मद्य प्राशन केलेल्या पोलिसाला कैद्याकडून मारहाण

0 60

मद्य प्राशन केलेल्या पोलिसाला कैद्याकडून मारहाण

 

 

चंद्रपूर : कैद्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात घेऊन गेलेल्या पोलिसाला कैद्याने मारहाण केल्याची घटना घडली आहे. हा पोलिस कर्मचारी दारू प्राशन करून आपले कर्तव्य बजावत असल्याने कैद्याला राग आला आणि त्याने रुग्णालयातील झाडू उचलला आणि पोलिसाला झोडपून काढले. त्यावेळी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी मध्ये भाग घेऊन पोलिसाला सोडवलं.

चंद्रपूर जिल्हा कारागृहात गेल्या अनेक दिवसांपासून एक कैदी आहे. मंगळवारी ( १६ मे ) रोजी कैद्याची प्रकृती खालावली होती. म्हणून त्याला पोलीस कर्मचाऱ्यांमार्फत जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले होते. मात्र, ज्या पोलीस कर्मचाऱ्याने त्याला रुग्णालयात नेले तो पोलीस कर्मचारी स्वतः दारूच्या नशेत असल्याचे पाहुन कैद्याचे मानसिक संतुलन बिघडले. त्यामुळे त्याने हॉस्पिटलमध्ये पडलेला झाडू उचलला आणि डॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱ्यांसमोर पोलिस कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.

व्हायरल व्हिडिओमध्ये तो कैदी पोलिसाला शिवीगाळ करताना दिसत आहे मात्र दुसरीकडे त्याला घेऊन गेलेल्या पोलिस कर्मचा-याला स्वतःवर नियंत्रण ठेवता येत नसल्याचं व्हिडिओ मध्ये दिसत आहे. त्यावेळी रुग्णालयातील कर्मचारी त्या पोलिसांचे संरक्षण करताना दिसत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.