सरकार चोरांच्या दारी !

0 71

सरकार चोरांच्या दारी !

 

शिवराम पाटील
९२७०९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव

 

सरकार जनतेच्या दारी,असे वरवर म्हणत असले तरी प्रत्यक्षात मात्र ते चुकीचे आहे.मुख्यमंत्री शिंदे जळगाव जिल्ह्यात येतात.कधी रात्री तर कधी दिवसा.कधी उघड उघड तर कधी कधी गुप्तपणे.यामुळे मुख्यमंत्री यांच्या जळगाव भेटीवर आम्ही जनतेचा संशय बळावतो.हे महाशय येतात तरी कशासाठी? भेटतात कोणा कोणाला? सांगतात काय?आणि घेऊन जातात काय?असे अनेक प्रश्न जनतेला पडतात.आतापर्यंत मुख्यमंत्री शिंदे जळगाव जिल्ह्यात रात्री आणि दिवसा असे मिळून किमान चार पाच वेळा येऊन गेले.मुख्यमंत्रीचे येणे जाणे म्हणजे लग्न किंवा बारशाला किंवा तमाशा ला किंवा तीर्थयात्रेला आले नसतील.कारण मुख्यमंत्री शिंदेंचा दौरा खाजगी नसतो.सर्व फौजफाटा ट्यांव ट्यांव करीत त्यांच्या मागे पुढे पळतो.एकाच दिवसात लाखो करोडोचा खर्च होतो.तितकेच जिल्ह्यातील सर्वच प्रशासकीय काम थांबते.कामाला गती मिळवण्याऐवजी काम थांबते.आठवडाभर तर तोच बहाणा सांगतात, मुख्यमंत्री जिल्ह्यात येत आहेत.साहेब तयारी करीत आहेत.तयारी म्हणजे काय हो? साहेब येणार म्हणजे ,खातीरदारी साठी वरकमाई करणाऱ्या करणाऱ्या नोकरांकडून वसुली केली जाते.नसतील करीत एखादा तर पगारातून द्यावे लागते.मग त्यांतून चलाख अधिकारी नवरदेव सारखे वागू लागतात.सरक तिकडे!माझ्याकडे फाईल आहे.साहेबांना वेळ नाही.व्हिसी चालू आहे.सात दिवस साहेब कोणालाही भेटणार नाहीत.ते बीझी आहेत. असे कसे!मुख्यमंत्री येतात तेंव्हाच काम चालत असेल तर एरवी हे नोकर वर्ग नेमके काय धंदे करतात? काम करीत नाहीत का?साहेबाच्या पुढे लगबग करणे म्हणजे फॅशन झाली आहे.साहेबाची उत्तम बडदास्त ठेवणे म्हणजे खरी सेवा.सोय ठेवणे नव्हे.सोय , सहकारी मंत्री करतात.
मुख्यमंत्री शिंदे जळगाव ला आले.म्हणाले कि, सरकार जनतेच्या दारी.खोटे आहे.साफ खोटे आहे.मुख्यमंत्री जळगाव ला येऊन जनतेला भेटत नाहीत.ते फक्त भेटतात फक्त चोरांना.म्हणून आम्ही म्हणतो,सरकार चोरांच्या दारी.मुख्यमंत्री जळगाव ला येऊन कोणाला भेटतात?पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना.ते कुठे जनता आहेत? ते तर सरकारी तिजोरी लुटणारे आहेत.त्यांनी कोरोना काळात डीपीडीसी निधीची चोरी केली आहे.याबाबत सर्विस्तर माहिती आम्ही मुख्यमंत्री शिंदेंना दिली आहे.मग काय, गुलाबराव कडून हप्तेवसुली साठी येतात का?
मुख्यमंत्री कलेक्टर ला भेटतात.येथे रेतीचा वारेमाप उपसा चालू आहे.त्यासाठी कलेक्टर ला भेटून कलेक्शन घेऊन जातात का? मुख्यमंत्री येथे येऊन झेडपी सीईओ ला भेटतात.तेथे तर घाऊक प्रमाणात भ्रष्टाचार चालू आहे.त्यांना भेटून तुमचा हिस्सा घेऊन जातात का?संशयाला जागा आहे.
मुख्यमंत्री जळगाव शहरातील रस्त्यांसाठी निधी दिला आहे.तर त्याचे कमीशन घेऊन जातात का? जळगाव मधील रस्ते जितके कागदावर आहेत,ईस्टीमेट मधे आहेत,वर्क ऑर्डर मधे आहेत तितके जमीनीवर बनवलेच नाहीत.हा फरक आमदार कडून घेऊन जाण्यासाठी जळगाव ला येतात का?
