आमच्या लोकांना कळत तरी काय ?

0 154
आमच्या लोकांना कळत तरी काय ?

 

✍🏻नवनाथ दत्तात्रय रेपे
१. भट बोकड मोठा
२. डोळ्यात माणसांच्या फेकून धूळ गेला!
३. संविधानाच्या पडद्याआड संघोट्यांचा लिंबू
या पुस्तकाचे लेखक

 

कोरोना हे जागतीक षंढयत्र असून ते सहज लक्षात येत होतं, मात्र आमच्या लोकांनी समजून घेण्याचा कधी प्रयत्नच केला नाही. त्यांना या मनुवादी विकृतींनी टाकलेले वेगवेगळे फासे केव्हा समजणार आहेत ? पीसीआर टेस्ट किटचे संशोधक कॅरी मुलीस हे त्यांच्या मुलाखतीत म्हणाले होते की, “ही बनवलेली टेस्ट कीट कोणत्याही रोगाचा कोणताही विषाणू शोधू शकत नाही.” तर मग आता जो खरा प्रश्न आमच्यासमोर पडतो हाच की, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन व त्यांच्या इशा-यावर छम्मक छल्लो करणा-या सर्व देशांतील आरोग्य यंत्रना तसेच आयसीएमआरच्या इशा-यावर ‘मैं नाचूंगी’ म्हणणा-या भोंदू वैद्यांनी आरटीपीसीआर टेस्ट किटचा वापर करून कोरोनाचा विषाणू शोधला कसा ? यहुद्यांच्या हातच बाहुल बनलेले जागतीक भांडवलदार व प्रत्येक देशाचे सत्ताधीस यांनी आपापल्या देशात हे षंढयत्र राबवून ‘बहेती गंगा में’ म्हणत सरकारी यंत्रणांना हाताशी धरून लोकांच्या जीवाशी जो खेळ खेळला त्याला हे सरकार जेवढे जिम्मेदार आहेत तेवढेच स्वतः तुम्ही आम्ही पण आहोत. कारण सोशल हेल्थ मुव्हमेंट, अव्हेकन इंडिया या संघटना देशात सोशल मिडीया व स्थानिक पातळीवर कोरोना षंढयत्र, टेस्टींग व वॅक्शीनचे भविष्यातील तोटे/दुष्परिणाम सांगून जनजागृती करत होते. पण स्वत:ला शहाणं समजणा-या पिलावळी दुस-याचं थोडीच ऐकणार. त्यामुळे त्यांनी सोशल हेल्थ मुव्हमेंटच्या लोकांना मुर्खात काढलं. इतरांना मुर्खात काढणा-या अर्धबुद्धीच्या लोकांनो   कोणाचं काय गेलं ? कुत्रं माग लागल तर हातात काठी घेऊन कुत्र्यावर धावणारा आमचा बहुजन समाज कुठेही न दिसलेल्या व प्रयोगशाळेत न सापडलेल्या विषाणुला घाबरून दोन वर्ष दार खिडक्या बंद करून बायकोसोबत गोड गप्पा मारत बसला होता. तेव्हा सोशल हेल्थ मुव्हमेंट व अव्हेकन इंडियाचा कार्यकर्ता रस्त्यावर उतरून कोरोना हे एक आंतरराष्ट्रीय षढयंत्र आहे हे रोखठोकपणे सांगत होता‌. जे रोखठोकपणे सांगितलं जातं होत ते कुठं मिडीयाने तुम्हाला दाखवलं का ? तर मुळीच नाही कारण मिडीया ही सत्ताधारी व भांडवलदारांच्या दारात पायात शेपुट घालून तोंडातून लाळ टिपकवत बसली होती. त्यामुळे ते तुमच्यासमोर जसा आदेश येईल तसं तसा कोरोनाचा बागुलबुवा तुमच्या मन आणि मस्तकात घातला जात होता‌. सरकारनं एवढी यंत्रना लावली होती की, कोरोना या षंढयत्रामध्ये आपल काम काय ? अन् आपण करतो काय याच देहभान विसरून आमचा शिक्षक बांधव रेशन दुकानावर लोकांना ‘एक साथ खडे रहो’ म्हणत होता. 
