बागेश्वर की भागेश्वर ?

0 637
बागेश्वर की भागेश्वर ?

 

✍🏻 नवनाथ दत्तात्रय रेपे

 

“घरी देवघर देवाला स्वतंत्र । भोजनाचे पात्र अलगची॥१॥
देवाला केवळ घालाया अंघोळ । तांब्याचे घंगाळ वेगळेची॥२॥
परी शौचकुप नाही त्या सवतं । हागावे तोंडात भक्तांच्या का॥३॥
म्हणे विश्वंभर देव ना कळला । मूढ माणसाला अजूनही ॥४॥”
वरील अभंग विद्रोही कवी विश्वंभर वराट यांनी लिहिलेला असून हा सहज लक्षात येतो तरीपण आमची लोक केव्हा कोणाचे देव्हारे मस्तकी घेऊन उड्या मारतील यांचा नेम नाही. यांचे देव आणि देव्हारे दरवर्षी बदलतात, नवीन देव बाजारात आला की लगेच त्याचा देव्हारा मस्तकी घेण्यासाठी आपली डोकी मोकळी सोडतात. आधीच इथे तेहतीस कोटींची गर्दी कमी होती म्हणून की काय इथे आसाराम, रामरहीम व राधे माॅ यांचा भरणा निर्माण झाला. मग यांची सेवा करण्यासाठी भक्तांची रांग लागू लागताच, येईल त्याचा भोग घ्यावासा वाटल्यामुळे तर आसाराम व राम रहीम नावाचे हे भक्तांच्या बुद्धीतील देव ? आज जेलच्या गजाआड सडत आहेत. यांना रिद्धी सिद्धी प्राप्त होती असा बनाव करत भक्त चौका चौकात बोंब मारत होते पण भक्तांच्याच घरची रिद्धी सिद्धी बाबा आपल्या अंगाखाली घेत होते हे भक्तांना माहीतच झालं नाही कारण ते बाबाच्या भक्तीत एवढे तल्लीन झाले होते की, घरची इज्जत केव्हा मल्लीन झाली हे त्यांनाही समजले नाही. आता तर म्हणे लोकांच्या मनातील समस्या व प्रश्न ओळखून त्यावर उत्तरे देणारा त्यो धीरेंद्र शास्त्री नावाचा ब्राह्मण म्हणजेच बागेश्वर धाम आला आहे. त्याने अनेक लोकांची नाव गाव आणि समस्यांचे पर्चे लिहले म्हणे. मग त्याने भारताचे शत्रुराष्ट चीन व पाकीस्तानच्या राष्ट्राध्यक्षांचा एखादा पर्चा बनवून त्यांना भारताची साडेसाती आहे असं का म्हटल नाही ? आमच्या लोकांना असे प्रश्न पडतच नाहीत. कारण त्यांना बुवा बाबांचे पाय चाटण्यापासून सुटकाच मिळत नाही, म्हणून तर सारा सत्यानाश आहे. पण जेव्हा या चमत्कारी बुवा बाबांना विवेकवादी लोक प्रश्न विचारून सळो की पळो करून सोडतात तेव्हा हे लोक आपल्या भक्तांमार्फत त्या लोकांना त्रास द्यायला सुरू करतात. जसं की जोधपूर येथिल न्यायालयाने आसाराम हा बलात्कार प्रकरणात दोषी आहे असं सांगितलं असतानाही आज त्यांच्या भक्तांन हा निर्णय मान्य नाही. त्यामुळे सांगावं वाटतं की, हीच ती संविधानद्रोही पिलावळ आहे, जी संविधानिक मुल्ये राजरोसपणे पायदळी तुडवून चमत्कार व बुवाबाजीला खतपाणी घालत आहे. या पिलावळीचा आणि बुद्धीचा कधी मेळ बसला असेल अस वाटतच नाही. नागपुरातून फरार झालेला बागेश्वर धाम म्हणजे धीरेंद्र शास्त्री (ब्राम्हण) याला जर आमची लोक भागेश्वर धाम म्हटली तर त्यात त्या लोकांची काय चूक आहे ?
