जिजामाता उद्यानातील पाण्याविना चालू असलेले शौचालय बंद करून नवीन शौचालय सुरू करावे संभाजी ब्रिगेडची मागणी

0 72

जिजामाता उद्यानातील पाण्याविना चालू असलेले शौचालय बंद करून नवीन शौचालय सुरू करावे संभाजी ब्रिगेडची मागणी

उद्यानासाठी लाखो रुपये खर्च करून अद्यावत शौचालय नसावं ही लाजिरवाणी गोष्ट

 

परळी (वार्ताहर) : परळी शहरात मध्यवर्ती ठिकाणी असलेले जिजामाता उद्यानातील बंद स्थितीत असलेले शौचालय पूर्णपणे बंद करून नवीन फूड प्लाझा च्या बाजूस असलेले शौचालय चालू करावे.अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने नगर परिषदेकडे करण्यात आली आहे. राजमाता जिजाऊ उद्यानातील उत्तरेच्या बाजूला पूर्वीचे बंद स्थितीत असलेल्या शौचालयाची अवस्था अत्यंत बिकट झाली असून त्या ठिकाणी आऊटलेट नसून शौचालयाच्या ठिकाणी पाण्याची सुविधा नाही. अशा स्थितीमध्ये उद्यानात येणारे बरेच लोक त्या शौचालयाचा सर्रास वापर करत असून त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले आहे.आजूबाजूला खाद्यपदार्थाचे मोठ्या प्रमाणात दुकाने आहेत अशा स्थितीमध्ये उद्यानात फिरायला आलेले लहान मुलं व वयोवृध्द यांच्या आरोग्यास हानी पोहोचू शकते. संबंधित शौचालय नगर परिषदेने तात्काळ बंद करून फूड प्लाझाच्या बाजूस नवीन शौचालय बांधण्यात आले आहे ते तात्काळ सुरू करण्यात यावे. अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने निवेदनाद्वारे नगर परिषदेकडे करण्यात आली असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे परळी तालुका अध्यक्ष देवराव लुगडे महाराज यांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.