जळगाव शहरातील शिवाजी नगर पुल मंजूर झाला.वर्क ऑर्डर दिली.मक्तेदाराला पैसा तर सरकार देणार आहे कि आणखी कोणी व्यापारी किंवा कारखानदार?कि मक्तेदाराने फुकट पुल बांधून देण्याचे आश्वासन दिले आहे?शिंदेसाहेब, तुम्ही या दरम्यान जळगाव ला चार पाच वेळा आले.तर पालकमंत्री गुलाबराव यांनी किंवा आमदार भोळेंनी तुम्हाला पुलाचे अपुरे बांधकाम व त्यांचे अपुरे बीलपेमेंट साठी कांहीं सांगितले नाही का? मक्तेदाराला देण्यासाठी पैसा मागितला नाही का?कि मक्तेदाराकडून तुम्हाला तुमचा हिस्सा दिला नाही म्हणून पेमेंट अडवून धरले.तुम्हाला उत्तर द्यावेच लागेल.मुख्यमंत्री पदावर आहात तोपर्यंत तरी तुम्हाला उत्तर द्यावेच लागेल.
मुख्यमंत्री शिंदे साहेब,हे काम नाही,ते काम नाही,तर मग तुम्ही येतात तरी कशासाठी?जनतेला भेटले नाहीत.भेटत नाहीत.भेटणार नाहीत.तर मग ,भेटतात कोणाला? चोरांना? म्हणून आम्ही म्हणतो,दहा बारा चोरांना भेटण्याऐवजी दहा बारा सामान्य जनतेला सुद्धा भेटा.आमचे म्हणणे ऐकून घ्या.पालकमंत्री, कलेक्टर,सीईओ तर तुम्हाला मुंबई येऊन भेटू शकतात.तुमचा हिस्सा तेथे येऊन सुद्धा देऊ शकतात.तसे घेणे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची परंपरा आहे.हक्क आहे तुमचा.पण जळगाव येऊन त्याच त्याच चोरांना भेटण्यासाठी इतका वेळ वाया घालवू नका. कधी कधी सामान्य जनतेला भेटा.मग म्हणू आणि मानू “सरकार जनतेच्या दारी!”
मुख्यमंत्री किंवा अन्य मंत्री चा दौरा असतोच कशासाठी?प्रत्यक्ष जनतेत जाऊन जमीनीवरचे प्रश्न जाणून घेण्यासाठीच.आणि तुम्ही तर तुमच्याच ठराविक लोकांना भेटतात.जे मुंबई येऊन भेटू शकतात.येथे जळगाव आलात तर त्यांना नको, आम्हाला, सामान्य जनतेला भेटले पाहिजे.तरच तुम्हाला जमीनीवरचे प्रश्न कळतील.जर सामान्य जनतेला भेटायचेच नसेल तर का त्रास घेतात जळगाव ला येण्याचा? तुम्हाला हवे ते मुंबईतच मिळू शकते.तर मग,इतका फौजफाटा ,इतका खर्च आणि तुमच्या जीवाला नाहक श्रम देऊ नका.मुख्यमंत्री आंधळा,पांगळा,बहिरा, मुका,लुळा असला तरीही त्यांचा हिस्सा ठरलेल्या सिस्टीम ने मिळतोच.काळजी नसावी.जास्त त्रास घेऊ नका.जिवाला घोर लावून घेऊ नका.
मुख्यमंत्री शिंदे साहेब, आता जळगाव ला आलात तर मला भेटा.आधी मला मेसेज द्या.मी सांगतो तुम्हाला जळगाव ला मुख्यमंत्री चे काय काम आहे?तुमच्या नावाने मोठा भ्रष्टाचार चालू आहे.आपण समक्ष भेटून खात्री करून घेऊ कि,हे तुमच्या अपरोक्ष चालले आहे कि, तुमच्या सम्मतीने चाललेले आहे.मला भेटल्यावर , चौकशी करू,बघू ,पाहू असे उत्तर देऊ नका.आधीच माहिती करून घ्या कि, जळगाव ला कुठे कुठे कसा कसा भ्रष्टाचार चालू आहे?तितकी प्रशासकीय यंत्रणा आहे , तुमच्याकडे. मुख्यमंत्री म्हणून तुम्ही माझ्यासारख्या एका सामान्य नागरिकाला उत्तरदायी आहातच!

Leave A Reply

Your email address will not be published.