अभाअनिसचे संस्थापक श्याम मानव यांनी बागेश्वर धामला दिव्यशक्ती सिद्ध करण्याचं ३० लाख रुपयांचं आव्हान दिलं होतं. पण हे आव्हान आपण पेलू शकणार नाही या भितीनेच त्यांने आपले गबाळ गुंडाळून नागपुरातून काढता पाय घेतला होता ? पण तो रायपूरला जाताच त्याने आपली जात दाखवायला सुरुवात केली. त्यावर ‘एबीपी माझा’शी बोलताना शाम मानव म्हणाले की, तुमच्याकडे दिव्यशक्ती असेल तर तुम्ही नागपूरला या, रायपूरला बोलवून भक्तांच्या आड कशाला लपता, धमक असेल तर नागपुरात येऊन तुमची शक्ती सिद्ध करा’. (एबीपी माझा २१ जाने २३) बागेश्वर धामला शाम मानवांनी दिलेल्या आव्हानानंतर अनेकांचा मुळव्याध ठणका देऊ लागल्याचे दिसत आहे, त्यात चंदनाची तस्करी करणारा चंदनचोर रामदेव बाबा व ज्याला श्रध्दा आणि अंधश्रद्धा, संत व ढोंगी, विज्ञान आणि चमत्कार यामधील वागंही कळत नाही त्यो पोरीची तस्करी करणारा राम कदम म्हणतो की, “स्वत:ला अंधश्रद्धा निर्मुलनकार म्हणवून घेणारे अनेकदा विज्ञानावरही विश्वास ठेवत नाहीत, हे दुर्दैव आहे. आमच्या साधु-संतांवर टीका केल्यानंतर ते लगेच राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रेस सहभागी होतात. त्यांच्या खांद्याला खांदा लाऊन फिरताना दिसतात. त्यामुळे अंधश्रद्धा निर्मुलनकार जी टीका करत होते, ती राहुल गांधींची स्क्रिप्ट होती का ? कारण काँग्रेसचा हिंदू द्वेष लपून राहिलेला नाही”. (लोकसत्ता २३ जाने २३) राम कदम आणि रामदेव बाबा ही जोडगोळी किती शहाणी आहे हे लोकांना माहीत आहे. यांच्या तोंडून विष बाहेर निघते कारण यांच्याकडे सद्सद्विवेक बुद्धीचा अभाव आहे. आपल्या उत्पादनातून मानवी हाड व काळवीटाची शिंगे खाऊ घालणारा रामदेव काय लय मोठा तत्ववेत्ता लागून गेला का ? धीरेंद्र शास्त्रीने जर हे आव्हान स्विकारले तर राम कदम यांना पोरींची आणि रामदेव बाबाला चंदनाची तस्करी करण्याची वेळच येणार नाही, कारण धीरेंद्र शास्त्रीकडे अमाप पैसा आहे मग हे ३० लाख रुपयांचे आलेले बक्षीस चाटण्याच्या कामापायी बागेश्वर बाबा या जोडगोळीला देऊ का शकणार नाही ? म्हणून तर विद्रोही कवी विश्वंभर वराट म्हणतात की,
“नाहुनी घुवूनी प्रसाद रांधला। म्हणूनी का झाला पवित्र तो॥१॥
उकडीले अंडे सोवळे नेसून। खाता हागवण लागेल का॥२॥
अत्तराचा बोळा ढुंगणी चोळला। गंध का विष्ठेला येई त्याचा॥३॥ 
म्हणे विश्वंभर आता तरी ऐका। पावित्र्याचा हेका खूळ आहे॥४॥”
धीरेंद्र शास्त्रींच्या दिव्य शक्तीला पत्रकार परिषद घेऊन काही लिखित अटीसह अभाअंनिसने रितसर वैज्ञानिक कसोट्यांवर आव्हान दिले तेव्हा  शाम मानव म्हणाले की, दिव्यशक्ती सिद्धचे प्रयोग करताना माहिती गोळा करण्याची यंत्रणा वापरली जाते. कोणत्याही यंत्रणेच्या माध्यमातून दिव्यशक्ती सिद्ध करणाऱ्यांपर्यंत माहिती पोहचू नये याची काळजी करावी लागते. ही आव्हान प्रक्रिया महाराजांच्या दरबारात पार पडणार नाही, तर ही प्रक्रिया नागपूरमधील सर्व पत्रकार व एका तटस्थ पंचसमिती समोर सिद्ध करावी लागेल. त्यामुळे महाराजांना दिव्यशक्ती सिद्ध करण्याचं ३० लाख रुपयांच आव्हान दरबारात नाही, तर नागपुरात पत्रकार आणि पंचसमितीच्या समक्ष स्वीकारावं, धीरेंद्र शास्त्रींनी त्यांचे दावे सिद्ध केले, तर मी धीरेंद्र महाराजांच्या पायावर डोकं ठेवेन आणि माफी मागेन. (लोकसत्ता २३ जाने २३) हो शाम मानव म्हणतात ते शंभर टक्के खरं आहे. कारण धीरेंद्र शास्त्रीकडे कोणत्याही प्रकारची दिव्यशक्ती नसून हा लोकांची फेसबुक प्रोफाइल हाताळून लोकांना माहीती सांगत असल्याचे आता उघड झाले आहे. बागेश्वर धाम हा रंगेश्वर नावाचा पाखंडी नागपुरातून नियोजित कार्यक्रम सोडून दोन दिवस आधीच पृष्ठभागाला पाय लावून पळाला तेव्हा त्यांचे पाय चाटण्यासाठी प्रसारमाध्यमांची चढाओढ दिसली, त्यात अग्रेसर होते ते म्हणजे एबीपी न्यूज हे चॅनल आणि त्यांची चाटूकारिता करणारा चाटूकार. त्याने तर पायावर घालीन लोटांगण वंदीन चरणन म्हणून बागेश्वर धामचे चक्क पाय चाटल्याचे दिसले. अशा चाटूकरीता करणा-या चाटूकारांमुळे बुवा बाबा आम्मा अम्मीचे स्तोम पांदीला वाढणा-या गवताप्रमाणे फोफावू लागले आहे. एबीपी न्यूजचा पत्रकार चक्क धीरेंद्र शास्त्री या पळपुट्याच्या नावाने जयघोष करताना दिसतो तेव्हा आर्टीकल १९ इंडीयाचे संपादक म्हणतात की, या न्यूज चॅनलने आपले नाव बदलुन एबीपी न्यूड करायला पाहीजे, म्हणजेच आनंद बाजार पत्रिका नंगा. नाहीतर अखंड बागेश्वर पोंगा पंडीत करायला पाहीजे. ते पुढे म्हणतात की, बागेश्वर धामची थूंकी चाटणा-या पत्रकारांना काहीच वाटत नाही. कारण ग्यानेंद्र तिवारी या पत्रकाराविषयी जी माहीती धीरेंद्र शास्त्री या पोंगा पंडीताने  सांगितली ती सर्व माहीती ग्यानेंद्र तिवारीच्या फेसबुक प्रोफाइल वर उपलब्ध होती. त्यामुळे धीरेंद्र शास्त्रीने चमत्कार नव्हे तर फेसबुकचा वापर करून माहीती सांगितली आहे. https://youtu.be/_RXcyMf2x9k
अभाअंनिसचे श्याम मानव पुढे म्हणाले, “महाराजांचा दरबार आयोजित करणारे संयोजक आणि आम्ही एकत्र बसून नागपुरातील अशा पाच लोकांना निवडू जे त्यांचेही नाहीत आणि आमचेही नाहीत, तटस्थ आहेत. यात निवृत्त न्यायाधीशांचाही समावेश असू शकेल. त्या पंचसमितीसमोर ही आव्हान प्रक्रिया दोनदा पार पडेल. पहिल्यांदा आम्ही त्यांच्या पुढे अचानक १० माणसं उपस्थित करू. त्या माणसांना पाहून या महाराजांनी नाव, वय, वडिलांचं नाव आणि त्यांचा मोबाईल नंबर सांगायचा आहे. तसेच दुस-या बाजूच्या रुममध्ये आम्ही १० वस्तू ठेऊ. त्याचं व्हिडीओ रेकॉर्डिंग होत राहील. महाराजांनी त्या १० वस्तू ओळखायच्या आहेत. ही प्रक्रिया दोनदा पार पाडली जाईल. माणसाच्या हातून चुका होऊ शकतात, पण दिव्यशक्ती १०० टक्के खरी ठरते. त्यामुळे दिव्यशक्तीच्या हातून चुका होण्याचं काही कारण नाही,” असं असलं तरी धीरेंद्र शास्त्री दोन्ही वेळा ९० टक्के माहिती बरोबर सांगू शकले तर याचा अर्थ असा होतो की त्यांच्यात दिव्यशक्ती आहे. त्यांना दिव्यशक्ती प्रसन्न आहे. त्यानंतर आम्ही त्यांना आमच्या समितीचं ३० लाख रुपयांचं बक्षीस देऊन महाराजांच्या पायावर डोकं ठेवेन आणि माफी मागेन. तसेच ४० वर्षांपासून काम करत असलेली आणि हजारो बाबांचा, मात्रिकांचा, ज्योतिषांचा भांडाफोड करणारी आमची संस्था बंद करू. (लोकसत्ता २३ जाने २३) शाम मानवांच्या आव्हानाला चॅलेंज देणा-या बुवा बाबाला मिडीयाने येवढं डोक्यावर का घेतलं ? बागेश्वर धाम या मनोरुग्णांच्या पायावर लोटांगण घेणारी मिडीया देशातील मुख्य प्रश्नावर मुक गिळून आहे. बेरोजगारी, महागाई, अग्निपथ योजनेचा कारनामा यासह असंख्य प्रश्न मिडीयाला दिसेनासे झाले आहेत, बहुतेक यांना मोतिबिंदू झाला असावा ? आरएसएस म्हणजेच राष्ट्रीय शुलभ शौचालयाचे स्वयंसेवक व मध्य प्रदेश मधील मंत्री राघव हे बाथरूममध्ये नौकरासोबत सेक्स करत होते ही बातमी प्रसारित होत होती यावर पडदा टाकण्यासाठी प्रसारमाध्यमे बागेश्वर धाम या मनोरूग्णाच्या मागेपुढे कॅमेरा घेऊन फिरत आहेत. पेट्रोल डिझेलचे ३५ रुपये दर होतील म्हणत स्वदेशीच्या नावाखाली इतरांना गोमुत्राचे डोस पाजणारा व महीलांची वेशभूषा करून पृष्ठभागाला पाय लावून पळणारा कानदेव बागेश्वर धामच्या समर्थनार्थ बोंबलताना दिसत आहे. सरकार बागेश्वरला डोक्यावर का घेत आहे ? याच सविस्तर विश्लेषण फोरपीएमचे संपादकांनी केल आहे.
लोकांच्या मनातील प्रश्न आपल्या दिव्यशक्तीने सिद्ध करणारा पाखंडी धीरेंद्र शास्त्री हा लफंगा नाहीतर कसा आहे बे अंधभक्तांनो ? तुमच्या बुद्धीत जे धर्मांधतेच शेण आहे ते थोडंसं बाहेर काढून बघा हा भागेश्वर नावाचा लफंगा चमत्कार न करता संविधानाकडे भिक मागतोय, हा भारतीय राज्यघटनेचा विजय आहे. कारण या भागेश्वरला म्हणे एका अज्ञात व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिली म्हणून याने त्या अज्ञात व्यक्तिविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. (आज तक २३ जाने २०२३) ज्या मोबाईल नंबरवरून धीरेंद्र शास्त्रीला धमकी आली त्या व्यक्तीचे नाव जर ह्या धीरेंद्र शास्त्रीला समजत नसेल तर हा  लेकांच्या नशीबाच्या पर्च्या खरच लिहत असेल का ? या पोंगा पंडीताला स्वत:ला आलेल्या धमकीची पर्ची पोलिसांत जाऊन द्यावी लागतेय तो काय लोकांची दु:ख दुर करणार आहे ? पण हे श्वानपुच्छ अंधभक्तांना कळणार तरी कसे ? वैचारिक व बुद्धीवादी लोकांनी सोशल मिडीयावर भागेंद्रचा पार लंगोट पिवळा करून सोडलेला आहे. पत्रकार प्रज्ञा मिश्रा यांनी उल्टा चष्मा या युट्यूब चॅनलवर अनेकांच्या प्रतिक्रिया घेतल्या आहेत.
