काँग्रेसचा यूजीसीवरून मोदींवर निशाणा

0 10

काँग्रेसचा यूजीसीवरून मोदींवर निशाणा

नवी दिल्ली : विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सेल्फी पॉइंट मार्गदर्शक तत्त्वांवरून काँग्रेसने शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. यूजीसीने विद्यापीठे आणि महाविद्यालयांना त्यांच्या कॅम्पसमध्ये सेल्फी पॉइंट्स तयार करण्यास सांगितले आहे जेणेकरुन भारताच्या विकासाला चालना देणारे परिवर्तनात्मक उपक्रम हायलाइट केले जाणार आहेत़
लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान मोदी आपली मलिन प्रतिमा वाचवण्यासाठी कोणतीही कसर सोडत नसल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी एका एक्सपोस्टमध्ये म्हटले आहे की, १० वर्षात देशातील लोक या निंदनीय पातळीच्या आत्मोन्नतीला कंटाळले आहेत आणि लवकरच ते योग्य उत्तर देतील.

 

Leave A Reply

Your email address will not be published.