लस म्हणजे सुरक्षाकवच आहे असं काही हेमले सतत सांगताना दिसत होते. त्यात सरकारने लोकांना लसीचे हे विष ठासण्यासाठी ‘कवच कुंडल’ हे गोंडस नाव देऊन लोकांच्या दंडाची चाळणी केली, मात्र त्याचा उपयोग काय झाला ? याच संशोधन अनेकांनी केलं त्यावेळी समोर आलेली माहीती वाचून आपल्याच धडावर आपलच मस्तक असलेला शहाणा माणूस ह्या भोंदू वैद्यांच्या पृष्ठभागावर लाथा मारू लागला तर त्यात आमचा दोष काय ? कारण NYC डिपार्टमेंट ऑफ हेल्थ अँड मेंटल हायजिनने संशोधन केलं आहे त्यात ते म्हणतात की, कोरोना लस घेतली म्हणजे तुमची कोरोनातून सुटका झाली असं बिलकुल नाही. कोरोनाचा नवा व्हेरिएंट कोरोना लस घेतलेल्यांना जास्त संक्रमित करत आहे, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. (न्यूज १५ लोकमत १९ जाने. २०२३)
लस घेऊ नका, लस म्हणजे विष आहे असं डाॅ. विश्वरुप राय चौधरी, डाॅ. तरुण कोठारी यांच्यासह अनेकजण सांगत होते पण उल्लू पॅथीच्या नादी लागून भरकटलेला आमचा बहूजन समाज ऐकतो तो कसला ? दंडात लस घेऊन दंडाची फोटो स्टेटसला लावून मोठेपणाचा आव आणणा-यांनी आता आपापल्या पृष्ठभागावर लसीचे इंजेक्शन देतानाचे फोटो काढून त्याची फ्रेम करून भिंतीला टांगली तरी आमचं त्यांच्याशी काही देणंघेणं नाही. या लसीचे फायदे सांगणा-यांसाठी आता नवी खुशखबर अशी की, दंडात झाली आता नाकात लसीची मात्रा घ्यायला तयार रहा‌. कराण भारत बायोटेक कंपनीने विकसित केलेल्या व नाकावाटे दिल्या जाणार्‍या पहिल्या कोरोना प्रतिबंधक लसीला डीसीजीआय कडून परवानगी देण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी आज भारत बायोटेकच्या पहिल्या नोजल कोरोना प्रतिबंधक लसीची खूशखबर ट्विटरच्या माध्यमातून दिली. (टीव्ही ९ मराठी ०६ सप्टें. २०२२)
लस नव्हे तर विष आहे ! असं सोशल हेल्थ मुव्हमेंट घ्या माध्यमातून जेव्हा लोकांना सांगितले जात होते तेव्हा उल्लू पॅथीचे लोक सामान्य जनतेला ती चांगली आहे म्हणत आपल्या कुटुंबांतील लोकांना न देता ते इतरांना ठासत होते. तेव्हा या लसीमुळे अनेकांना आपला प्राण गमवावा लागला होता. पण या लोकांचा मृत्यू लसीमुळे झालाच नाही असं प्रशासनांच व उल्लू पॅथीच्या लोकांचं म्हणणं होतं त्या मनोरूग्णांना सांगावं वाटतं की, नॉर्वेत फायझर-बायोएनटेकची कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर १३ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे नॉर्वेच्या आरोग्य विभागाने या लसीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले. नॉर्वेचे वैद्यकीय संचालक स्टेइनार मॅडसेन म्हणाले की, फायझर-बायोएनटेकची लस घेतल्यानंतर आतापर्यंत २३ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामधील १३ जणांचा मृत्यू या लसीमुळे झाल्याचे तपासात समोर आले. (तरुण भारत १५ जाने. २०२२) माणसांना दिली जाणारी ही कोरोनाची लस ही कशावर ट्रायल  केली होती ? प्राण्यांना दिली जाणारी लस कुत्र्यांना देऊन तिचे दुष्परिणाम समजून उमजून घेतले पण माणसांना विना ट्रायलची लस दिली अन् आमच्या मेंढ्यांप्रमाणे वर्तन करणा-यांनी पण ती आनंदाने दंडात टोचून घेतली ही खुप मोठी शोकांतिका आहे. सोशल हेल्थ मुव्हमेंटच्या माध्यमातून अनेकजण जनजागृती करत होते, मात्र स्वतःला शहाणा समजणारा आमचा बहुजन समाज लस घेऊन स्वतःची माती करून घेताना दिसला तेव्हा त्याच्यासाठी ‘अति शहाणा त्याचा बैल रिकामा’ ही म्हण लागू पडल्याशिवाय राहत नाही. कोणतीही लस देण्यापुर्वी ती प्राण्यांना देऊन तीच्या परिणामांचे परिक्षण व निरीक्षण करून त्यात बदल करूनच ती माणसांना दिली जाते. मात्र इथे माणसांपेक्षा कुत्री बरी म्हणण्याची वेळ आली आहे असंच म्हणावं लागेल. कारण हरियाणातील हिस्सार येथे प्राण्यांवरील कोरोना लसीची निर्मिती करण्यात आली. या लसीची ट्रायल २३ श्वानांवर  करण्यात आली. यातील काही श्वांनामध्ये २१ दिवसांमध्ये कोरोना विरोधात लढणा-या अॅटीबाॅडी तयार झाल्याचे शास्त्रज्ञांना दिसून आले. (लोकमत २० जाने‌. २०२२)
लस घेऊन आपल्या आयुष्याची होळी करून घेऊ नका बापहो ! टेस्टींग करू नका ! मास्क घालू नका ! असं जेव्हा मोजके लोक सांगत होते‌. तेव्हा उच्चशिक्षित पण बुद्धीने अल्प असलेला बहुजन समाजातील तरुण त्या लोकांना वेड्यात काढत होता. संसदेतील अनेक खासदारांनी लस घेतली नाही असं प्रसारमाध्यमांनी जाहीरातींच्या माध्यमातून सांगितले होते. मेडीकल क्षेत्रातील अनेक डाॅक्टरांनी आपल्या कुटुंबियांतील सदस्यांना हे लसीचे विष ठासले नाही. मात्र त्यांना सरकारने जी इतरांना लस ठासण्याची जिम्मेदारी दिली होती ती त्यांनी प्रामाणिकपणे पार पाडून लोकांच्या आयुष्याला घोडा लावला अस म्हटलं तर आमचं चुकत कुठे ? राजकारणी बांडगुळ किती नीच मानसिकतेचे असतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे तेलंगणाचे आरोग्यमंत्री एटाला राजेंदर हे पहिल्यांदा लस घेणार होते. परंतु, त्यांनी ऐनवेळी लस घेण्याचा निर्णय रद्द केला. (सरकारनामा १६ जाने २०२१ )
कोरोना षंढयत्र व्यवस्थित राबवल्या जात असताना अनेकांनी आपल्या अल्प बुद्धीचे देव्हारे माजवून कोरोनावर भलतेच उपाय सुचवले. त्यात मनोहर कुलकर्णी या भट नाकात तुपाचे बोट फिरवण्याचा व मोदींनी टाळी थाळी बदडण्याचा उपाय सुचवून आठवलेंनी ‘गो कोरोना गो’ हा मंत्र दिला त्यामुळे कोरोना गेला असं म्हणत लोक या मनोरुग्णांच्या वक्तव्याची टिंगल करत फिदीफिदी हासतात.   तर हिंदू महासभेने गोबर गोमुत्राचा काढा करून पाजण्याचा जोरदार धंदा करत लोकांना जनावरांची विष्ठा खाऊ घालून लोकांच्या बुद्धीची परिक्षा घेतली तरी आमची लोक विष्ठा खाऊन हिंदूत्वावाद्यांची निष्ठा राखत होते. आता म्हणे कॅनडा सरकारने जगातील पहील्या ‘प्लॅट बेस्ड व्हॅक्सीन’ ला म्हणजेच वनस्पतीचा वापर करून बनविलेल्या लसीला मंजुरी दिली आहे. या लसीचे नाव ‘कोव्हिफेंज’ असे असून ती लस कॅनडाच्या क्युबेक सिटीमध्ये विकसीत करण्यात आली आहे. (पुढारी २ मार्च २०२२) कॅनडा सरकारने वनस्पती पासून लस बनवली हे बघून आता तिरक्या डोळ्यांचा रामदेव बाबा उठून उद्या म्हशीच्या मुताची व्हॅक्शीन बनवून तो स्वदेशीच्या नावाखाली सरकारमार्फत लोकांना ठासू लागला तर ही आमची येडी पिलावळ खुशाल दंड अन् पृष्ठभाग उघडे करून नागडे फिरण्यास कमी करणार नाहीत. कारण विदेशी मोबाईल वापणा-यांना स्वदेशी लस ढुंगणात घेताना थोडीच कळ येणार आहे ?