https://youtu.be/Y1x1DevoTTU तर काही लोक फेसबुकवर व्यक्त होत आहेत त्यात संतोष बादाडे म्हणतात, बागेश्वर यांनी कोरोना येणार हे दिव्यदृष्टीने सांगितले असते तर भारताचा किती फायदा झाला असता मात्र त्यावेळी दिव्यदृष्टी बहूतेक पिकनिकला गेली असेल ? राकेश तिडके लिहतात की, ‘नकली बागेश्वर मध्ये इतकी दैवी शक्ती आहे तर त्याने हवामान विभागात काम करावं आणि शेतकऱ्यांना हवामानाचे अचूक अंदाज द्यावे, रॉ आणि गुप्तचर यंत्रणांना आपल्या दैवी शक्तीच्या माध्यमातून माहिती पुरवावी. सीमेवर असलेले सैनिकांना कमी करून तिथे बागेश्वरला बसवून पूर्ण सिमेची रक्षा करावी.’ तसेच प्रशांत ठाकरे म्हणतात जास्त काही नाही फक्त माझ्या एटीएमचा पासवर्ड जरी बागेश्वर बाबाने सांगितला तर मी त्याचा आजन्म चाकर बनायला तयार आहे.’ तर सरवदे लिहतात की, ‘बागेश्वरवाल्या बाबाने १४ फेब्रू सरकारच्या केसचा निकाल सांगावा, हा निकाल खरा ठरला तर मी स्वतःला पेटवून घेईन’ तर  पाखंडी बाबाचा माज उतरविण्यासाठी श्री छत्रपती सेनेच्या वतीने २१ लाख रुपयांचे बक्षीस ठेवले असून त्यात अट अशी आहे की, “धीरेंद्र शास्त्रीने श्री छत्रपती सेनेतील २१ कार्यकर्त्यांच्या एटीमचे पासवर्ड सांगायचे आहेत. त्यासाठी २१ लाखाचे बक्षीस आहे.”
दिव्यशक्ती किंवा चमत्कार हे थोतांड आहे याचे प्रयोग दाखवणारे लोक लोकांचे खिस्से कापतात हे निर्विवाद सत्य कोणीही नाकारू शकत नाही. डाॅ. अब्राहम कोवूर व जादूगार जेम्स रॅडी यांनी दिलेली आव्हाने अजूनपर्यंत एकाही बुवा बाबा किंवा साध्वी ने स्विकारले नाही तर मग शाम मानवांनी दिलेले आव्हान बागेश्वरने जरी स्विकारले असले तरी त्यांचा पंच कमिटी समोर नक्कीच भागेश्वर होईल यात तिळमात्र शंका नाही. त्यामुळे आमच्या बहुजन सामाजाने ब्राम्हणांचे जोडे उचलून त्यांच्या पायदळी पडलेले पेढे खाण्यापेक्षा बुद्ध शिव फुले शाहु आंबेडकर अण्णाभाऊ यांचे विचार आत्मसात करुन आपल्या मस्तकाची मशागत करून घ्यावी अन्यथा असे बागेश्वर फागेश्वर सारखे लफंगे तुमचे खिस्से कापून तुमच्या बायका पोरींना लुटतील त्यामुळे वेळीच सावध व्हा अन्यथा आसाराम रामरहीम प्रमाणे बागेश्वरची स्वारी तुमच्या घरात घुसेल ? तेव्हा तुम्हाला मान खाली घालण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे आधीच महापुरुषांचे विचार वाचून ताठ मानेने जगा नाहीतर सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही ! म्हणून तर शेवटी विद्रोही कवी विश्वंभर वराट यांच्याच शब्दांत सांगावं वाटतं की,
“मंदिरात उभे केले बुजगावणे। त्याशी देव म्हणे मुढ जन॥१॥
भक्त आणि देव दोघेही अंधळे। ब्राह्मणांनी मळे लुटियले ॥२॥
जावूनी बैसला विंचू पिंडीवरी। झाला अधिकारी मंदिराचा॥३॥
सांगे विश्वंभर तुम्हा हटकून। पाखंडापासून सावधान ॥४॥”
Leave A Reply

Your email address will not be published.