मनोज जरांगे पाटील यांच्यावर अंबाजोगाईत गुन्हा दाखल – मनोज जरांगे यांच्यासह १३ जणांविरोधात सहावा गुन्हा दाखल

0 59

मनोज जरांगे पाटील यांच्यावर अंबाजोगाईत गुन्हा दाखल
– मनोज जरांगे यांच्यासह १३ जणांविरोधात सहावा गुन्हा दाखल

बीड : मराठा समाजाचा ओबीसी आरक्षणात समावेश करावा या मागणीसाठी आंदोलन करणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर बीड जिल्ह्यात सहावा गुन्हा दाखल झाला आहे. जरांगे पाटील यांची अंबाजोगाईत संवाद बैठक झाली. याप्रसंगी खोटी माहिती प्रसारित करून सरकार विरोधात प्रक्षोभक भाषण आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून मनोज जरांगे यांच्यासह १३ जणांविरोधात अंबाजोगाईत गुन्हा दाखल झाला आहे. बैठकीचे आयोजक सचिन जोगदंड यांच्यासह १३ जणांचा यात समावेश आहे. भादवी ५०५ (१) (ब), १८८ सह कलम म.पो.का. १३५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न अद्यापपर्यंत सुटला नाही. मात्र यामध्ये आता जरांगे पाटील यांच्यावर शासन प्रशासन स्तरावर गुन्हे दाखल होत असल्याचे पाहायला मिळत आहे. शासकीय पोलीस प्रशासन आणि सरकारने गेल्या काही महिन्यात कुठेही गुन्हे दाखल केले नाही. मात्र आता मराठा आरक्षणाचा प्रश्न थंडावलेला असताना आणि त्यात सगेसोयरे या मागणीसाठी जरांगे पाटील सरकारसोबत लढा देत आहेत. यामुळे जरांगे पाटलांच्या प्रत्येक शब्दावर आता प्रशासनाचा आणि सरकारचं लक्ष आहे. यातच जरांगे यांचं अंबाजोगाई येथील वक्तव्य चर्चेत आले आहे. त्याच अनुषंगाने त्यांच्यावर आता सहावा गुन्हा बीड जिल्ह्यात दाखल झाला आहे.
नााय मिळत नाही, तोपर्यंत मी मागे सरकणार नाही
मनोज जरांगे पाटील यांच्यावर सर्वात जास्त गुन्हे बीड जिल्ह्यात असल्याने हा चर्चेचा भाग ठरत आहे. मात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर पुन्हा एकदा वडवणी या गावी मनोज जरांगे पाटलांनी अंबाजोगाईमध्ये ज्या भाषणामुळे आपल्यावर गुन्हा दाखल झाला तेच भाषण पुन्हा केले. तसेच त्यापेक्षा अधिक तीव्र भाषण वडवणी येथे करण्यात आले आहे. मात्र आता गुन्ह्यावर गुन्हे जरी दाखल होत असले तरी मराठा समाजाला जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत मी मागे सरकणार नाही, असा पवित्रा जरांगे पाटील यांनी घेतला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.