कोरोना हे आंतरराष्ट्रीय षंढयत्र असून ते समजून न घेणा-या लोकांनी आपल्या दंडात विष टोचून घेतल त्यांनी आता खुशाल लसीचे डोस घेतले तरी आमचं काही देणंघेणं नाही. कारण सांगूनही न ऐकणा-या येडपटांसाठी आम्ही दुसरं काय करणार आहोत ? आज कोरोना लस ! उद्या डेंगूची लस परवा अजून कशाची तरी लस देऊन तुमच्या आयुष्याला घोडा लावण्याचा धंदा जागतीक पातळीवरून राबवला जात असून त्यात प्रत्येक देशाचे राज्यकर्ते सामिल आहेत. जे या कटात सामिल होत नाहीत त्यांना टांझानियाच्या राष्ट्राध्यक्षांप्रमाणे त्यांचा गेम केला जात आहे. त्यामुळे सर्व राजकीय पुढारी ‘तेरी भी चूप मेरी भी चूप’ करत केवळ बघ्याची भूमिका घेताना दिसत आहेत. आता तर ऑक्सफर्ड विद्यापीठातील जेनर इन्स्टिट्युटचे संशोधक मलेरिया या आजारावर मात करणारी लस विकसित करत आहेत. या लशीचे माणसांवरचे शेवटच्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल प्रगतीपथावर आहे. या टप्प्यात आफ्रिकेतील ४ हजार ८०० मुलांना मलेरियाची लस दिली जाणार आहे. (टाइम्स नाऊ मराठी ०६ डिसें. २०२०)
त्यामुळे बहुजन समाजाला सांगावं वाटतं की, तुम्हाला सरकारकडून दिली जाणारी कोणतीही लस घेऊन नका ! आजपर्यंत दिली जाणारी कोणतीही लस चांगली नाही असं पत्रकार हर्षद रुपवते यांनी आपल्या ‘लसीकरणाची रक्तरंजित कहाणी’ या लेखात सविस्तर मांडणी करून या लसीचा भांडाफोड केला आहे. तो तुम्ही वाचून आपल्या कुटुंबियांना वाचवलं पाहीजे परंतू तुम्ही वाचत नाहीत तर केवळ ऐकीव गोष्टींवर लक्ष देऊन आयुष्याची होळी करून घेण्यास तयार होतात. हे सर्वांना माहीत झाल्यामुळे नवनवीन लसी देऊन तुमच्या आयुष्याची राखरांगोळी करण्याचा जो सरकार विडा उचलत आहे तो हाणून पाडण्यासाठी कोरोना षंढयत्र कसे ? हे समजून घेण्यासाठी सोशल हेल्थ मुव्हमेंट व अव्हेकन इंडियाच्या लोकांसोबत चर्चा करून आपले कुटुंब सुरक्षित ठेवा अन्यथा लस घेऊन बसा बोंबलत.
“नवनाथ रेपे लिखित खालील पुस्तके घरपोहोच मिळतील”
१. भट बोकड मोठा
२. संविधानाच्या पडद्याआड संघोट्यांचा लिंबू
३. डोळ्यात माणसांच्या फेकून धूळ गेला!
संपर्क – रुक्माई प्रकाशन, अंजनडोह (बीड)
मो. ९७६२६३६६६२
Leave A Reply

Your email address will not be published.