आरएसएसचे वर्धा जिल्हा संघचालक जेठानंद राजपूत यांना तरुणांकडून मारहाण

0 912

आरएसएसचे वर्धा जिल्हा संघचालक जेठानंद राजपूत यांना तरुणांकडून मारहाण

 

वर्धा : जिल्ह्यातील हिंगणघाटमध्ये तरुणांकडून जेठानंद राजपूत या व्यक्तीला मारहाण केल्याची घडली आहे. सदरील व्यक्ती ही आरएसएसचे वर्धा जिल्हा संघचालक असल्याची माहिती पुढे येत असून याप्रकरणी हिंगणघाट पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे.

वर्धा येथे बसने प्रवास करत असताना बसमधल्या तरुणांनी हिंगणघाटच्या नांदगाव रस्त्यावर जेठानंद राजपूत यांना मारहाण केली केल्याचे समोर येत आहे. या मारहाणीनंतर हिंगणघाट शहरात रात्री तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर त्यांच्या समर्थकांनी पोलीस ठाण्याला घेराव घालून आरोपीवर कारवाईची मागणी केल्यामुळे हिंगणघाट पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करत एका आरोपीला ताब्यात घेतले असून त्यातील इतर साथीदारांचा शोध सुरु आहे.

आरएसएसचे वर्धा जिल्हा संघचालक जेठानंद राजपूत हे वर्ध्यावरून बसने हिंगणघाटला जात असताना बसमध्ये एका दाम्पत्याचा वाद सुरु असताना जेठानंद राजपूत हे मध्यस्ती करण्याचा प्रयत्न करत असताना वादातील संबंधित युवकांने हिंगणघाटच्या नांदगाव चौरस्त्यावर बस थांबवून जेठानंद राजपूत यांना बसखाली उतरवून मारहाण केली. त्यानंतर ही घटनेची माहीती सर्वत्र वाऱ्यासारखी पसरल्याने त्यांच्या समर्थकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी हिंगणघाट पोलीस ठाणे गाठून संपूर्ण घटनेचा आढावा घेत आरोपींना अटक करण्याच्या सूचना दिल्या. हिंगणघाट शहरात पोलिसांची कुमक बोलवत वातावरण शांत करण्यात आले.

या घटनेनंतर सोशल मीडियावर काही संदेश व्हायरल होत आहेत, त्याबद्दल पोलिसांकडून माहिती घेतली जातं आहे. सायबर टीम रात्रीपासून हिंगणघाट शहरात सोशल मीडियावर भडकवणारे संदेश पाठविणाऱ्यांचा शोध घेत आहे. रात्री शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. मात्र पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी परिस्थिती हाताळली. संबंधितांना तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले असल्याने शहरातील परिस्थिती नियंत्रणात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.