भाजप हिंदूंची पसंत नाही, सुरक्षित तंबू आहे

0 164

भाजप हिंदूंची पसंत नाही, सुरक्षित तंबू आहे

 

शिवराम पाटील
९२७०९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव

 

भारतात २०१४ पासून भाजपचा जनाधार वाढला आहे.कारणे आहेत.भाजप ही हिंदू लोकांची पसंती नाही.वरकरणी वाटते तसे.पण सत्य नाही.समोरचा पक्ष कांग्रेस आणि नेता राहुल गांधी कमजोर आहेत.त्यांच्याकडे राजकीय दृष्टीकोन नाही.ते सहज हात हलवत फिरतात.तरीही आपण लोक त्यांना नेता समजतो.राहुल गांधी राजकारण करीतच नाही.तसा त्यांचा पिंड नाही.पिढ्या दर पिढ्या सत्तेत असल्याने,सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आल्यामुळे त्याचा समज (गैरसमज) झाला आहे की, आमच्या शिवाय कांग्रेस ला पर्याय नाही.कांग्रेसशिवाय देशाला पर्याय नाही.म्हणून ते असे वागतात की, लोकांची गरज असेल तर आम्हाला मतदान करतील.नाही केले तरीही आमचे काही अडून जात नाही.
कांग्रेस दहा वर्षे सत्तेवर होती आणि आता नाही.तरीही राहुल गांधी यांच्या दैनंदिन जिवनावर काहीच फरक पडला नाही.देशातील कांग्रेस खासदार आमदार यांच्या दैनंदिन जिवनावर काहीच फरक पडला नाही.विचारधारावर सुद्धा काहीच परिणाम झाला नाही.ते आजही संस्थानिक म्हणजे खानदानी राजे महाराजे सारखे जीवन जगतात.सरकारी तिजोरीतून येणारा पैशांचा पाझर कमी होतो.आता ती अडचण कांग्रेस आमदार खासदारांना नाही.त्यांनी कायम स्वरूपाची उत्पन्नाची साधने बनवून ठेवली आहेत.शाळा, कॉलेज, दवाखाना, कारखाना,पतपेढी,शेती सर्वच सुरळीत चालू आहे. संगमनेरचे थोरात, नांदेडचे चव्हाण, लातूरचे देशमुख, जळगावचे पाटील, रावेरचे चौधरी यांना कोणताही प्रश्न भेडसावत नाही. इंग्रजी आमदानीत भारतातील अनेक राजे महाराजांनी इंग्रजांशी सख्य जुळवून घेतले होते.तसेच यांनी भाजपशी जुळवून घेतलेले आहे. नेटिव्ह राजे महाराजे खान पान दारू दर्फडा इंग्रजांचे सोबत एकत्र बसून करीत असत. इंग्रज देशात कायमस्वरूपी राहिले काय किंवा देश सोडून गेले का? राजे महाराजांना काहीच फरक पडला नाही.आजही जयपूर, उदयपूर, ग्वाल्हेर यांची घराणी हायप्रोफाइल जगत आहेत. स्वातंत्र्य मिळाले किंवा नसते मिळाले तरीही त्यांना काहीच फरक पडला नाही.म्हणून ते स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेच नाहीत.तसेच आज केंद्रात कांग्रेस ची सत्ता असो किंवा भाजपची सत्ता असो किंवा कम्युनिस्टांची सत्ता असो की आणखी कोणाची असो, राहुल गांधींना वैयक्तिक जीवनात काहीच फरक पडत नाही.त्यांचा दर्जा,मानपान, खानपान , राहणीमान सारखेच असते.
राहुल गांधी यांची चौथी पिढी सत्तेत असल्याने तसा परिणाम आपोआप होतो.याबद्दल त्यांना दोषी ठरवता येत नाही.इतिहासातील अनेक घराण्यांमधे तसा परिणाम झालेला आढळून येतो.ते मोगल असोत की छत्रपती असोत की पेशवा असोत कि नबाब असोत.उलट तशी परंपरा टिकवून ठेवणे ते डेस्टीनी समजतात.आणि आपण सामान्य जन त्यांच्या कडून सामान्य जनतेचे नेता असण्याची अपेक्षा ठेवतो.चुकीचे आहे.मृगजळ आहे.हे कळण्यासाठी मानववंशशास्त्राचा अभ्यास करणे आवश्यक आहे.इंग्लंडचे राजे सुद्धा असेच वागतात.त्यांची कॉलर आणि कलई चकचकीत असते.तात्पर्य राहुल गांधी जनतेचे नेते नाहीत.ते जनतेचे राजे आहेत.
वो पैदाशी शहेनशहा है,
या उनके उसुलोका गरूर!
तुम मानो या ना मानो ,
वो है तुम्हारी नजरोका कसूर!
भाजप ही हिंदूंची पसंती नाही.तो हिंदूंसाठी सुरक्षित तंबू आहे.ज्या राज्यात सबळ विकल्प आहे तेथे हिंदूंना भाजपची गरज वाटत नाही.दिल्ली,पंजाब, राजस्थान, बिहार,ओरीसा, बंगाल,केरळ, तामिळनाडू, आंध्र,तेलंगाणा, छत्तीसगड, झारखंड अशा अनेक राज्यांत हिंदू बहुसंख्य आहेतच.तरीही भाजप कडे का आकर्षित होत नाहीत?कारण तेथे प्रबळ विकल्प आहे.महाराष्ट्रात राष्ट्रवादी किंवा शिवसेना प्रबळ विकल्प देऊ शकले नाहीत.मुळातच हे वैकल्पिक पक्ष नाहीत.हे आहेत पॅरासाईट पार्टी.बांडगुळ पक्ष.जे झाड बहरले त्या झाडाचे खोड धरून जगतात.दुसरे जास्त बहारदार दिसले कि,पहिले सोडून दुसऱ्या झाडावर जाणारे पक्षी.म्हणूनच महाराष्ट्र,गोवा, कर्नाटक सारखी राज्ये दोलायमान असतात.तेथे खंबीर आणि गंभीर नेतृत्व नाही.म्हणून हिंदू लोक आशाळभूत अपेक्षेने भाजपकडे वळतात.आपण सोयीस्करपणे धार्मिक धृवीकरण म्हणतो.
महाराष्ट्र मुळातच पुरोगामी विचारांचा प्रदेश आहे.तरीही धार्मिक धृवीकरण का?कारण येथे भाजपला पर्याय देऊ शकेल असा पक्ष नाही.सत्तेत येण्यासाठी येथे छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदुधर्मरक्षक म्हणावे लागते.विद्यापिठांची नांवे जातीची मते मिळवण्यासाठी बदलली जातात. शहरांची नांवे हिंदूंची मते मिळवण्यासाठी बदलली जातात.धर्म मार्तंडांना पुरस्कार दिले जातात.हा भाजपला पर्याय देण्याचा लंगडा प्रयत्न आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.