जी व्यक्ती जनतेच्या प्रश्नांची उत्तरं ना संसदेत देते, ना पत्रकार परिषदेत देते तसेच ज्या व्यक्तीने संविधानाच्या प्रत्येक कलमाच्या चिंधड्या उडवायचा विडा उचलला आहे, अशा व्यक्तीने आम्हाला तिरंगा फडकवा हे सांगायची गरज नाही. मुळात आज घरा घरात तिरंगा उभारण्यापेक्षा ती घर टिकण महत्वाचं आहे.’ सचिन पाटील यांनी जे मत व्यक्त केल ते अगदी शंभर टक्के खर आहे. पण हे त्यालाच खर वाटेल ज्याच स्वतःच्या धडावर स्वतःच मस्तक आहे. देशाला स्वातंत्र्य कधी मिळाल ?हे ज्या कंगना रणैवतला माहीत नाही तीला काय म्हणून केंद्राच भाजप सरकार झेड सुरक्षा पुरवते ?ते लोक आम्हाला देशभक्ती शिकणार का ?
‘हर घर तिरंगा’ मोहिमेअंतर्गत रेल्वेच्या सर्व कर्मचाऱ्यांना राष्ट्रध्वजाचे वाटप करण्यात येणार आहे. मात्र, त्याचे पैसे प्रतिध्वज ३८ रूपये प्रमाणे रेल्वे कर्मचाऱ्यांच्या पगारातून कपात करण्यात येतील. मात्र याला रेल्वे कर्मचारी संघटनेने विरोध केला आहे. कारण हा राष्ट्रध्वज मुख्य पोस्ट ऑफिसमधून २५ रुपयांना, तर बचत गटामार्फेत २० रुपयांना विकल्या जात आहे. (लोकसत्ता ०७ आँगस्ट २०२२) तेव्हा प्रश्न पडतो की, सगळीकडे २० – २५ रूपयांना मिळणारा राष्ट्रध्वज रेल्वे कर्मचा-यांना ३८ रुपयांना विकून काय मोदींना तोट्यात जाणारी रेल्वे नफ्यात काढायची आहे का ?हे संघ समर्थक तिरंगा ध्वजाचा अवमान करतात ते आजही सर्रासपणे चालू आहे. कारण स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र सरकारने जी मोहीम सुरू केली. त्यासाठी अहमदनगर महापालिकेतर्फे ५१ हजार झेंडे पाठविण्यात आले होते. त्यात ५१ हजार ध्वज खराब निघाले. यातील जवळपास सर्वच झेंडे निरूपयोग होते. चुकीची छापाई, चुकीच्या आकारात कापलेले, फाटलेले झेंडे आले होते. ते न वापरण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून ते ध्वज संबंधित कंत्राटदार कंपनीला परत पाठविण्यात आले आहेत. (मटा ०६ आँगस्ट २२) म्हणून तर सांगाव वाटत की, ५२ वर्ष तिरंगा नाकारणा-या संघाचे बुजगावणे नरेंद्र मोंदींनी आव्हाण कराव आणि आम्ही ते एका मिनटात का स्विकाराव ?संघोट्यांनी तिरंगा ध्वजाचा अवमान करावा आणि तो संपुर्ण देशाने उघड्या डोळ्यांनी सहन करावा हेच देशाच दुर्देव आहे. म्हणून तर म्हणून तर सरदार वल्लभभाई पटेल यांनी आरएसएसला राष्ट्रविरोधी म्हटले होते. तसेच १४ नोव्हेंबर १९४८ रोजी भारत सरकारने गृहमंत्रालयाच्या वतीने एक प्रेस नोट प्रसिध्द करून त्यात संघ हा राष्ट्रविरोधी आहे असे स्पष्टपणे लिहले हे योग्यच होते. म्हणून अशा भाजप व संघ समर्थकांचे अजेंडे वेगळे आणि उद्देश वेगळे असतात हे ओळखा. कारण यांनीच राष्ट्रीय चिन्ह अशोक स्तंभाची नासधूस केली आहे मग त्यांच्या हाती तिरंगा शोभतो का याचाही विचार करा. कारण ह्यांचे हे कलंकीत हात केवळ तिरंगा ध्वजाचा बाजार मांडून आपला स्वार्थ साधण्यात गुंतले आहेत. त्यामुळे विघ्नसंतोषी लोकांना ओळखून ह्यांची ओळख इतरांनाही करून द्या कारण आपला बहुजन समाज यांच्या जाळ्यात आडकून तो कलंकित होणार नाहीत.
सदरील लेख १० आॅगस्ट २०२२ रोजी लिहिलेला आहे
नवनाथ दत्तात्रय रेपे लिखित खालील पुस्तके घरपोहोच मिळतील
१. भट बोकड मोठा
२. डोळ्यात माणसांच्या फेकून धूळ गेला !
३. संविधानाच्या पडद्याआड संघोट्यांचा लिंबू 🍋
संपर्क – रूक्माई प्रकाशन, अंजनडोह (बीड)
मो. ९७६२६३६६६२ , ९७६४४०८७९४
1 Comment
  1. विठ्ठलराव वठारे says

    अतिशय उद्बोधक आणि प्रेरणादायी माहिती आहे.
    धन्यवाद !

Leave A Reply

Your email address will not be published.