तुळजाभवानी मंदीराच्या झेंड्याने घेतला तिघांचा बळी – उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू

0 308

तुळजाभवानी मंदीराच्या झेंड्याने घेतला तिघांचा बळी
– उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू

 

वर्धा : वर्ध्या जिल्ह्यातील पिपरी मेघे येथील तुळजाभवानी मंदिरावर झेंडा लावण्यासाठी गेलेल्या तरुणांला विजेचा शॉक लागून त्याचा मृत्यू झाला तर दोघेजण जखमी झाले. जखमींना उपचाराठी रुग्णालयात घेऊन गेल्यानंतर त्यांचाही मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

गावातील तुळजाभवानी मंदिरावर झेंडा लावण्यासाठी तीन तरुण मंदिराच्या कळसावर चढले होते. मंदिरावर झेंडा लावत असताना झेंड्याचा लोखंडी खांब विजेच्या तारेला लागला. झेंडा विजेच्या तारेला स्पर्श करताच तिघांनाही विजेचा जोरदार झटका बसला. या झटक्यात घटनास्थळीच एकाचा मृत्यू तर दोघांचा रुग्णालयात मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात शोक पसरला असून परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.