लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून १६ लाचखोर ताब्यात – सापळ्यात आडकलेल्या अधिकाºयाविरोधात गुन्हे दाखल

0 5
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून १६ लाचखोर ताब्यात
– सापळ्यात आडकलेल्या अधिकाºयाविरोधात गुन्हे दाखल
छत्रपती संभाजीनगर : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्रांतर्गत केलेल्या कारवायांमध्ये महिनाभरात सात सापळे रचून १६ लाचखोर अधिकारी-कर्मचारी आणि अन्य व्यक्तींना पकडले आहे. यावेळी सापळ्यात आडकलेल्या अधिकाºयाविरोधात गुन्हे दाखल
करण्यात आले आहेत.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्रांतर्गत छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशीव हे चार जिल्हे येतात. जानेवारी महिन्यात बदनापूर तहसील कार्यालयाच्या महिला तहसीलदारासह महसूल सहायक या दोघांना ताब्यात घेण्यात आले. सात-बाºयावर वारसांची नोंद करण्यासाठी तहसीलदार व महसूल सहायकाने ३० हजार रुपयांची लाच मागितली. यानंतर बीड जिल्ह्यात गाय-म्हैस खरेदीची नोंद प्रमाणपत्रासाठी ग्रामसेवक व खासगी व्यक्तीने तीन हजार रुपयांची लाच मागितली. तसेच अदखलपात्र गुन्ह्यात मदत करण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच घेताना वाशी पोलिस ठाण्याचे दोन पोलिस अंमलदारांसह एका खासगी व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले. याशिवाय १८ जानेवारीला अपंग असल्याचे प्रमाणपत्राची नोंद सेवापुस्तिका घेण्यासाठी प्रभारी जिल्हा हिवताप अधिकारी, आरोग्य अंमलदार, आरोग्य सहायक या तिघांनी १५ हजार रुपये लाच घेताना ताब्यात घेण्यात आले.
माजलगाव येथे महसूल सहायक, महसूल कर्मचारी या दोघांनी जात प्रमाणपत्राचा प्रस्ताव तयार करण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच घेताना एसीबीच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले. तसेच बीड येथे संपादित केलेल्या मालमत्तेच्या मावेजाची रक्कम आई व मावशीच्या खात्यावर जमा करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच घेताना, उपजिल्हाधिकारी, सेवानिवृत्त मंडळ अधिकारी या दोघांना ताब्यात घेण्यात आले.  याशिवाय देशी दारूची वाहतूक करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच घेताना पोलिस हवालदार, पोलिस उपनिरिक्षक या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आली.
छत्रपती संभाजीनगर विभाग पहिल्या क्रमांकावर
राज्यात मुंबई एका सापळ्यात दोन लाचखोरांना ताब्यात घेण्यात आले आहे. ठाण्यामध्ये आठ सापळ्यांत ११, पुणे आठ सापळ्यांत १३, नाशिक सात सापळ्यांत १०, नागपूर सहा सापळ्यांत ७, अमरावती तीन सापळ्यांत तीन आणि नांदेड विभाग दोन सापळ्यांत दोन लाचखोरांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर विभाग पहिल्या क्रमांकावर होता. राज्यभरात ४२ सापळ्यांमध्ये एकूण ६४ आरोपींना ताब्यात घेण्यात आलेले आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.