तृतीयपंथी वाईट नसतात तर त्यांची हेटाळणी करणारे वाईट असतात

0 260

तृतीयपंथी वाईट नसतात तर त्यांची हेटाळणी करणारे वाईट असतात

 

✍🏻 दिनकर केदारी
        पुणे

तृतीय पंथी या पंथात वेगवेगळे समाजाचे लोक एकत्रित येत असतात. त्या त्या समाजात त्यांना मानाचे स्थान नसते म्हणून नाईलाजाने त्यांना एकत्र यावे लागते. प्रत्येक समाज स्वतःच्या समाजासाठी कार्येरत असतो. पण या पंथासाठी कोणताच समाज किंवा संघटना कार्य करताना दिसत नाही. त्यांच्या समस्या, उपजीविकेचे साधन या पासून तो पंथ फार दूर असतो पण शेवटी ती माणसेच असतात, त्यांना ही मन असते परंतु त्यांच्या मनाचा कोणीच विचार केला नाही.
तृतीयपंथी व्यक्तीकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा असल्याने त्यांना काम पण मिळत नाही. इतर लोक मोठ मोठे पगार घेऊन बोनस घेऊन दिवाळी साजरी करतात पण या लोकांचा विचार कोणीही करताना दिसत नाही. त्यामुळे ते स्वतःच्या उपजिवेकेसाठी पैसे मागत असताना त्यांची हेटाळणी होते तेव्हा नाईलाजाने ते चिडतात, बोलतात या मुळे तो पंथ बदनाम होतो.
हे लोक मुळात वाईट नसतात तर त्यांची हेटाळणी करणारे लोक हे बुद्धीने अल्प व मनाने हिंसक असून ते वाईट असतात. म्हणून या तृतीयपंथी लोकांना माणूस या नात्याने व प्रेमाने जवळ केले तर ते निश्चितच आपलेसे होतात.

जय जिजाऊ

Leave A Reply

Your email address will not be published.