कदम परिवाराने आंबा -जांबूळ वृक्ष लागवड करून सुतक फेडले – आदर्श मार्गदर्शक विधी

0 232

कदम परिवाराने आंबा -जांबूळ वृक्ष लागवड करून सुतक फेडले
– आदर्श मार्गदर्शक विधी

नांदेड : मराठा सेवा संघाचे माजी जिल्हाध्यक्ष शिवार पुस्तकालयाचे प्रमुख पंडितराव कदम व उत्कृष्ट संगित-भजनगायक व प्रवचनकार हरिनाम कदम यांचे वडील गोविंदराव भाऊराव कदम यांचे दिनांक ५ऑगष्ट २०२३रोजी वयाच्या ८३व्या वर्षी दुःखद निधन झाले, हा अंत्यविधी हजारोंच्या उपस्थितीत पूर्णपणे ,शिवधर्म, पद्धतीने केला जिजाऊ वंदना गाऊन मुली-सुना -नाती, मुलं,नातू,नाती यांनी सामूहिक रीत्या अग्निदाह देऊन अंत्यविधी करण्यात आला.
दिनांक ७ऑगष्ट रोजी तीसऱ्याच दिवशी राख व अस्थी गंगेत न टाकता स्वतःच्या शेतात टाकून आंबा-जांभळीचे झाडे लावली अनावश्यक विधीचे कर्मकांड, प्रदुषण टाळले.राख व अस्थी स्वताच्या शेतात टाकून त्यावर आठवण म्हणून वृक्षारोपण केले व सुतक तथा विटाळ तीसऱ्या दिवशी सोडले.
प्रारंभी बळिराजा, जिजाऊ,वडिलांची प्रतीमा ठेऊन पुजन करण्यात आले.
यावेळी मुलगा हरिनाम कदम यांनी,शिवधर्म गाथेचे वाचन केले.त्यानंतर उपस्थितांना खडीसाखर खाऊ घातली व सुतक फेडले. कर्मकांडावर होणारा अनावश्यक खर्च कुटुंब व नातेवाईक, मित्रमंडळी यांचा वेळेचा होणारा अपव्यय , कुटूबाचे होणारे कदम परिवाराने टाळले. भारतीय समाजासमोर एक चांगला पायंडा निर्माण करून दिला . मराठा सेवा संघ व ३३कक्षाच्या माध्यमातून परिवर्तनवादी व अधुनिक विचारांचा वारसा कदम कुटूंबियांनी जोपासला.

यावेळी बाईलेकी, नातेवाईक,भावकी, मित्र मंडळ उपस्थित होते.भारतीय समाजव्यवस्थेत माणसाच्या आयुष्यात जन्मापासून मृत्यूपर्यंत अनेक नाहक कर्मकांड लावले आहेत.या कर्मकांडाने भारत देशाच्या प्रगतीला बाधा निर्माण होऊन खिळ बसली आहे.स्वतंत्र भारतात मोठ्या मोठ्या गप्पा केल्या जातात, कर्मकांड मात्र कायम चिटकवून आहे.
दशक्रिया व तेरवी विधी या सारख्या विधीमध्ये बडेजावच्या स्पर्धेत अनेक कुटुंबे आर्थिक संकटात सापडले आहेत.स्व:ताला सावरत भारतीयांना सावरण्यासाठी अशांच विचारांची आवश्यकता आहे.हाच मार्गदर्शक विचार आणि वसा कदम परिवाराने भारतीय समाजासमोर ठेवला आहे.गोविंदराव कदम यांच्या स्मृतीस व कदम परिवाराच्या परिवर्तन वादी विचारास व कार्यास विनम्र अभिवादन करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.