कोवीड लसीकरण खूप मोठी फसवणूक आणि जागतिक षडयंत्र

0 971

कोवीड लसीकरण खूप मोठी फसवणूक आणि जागतिक षडयंत्र

 

✍🏻 प्राची लोखंडे, नाशिक

 

को-वीड लसी-करण हे खूप मोठी फसवणूक आणि जागतिक षडयंत्र आहे. हे जाणून समजून घेण्यासाठी अजून एक सायंटिफिक तथ्य मी लिहीत आहे. त्या अगोदर कोविड ची बेसिक ‘थिअरी’ माहीत असायला हवी. मी इथे ‘थिअरी’ हा शब्द वापरत आहे हे लक्षात घ्या.

कोविड ला SARS-covid अस सुद्धा नाव आहे. खूप ठिकाणी SARS कोविड अस आपण न्यूज मध्ये वैगेरे वाचलं आहे. SARS चा फुलफॉर्म आहे.
SARS: Severe Acute Respiratory Syndrome.

S: Severe (गंभीर)
A: Acute (तीव्र)
R: Respiratory (श्वसन)
S: Syndrome (एखाद्या रोगाची लक्षणे किंवा त्यामुळे शरीरात होणारे बदल, लक्षणसमूह.)
या रोगाच्या नावावरूनच समजते की हा रोग फुफुसा संबंधित आहे. या मध्ये श्वास घेण्यासाठी अडथळा होतो अस. कोविड विषाणू हा नाक किंवा तोंडा वाटे फुफुसात इन्फेक्शन करतो हे आपण जाणून आहोत. हे इन्फेक्शन होत असताना इथे कुठे ही रक्ताचा संबंध येत नाही. म्हणूनच कोविड टेस्ट साठी अजून पर्यंत तरी कोणती ही ‘ब्लड-टेस्ट’ आहे अस आपण कुणी ऐकले नाही. टेस्ट साठी नेहमी घश्यातूनच स्वॅप घेतला जातो आणि मग त्याची RT-PCR चाचणी केली जाते. त्या स्वॅप वरूनच कोविड इन्फेक्शन झाले आहे की नाही हे निदान करतात.
इतर कोणत्या ही रेग्युलर आजारासाठी जसे ‘ब्लड-टेस्ट’ असतात तशी कोविड साठी कोणती ही ‘ब्लड- टेस्ट’ नाहीये. म्हणजेच रक्तातून या विषाणू चे निदान होत नाही. हा विषाणू नाकातून तोंडातून थेट फुफुसात इन्फेक्शन करतो. अशी थिअरी आहे.
सरकार कडून लोकांना ज्या लसी दिल्या आहेत त्या सर्व रक्तातून दिल्या आहेत हे लक्षात घ्या. लसी मुळे शरीरात कोविड विरोधात प्रतिकार शक्ती तयार होते शरीरात antibody तयार होतात आणि या antibody तयार झाल्यामुळे कोविड इन्फेक्शन होत नाही किंवा झाले तरी त्या इन्फेक्शन मूळे कुणी माणूस मरत नाही. ही सुद्धा थिअरी आपण जाणून आहोत

antibody antibody (anti म्हणजे विरोधात) (body म्हणजे कोणता ही विषाणू जिवाणू ज्यामूळे इन्फेक्शन आजार होतात).
कोणता ही जिवाणू विषाणू जेव्हा शरीरात प्रवेश करतो तेव्हा त्याला प्रतिकार म्हणून हे असे antibody शरीरात तयार होतात. यालाच प्रतिकार शक्ती म्हणतात. इंग्रजीत याला immunity अस म्हणतात.
Antibody चे सुद्धा प्रकार आहेत. शरीरात वेगवेगळ्या ठिकाणी वेगळे antibody त्यांचे काम करत असतात.
‘IgG’ आणि ‘IgA’ या दोन antibody बद्दल इथे समजून घेणे गरजेचे आहे.
‘IgG’ या अशा प्रकारच्या antibody आहेत ज्या फक्त रक्तात असतात. शरीरातले ७५ टक्के antibody हे IgG या प्रकातले असतात. रक्तामद्ये झालेल्या इन्फेक्शन च्या प्रतिकारासाठी हे IgG antibody काम करतात.
‘IgA’ या अशा प्रकारच्या antibody आहेत ज्या श्वास-नलिका म्हणजे फुफुस, अन्न-नलिका, किडनी आणि इतर काही ऑर्गन च्या ठिकाणी काम करतात. इथे कोणते ही इन्फेक्शन होत असेल तर ‘IgA’ हे antibody असतात.
कोविड च्या इन्फेक्शन ची सुरुवात नाकातून तोंडातून आणि मग फुफुसा मध्ये होते, तर त्याला प्रतिकार म्हणून त्याचे antibody IgA हे सुद्धा फुफुसा मध्येच तयार व्हायला हवे की नाही ?
सरकार कडून ज्या कोणत्या vaxssin injection दिल्या जात आहे त्या रक्तातून दिल्या आहेत. रक्तात तयार होणारे antibody IgG हे वेगळे असतात आणि फुफुसा मध्ये प्रतिकारासाठी लागणारे ‘IgA’ हे antibody वेगळे असतात. Testing साठी सुद्धा रक्त घेतले जात नाही पण लस मात्र रक्तात दिली जात आहे.
अस का ?
लस एक तर recombinant आहे की त्यात फक्त कोणते ‘केमिकल’ आहेत हे त्या कंपन्यांना आणि सरकार लाच माहीत. पण हे षडयंत्र आहे हे नक्की. लसीकरण सुरू झाल्या पासून जे लोकांना हार्ट अटॅक आणि ब्रेनस्ट्रोक होत आहे त्याचे प्रमाण प्रचंड आहे. लसी मुळे कोविड थांबला वैगेरे या सर्व थापा आहेत.
हो जगातले सर्व देशाचे सरकार WHO आणि मोठी जागतिक संघटना या षड्यंत्रा मध्ये शामिल आहेत. आपण आपल्या लेव्हल वर लसी पासून स्वतःचा बचाव कसा करू शकतो हे बघायला हवं. एक किंवा दोन डोज घेतले असतील तर पुढचे डोज नाही घेतले पाहिजे. ही काळजी घेतली पाहिजे.

Leave A Reply

Your email address will not be published.