लिंग बदल केलेल्या ललित साळवेच्या आयुष्यात आनंदाची उधळण ‑ पत्नीने गोंडस मुलाला जन्म दिल्याने ललित झाला बाबा

0 43

लिंग बदल केलेल्या ललित साळवेच्या आयुष्यात आनंदाची उधळण
‑ पत्नीने गोंडस मुलाला जन्म दिल्याने ललित झाला बाबा
बीड : बीडचा हवालदार ललित साळवे याने पाच वर्षांपूर्वी लिंग बदलाची शस्त्रक्रिया करुन पुरुषाचं आयुष्य आत्मसात केले होते, याच्या आयुष्यात आता आनंदाची पुन्हा उधळण झाली आहे. मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर १५ जानेवारी रोजील लितच्या पत्नीने एका गोंडस मुलाला जन्म दिल्याने तो बाबा झाला आहे.
२०१८ मध्ये न्यायालयीन लढाई जिंकल्यानंतर ललित साळवेने शस्त्रक्रियांसाठी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस भागातील सेंट जॉर्ज या सरकारी हॉस्पिटलमधील डॉक्टरांशी संपर्क साधला. यावेळी अनुवांशिकदृष्ट्या पुरुष असल्याचे ऐकून तो भारावून गेला. ललित साळवेवर शस्त्रक्रिया करणारे प्लास्टिक सर्जन डॉ. रजत कपूर म्हणाले, की मला अजूनही आठवतं, की तो जन्माने पुरुष असल्याचे ऐकून तो कसा रडायला लागला.
ललितला केवळ जननेंद्रियाच्या पुर्नरचना शस्त्रक्रियेची गरज होती. त्याच्याकडे एक अविकसित पुरुषाचे जननेंद्रिय आणि एक अंडकोष होता, असे डॉ कपूर यांनी सांगितलं. ही शस्त्रक्रिया पूर्ण होईपर्यंत, वैद्यकीय पथकाच्या लक्षात आले, की ललित साळवेची लैंगिक कार्यक्षमता सामान्य असेल आणि शुक्राणू सर्वसामान्य असतील. त्यामुळे त्याला मूल होणे हे आश्चर्यकारक नसल्याचेही डॉक्टर म्हणाले. सामान्यपणे लिंग बदल शस्त्रक्रिया करणाºयांच्या आयुष्यात हा आनंद येईलच असे नसते, मात्र ललित याला अपवाद ठरला असल्याचे डॉक्टरांनी यावेळी त्यांनी सांगितले.
ललितला त्याच्या कुटुंबाने मुलगी म्हणून वाढवले होते. त्याच्या बालपणी एक अंडकोष काढण्यासाठी शस्त्रक्रिया देखील केली होती. ललितची पत्नी सीमावर १५ जानेवारी रोजी सिझेरियन शस्त्रक्रिया करण्यात आली. आम्ही या क्षणी खूप आनंदी आहोत, असे ललित म्हणाला.
मुलावर चांगले संस्कार करायचे
एक मुलगी असल्याने तो नेहमीच अस्वस्थ असायचा. वयाच्या ३० व्या वर्षी त्याने लिंग बदलाचे आॅपरेशन करण्याचा निर्णय घेतला. यावेळी तो म्हणाला की, मला माझ्या मुलाचे चांगले संगोपन करायचे आहे, त्याच्यावर चांगले संस्कार करायचे आहेत आणि त्याला मोठा आयएएस किंवा आयपीएस अधिकारी बनण्याची संधी द्यायची आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.