एखाद्या बाईला पुरूषासमोर नाचावे लागते ही समाजातील विकृती आहे जिला धर्माचे ठेकेदार संस्कृती म्हणतात

0 92

एखाद्या बाईला पुरूषासमोर नाचावे लागते ही
समाजातील विकृती आहे जिला धर्माचे ठेकेदार संस्कृती म्हणतात

सत्यशोधक विद्रोही व्याख्याते
प्रा.एम.एम.सुरनर

============================
२५०० वर्षापुर्वी ज्या राजकुमार युवराज सिध्दार्थाने आपल्या महालातील गणिकांच्या स्वातंत्र्याचा प्रश्न धम्मसंगिनी समोर ऊभा केला व सांगितले की ही सुध्दा जिवंत हाडा, मासांची माणसे आहेत तेंव्हा त्यांनी त्यांचे कला, कौशल्य , त्यांच्या स्वताच्या ईच्छेप्रमाणे हवे तेंव्हा, व्यक्त करावे ज्यांचे स्वातंत्र्य कुणी हिरावुन घेऊ शकत नाही भले मग तो राजा असो किंवा राजकुमार तो त्यांना गुलाम बनवु शकत नाही किंवा तो त्यांना भोगवस्तु अथवा शोभेची वस्तु बनवु शकत नाही ?

ही सम्यक व स्वातंत्र्याची, चळवळ स्वतापासुन सुरू करत गणिकांना स्वताच्या राज्यातुन स्वातंत्र्य बहाल करत गणिकांचे जीवन समृध्द करण्याचे धाडस, साहस युवराज सिध्दार्थाने करून दाखवला आहे हा त्यांचा जिवंत व ज्वलंत ईतिहास आपणास पहायाला व वाचायला मिळतो….

बाई वाड्यावर या म्हटले की चालते ?
पण ती आपली नसावी याचा अर्थ काय ?

अर्थातच ही पुरूषसत्ताक मस्तावलेली व्यवस्था जाणीवपुर्वक स्त्री जातीला मलीन, कंलकित, बदनाम व बदफैल करायला टपलेली आहे तेंव्हा आजपर्यंत अनेक चित्रपट असतील किंवा त्यातील गाणे असतील हे जाणीव पुर्वक या समाजातील पुरूष व खास करून पाटील, जमिनदार, खजिनदार, वतनदार, या नावाच्या पुरूषांना एका विशेष पात्रातुन स्त्रियांची पिळवणुक व छळ करणारी दाखल केली आहे ज्यामध्ये.करावे यतंच्या कोणत्याही यात्रेत असेल किंवा एखाद्या मनोरंजनाच्या ठिकाणी असो केवळ महिलांना पुरूषांच्या समोर नाचावे लागते किंबहुना या समाजाची समाजव्यवस्था त्या सर्वांना असे मजबुर करते की त्यांना मग पोटासाठी नाचते मी वगैरे असे म्हणत स्वताच्या आयुष्याची व स्वातंत्र्याची बळी द्यावी लागते मुळात हेच विकृतीचे सर्वात मोठे ऊदाहरण आहे ज्याला ते संस्कृतीच्या नावाचे आखुड चादर झाकन्याचा तोकडा प्रयत्न करतात…..

मुळात ज्या देशात भारतमाता प्रतिकात्मक स्त्रियांना संबोधले जाते किंवा दुर्गा,काली, चंडी, अशा अनेक बेगडी नावाने संबोधुन स्त्रियांना या देशात खुप मोठ्या ऊंचीवर ठेवले जाते असे सोंग आणि ढोंग या समाजव्यवस्थेत केले जाते त्याच सर्वात जास्त स्त्रियांवर अन्याय, अत्याचार, बलात्कार होतोच तर या पलीकडे त्यांना स्वताच्या मनाने काही खाता येत नाही पिता येत नाही याबरोबरच त्यांचा मानसिक, शारिरीक, व बौध्दिक छळ याच समाजव्यवस्थेत केला जातो हे आज आपण ऊघड ऊघड डोळ्यांने पाहुन सरळ

तिने हे करायला नको?
तिने असे वाघायला नको?
तिने असे बोलायला नको?
तिने असे वाचायला नको?
तिने असे लिहायला नको?
तिने असे ऐकायला नको?

याचाच अर्थ ती म्हनजे कोण? जिचे स्वातंत्र्य तुम्ही पुरूष म्हणुन नाकारण्याचा हट्ट करताय किंवा जिचे स्वातंत्र्य तुम्हाला स्पर्धा करायला भाग पाडते? तुमच्या डोळ्यात जिचे स्वातंत्र्य खुपतय

पण न घाबरता तुम्ही यशाची ऊंची ईतकी गाठा की लोकांनी तुमच्या प्रत्येक हालचालीची ब्रेकिंग न्युज बनवली पाहिजे अर्थातच गौतमी पाटील तिने कपडे, कसे घालावे? कपडे कोणते घालावे? कपडे किती घालावी ? अरे तिला तिचे वैयक्तिक जीवन जगण्याचे स्वात्ंत्र्य जरी भारतीय संविधानाने दिले असले तरी समाजाचे ठेकेदार तिच्या स्वातंत्र्यावर गदा घालत तिला निर्बंध लावत तिने काय करावे, काय करू नये , कोणते नाव लावावे, काणते लावु नये असे म्हणत असतील तर त्या सर्वांना फाट्यावर मारत तु तुझे कौशल्य, अदाकारी दाखवत हजारो तरूणांच्या दिलावर राज करत रहा…

जोपर्यंत भारतीय संविधान आहे तोपर्यंत या देशातील कोणतीच व्यवस्था तुझ्या कौशल्यावर अंकुश लावनार नाही फार फार तर तुझी बदनामी करतील जास्तच झाले तर तुला व तुझ्या प्रसिध्दीला थांबवण्यासाठी समाजाचे, ठेकेदार कधी तुझ्या घेतलेल्या पैसाचा तर कधी तुझ्या नावाचा डिंढोरा पिटत राहतील तु कायम तुझ्या पायांना या व्यवस्थेच्या छातीवर नाचत रहा….

तुझे आभिव्यक्ती स्वांतत्र्य तुला आबादित ठेवेल…

तुर्तास ईतकेच बाकी वेळेनुसार लेखणी नेहमीच अन्यायाच्या विरोधात विद्रोह करत राहील…..

Leave A Reply

Your email address will not be published.