संभाजी ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड.मनोजदादा आखरे यांचा वाढदिवस ‘कार्यकर्ता सन्मान दिवस’ संभाजी ब्रिगेड साजरा करणार – संभाजी ब्रिगेडचे जिल्हासचिव शेख इसाक शेख परवेज

0 83

संभाजी ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड.मनोजदादा आखरे यांचा वाढदिवस ‘कार्यकर्ता सन्मान दिवस’ संभाजी ब्रिगेड साजरा करणार

संभाजी ब्रिगेडचे जिल्हासचिव शेख इसाक शेख परवेज

 

वाशिम : संभाजी ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड.मनोजदादा आखरे यांचा वाढदिवस दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दि. ०३ सप्टेंबर रोजी ‘कार्यकर्ता सन्मान दिवस’ म्हणून साजरा करत करणार असल्याचे संभाजी ब्रिगेडचे जिल्हासचिव शेख इसाक शेख परवेज यांनी म्हटले.

त्यानिमित्त वाशिम येथे रविवार दि.३ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता शासकीय विश्रामगृह याठिकाणी ‘कार्यकर्ता सन्मान दिवस’ व जिल्हास्तरीय आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले असून या बैठकीच्या अध्यक्षस्थानी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष गणेश सुर्वे, मार्गदर्शक म्हणून संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष गजाननदादा भोयर तसेच संभाजी ब्रिगेड पदवीधर मतदारसंघाचे विभागीय अध्यक्ष प्रा.गोपाल वांडे, संभाजी ब्रिगेड विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रा.इस्माईल पठाण, संभाजी ब्रिगेड शिक्षक आघाडीचे जिल्हाध्यक्ष परमेश्वर काळबांडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहेत, अशी माहिती संभाजी ब्रिगेडचे जिल्हासचिव शेख इसाक शेख परवेज यांनी दिली.

या बैठकीत ‘कार्यकर्ता सन्मान दिवस’, संभाजी ब्रिगेड वर्धापन दिनाबाबत नियोजन, तालुका कार्यकारणी गठित करणे, इत्यादी विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. तरी वाशिम जिल्ह्यातील संभाजी ब्रिगेडचे सर्व जिल्हा पदाधिकारी, तालुकाध्यक्ष, तालुका पदाधिकारी, शाखाप्रमुख यांनी या बैठकीला वेळेवर उपस्थित राहावे.

Leave A Reply

Your email address will not be published.