मराठ्यांच्या इतिहासातील सोनेरी पान इतिहासाचार्य प्रा.मा.म.देशमुख

0 443

मराठ्यांच्या इतिहासातील सोनेरी पान इतिहासाचार्य प्रा.मा.म.देशमुख

 

●● इतिहासाचार्य प्रा.मा.म.देशमुख ●●
याचा जन्मदिवस ११ जुलै १९३६
“एका बीजा केला नाश मग भोगिले कणीस..”

हजारो दाणे असणारे कणीस मिळवायचे असेल तर आधी एका बीजाला स्वतःचा नाश करुन घ्यावा लागतो.त्या बीजाने स्वतःला जमीनीत गाडुन घेतल्यावरच त्याच्यातुन तयार होणारे कणीस त्या बीजाचा वारसा पुढे चालवत नवनिर्मितीच्या प्रक्रियेत भाग घेतं.. इतिहासाचार्य प्रा.मा.म.देशमुख ह्यांचे जीवन अगदी बीजासारखंच आहे.

समाजात परीवर्तन घडवुन आणण्यासाठी चळवळीच्या भूमीत स्वतःचे जीवन गाडुन घेऊन परीवर्तनवादी विचारांचे कार्यकर्ते असणारी कणसं तयार करण्याचे महान कार्य सरांनी केले आहे.आपल्या राष्ट्रजागृती लेखमालेतुन मनुवादाची साल काढत नवीन परीवर्तनवादी लेखक,वक्ते यांची फळी उभी करण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे.

● रामदास आणि पेशवाई
● मराठा-कुणबी समाजाची दशा आणि दिशा
● बहुजन समाज आणि परीवर्तन
● शिवराज्य
● मनुवाद्यांशी लढा
● राष्ट्रनिर्माते
● शिवशाही
● मनुवादी शिवस्मारक होऊ देणार नाही
● मध्ययुगीन भारताचा इतिहास
● मराठ्यांचे दासीपुत्र: संपादित
● भांडारकर तो झाँकी है शनिवारवाडा अभी बाकी है
● जिजाऊ
● अभ्यास कसा करावा ?
या व अशा अनेक विचारग्रंथांतुन तसेच आपली व्याख्याने,लेख,चर्चासत्र,प्रशिक्षण शिबीरांमधुन मनुवादी लेखकांनी लिहलेला खोटा इतिहास पुराव्यासहीत खोडुन काढण्याबरोबरच वैचारिक धन वाटण्याचे कार्य त्यांनी केले.

“रामदास हा आदिलशहाचा हेरच होता” हे त्यांनी आपल्या “रामदास आणि पेशवाई” मध्ये पुराव्यानिशी सिध्द केले.हायकोर्टाने त्यांच्या या पुस्तकावरील बंदी उठवुन या संशोधनावर शिक्कामोर्तब केले.
“आचार्य अत्रे” पासुन ते अनेक मनुवादी लेखकांची तोंडे कायमची बंद करण्याचा पराक्रम सरांनी केला आहे.
त्याचबरोबर पुण्यातील शनिवारवाडा हाच जिजाऊंचा खरा लालमहाल आहे असे पुराव्यासहीत संशोधन त्यांनी केले आहे.मनुवादी लेखकांनी लपवलेला आणि इतिहासात शिवरायांवर तलवारीने वार करणारा अफजलखानाचा वकील सरांनी सर्वप्रथम आपल्या लेखणीतुन समाजासमोर आणला.

एके काळी तर मनुवाद्यांनी सरांच्या लेखनाची इतकी धास्ती घेतली होती की सरांचे मुद्दे खोडता येत नाहीत म्हणुन त्यांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढण्याचाच प्रयत्न त्यांनी केला.पण सरांच्या अंगात सुध्दा मराठ्याचं रक्त आहे ही गोष्ट ते मनुवादी जाणुन असल्यामुळे ते सरांना काहीच करु शकले नाहीत. मनुवाद्यांच्या कारस्थानाबाबत सरांच्या विद्यार्थ्यांना समजताच हजारो तरुण सरांच्या मदतीला धावले.हे बघुन त्या मनुवादी मुर्खांनी आपली कातडी वाचवुन बुडाला पाय लावुन पळ काढण्यातच धन्यता मानली.त्याच ठिकाणी या तरुणांनी सरांची “प्रेमयात्रा” काढली.इतकी लोकप्रियता सरांची त्या काळीसुध्दा होती.जाहीर व्याख्यान देत असताना अनेक वाक्यांच्या पाठीमागील गुढ अर्थ श्रोत्याने समजुन घ्यावा यासाठी “पाणी तापु द्या..” असे आपल्या खास शैलीत सांगत श्रोत्याची मनं जिंकण्याची किमया सरांना चांगलीच अवगत आहे.

“भिकाऱ्याला भिक देणे ही सेवा आहे परंतु त्या भिकाऱ्यावर भीक मागायची वेळच येणार नाही अशी स्थिती निर्माण करणे म्हणजे परीवर्तन होय” अशी समाजसेवा आणि समाजपरीवर्तन यातील व्याख्या उलगडुन सांगुन परीवर्तनासाठी आग्रही कार्यकर्ते तयार करण्याचा मान त्यांना जातो.आज सरांचे वय झाले असले तरी ते अजुन थकले नाहीत.परीवर्तनासाठीची त्यांची उमेद तरुणांना लाजवेल अशीच आहे.त्यांचा या वयातील हा जोश पाहुन तरुण कार्यकर्त्यांच्या अंगात हुरुप चढतो.मात्र मनुवादी लोकांनी सरांचे कार्य,लेखन दडपण्याचा किंवा त्यांचा चुकीचा प्रचार करण्याचेच काम केल्यामुळे आज अनेक तरुण देशमुख सरांविषयी अनभिज्ञ आहेत.त्यांना सरांचे विचार,लेखन माहीतच नाही.असे तरुण कोणतीही चिकित्सा न करता मनुवाद्यांच्या प्रभावाखाली येऊन सरांवर वेडेवाकडे शब्द लिहतात.हेच मनुवाद्यांना हवंय.

म्हणुन अशा तरुणांना विनंती आहे,की मा.म.देशमुखांची पुस्तके वाचा.त्याशिवाय तुम्हाला त्यांचे कार्य समजणार नाही.पाण्याची खोली पाण्यात उतरल्याशिवाय समजत नाही.कुणाच्याही ऐकण्यावरुन मत ठरवण्यापेक्षा एकदा स्वतः वाचुन पहा.विचार करा मग मत बनवा.
आणि मा.म. सर तर स्वतःच सांगतात की,
“मी लिहलंय त्यावर तुम्ही विश्वास ठेवा असा माझा आग्रह नाही,मात्र तुम्ही त्यावर विचार करा..”
बघा विचार करायला काय हरकत आहे ?
जाता जाता मा.म.देशमुख सरांच्याच काही ओळी लिहुन लेखनाचा शेवट करतो.

एकमेका संघटीत करु|अवघे बनु कृतीवंत |
शिव-फुले-शाहू-भीमाचा मार्ग धरू|करु मनुवादाचा अंत ||

सरांच्या जिद्दीला आणि कार्याला आमच्या तमाम शिवप्रेमी मावळ्यांचा सलाम आणि सरांना दीर्घायुष्य लाभुन आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना त्यांचे मार्गदर्शन मिळत राहो या सदिच्छा..

|| जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे..!!

Leave A Reply

Your email address will not be published.