महिलांच्या सन्मानासाठी मंत्रिपद सोडणारे- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर

0 118

महिलांच्या सन्मानासाठी मंत्रिपद सोडणारे- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर

 

विनोद पंजाबराव सदावर्ते
समाज एकता अभियान
रा. आरेगांव ता. मेहकर
मोबा: ९१३०९७९३००

 

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय समाजाला समता, बंधुता, न्याय, मानसिक स्वातंत्र्य बहाल करणारे एकमेव महापुरुष होत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सर्वच क्षेत्रांमध्ये जागतिक पातळीवर खूप मोठे व इतिहासिक कार्य व योगदान आहे. कृषी, अर्थ, जल, शिक्षण, कायदा, ऊर्जा इत्यादी क्षेत्रात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पारंगत होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखा विद्वान संघर्षमय व मनामध्ये कोणताही द्वेष न ठेवता सर्वांगीण विकास सामाजिक न्याय व सामाजिक समता यावर विश्वास ठेवून प्रत्येकाला विकासाची संधी निर्माण व्हावी म्हणून आयुष्यभर झटणारे, तत्त्व आणि निष्ठा याविषयी कधीही तडजोड न करणारे देशातीलच नव्हे तर जगातील एकमेव महामानव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वेगवेगळ्या क्षेत्रातील कार्य सोबतच भारतीय महिलांसाठी ऐतिहासिक असे कार्य आहे. डॉ बाबासाहेबांचा विश्वास होता ज्या समाजातील महिला शिकतील त्या समाजाचा विकास लवकर होईल. समाज विकास मोजण्यामागे महिलांचा विकास हेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे प्रमुख मापक होते. भारतीय महिला सुशिक्षित झाली. तिला लिहिता वाचता येऊ लागले. परंतु सुशिक्षित झालेले महिलांनी अपवाद वगळता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाचलेच नाही. त्यांना कधी समजून घेतलेच नाही. परंतु आज महिलांचे जे काही मानपान, सन्मान, स्वाभिमान, शिक्षण, संरक्षण, हक्क अधिकार या सर्व गोष्टी फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच. शिकलेल्या महिलांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, कार्य समजून घ्यायला वाचायला हिम्मत होत नाही. किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खालच्या जातीतील होते म्हणून त्यांना बाबासाहेबांना वाचणे आवश्यक वाटतही नसेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य व विद्वत्ता यांची दखल संपूर्ण जगाने घेतलेली असताना भारतीय समाज बाबासाहेबांना आजही जातीच्या व धर्माच्या चष्म्यातून बघतो हे चुकीचे आहे. जगातील सर्वात मोठा विद्वान भारतात असताना आम्ही त्यांना जाणून घेत नाही किंवा समजून घेत नाही यावरून आमचे शिक्षण व विद्वता दिसून येते. असो महत्वाचा मुद्दा हा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांसाठी काय काम केलेत, आणि खरंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महिलांचे उद्धार करते आहेत का? यावरती विचारविनिमय होणे आवश्यक आहे. भारतापेक्षा अनेक देश पुढारलेले होते. परंतु पुढारलेल्या देशात सुशिक्षित महिला असतानाही महिलांना समान वेतन, प्रसूती रजा, भारतीय महिलांना मिळाल्या नंतर जगातील महिलांनी प्रसूती रजा समान वेतन व मताधिकार यासाठी आंदोलने केली. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांना ते फुकट देऊन टाकलेत. याची जाणीव व माहिती आजही महिलांना नाही. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजून घेण्याची कधी तसदी महिलांनी घेतली नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे सार्वजनिक ठिकाणी महिला पुरुष असा कोणताही भेद न करता, मानव म्हणून वागणूक दिली जाते. स्त्री म्हणून शासकीय नोकरीतील पद नाकारले जात नाही, स्त्री आहे म्हणून कमी पगार न भेटता पुरुषांनी एवढाच पगार महिलांना मिळतो. याचे सर्व श्रेय फक्त डॉ बाबासाहेब आंबेडकरांना जाते. महिलांना प्रसूती रजा व पगार देणारे भारत जगातील पहिले राष्ट्र आहे. महिलांना पगारी प्रसूती रजा मिळण्यामागे फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. कामाच्या ठिकाणी महिलांना मर्यादित कामाचे तास, पिण्याचे स्वच्छ पाणी, स्वच्छतागृह, कामादरम्यान विसावा, पेन्शन, ग्रँच्युटी हे सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच मिळते. अनेक वेळा अनेक महिला बाबासाहेबांना बौद्धांचे उद्धार करते, म्हणून तुमचे बाबासाहेब अशा शब्दात बौद्ध बांधवांनी भगिनींना बोलतात. परंतु प्रसूती रजा घेताना व रजेचा 26 हप्याचा पगार घेताना बाबासाहेबांना विसरतात. नोकरी करताना पुरुषांनी एवढा पगार घेताना मात्र बाबासाहेबांना विसरतात. निवडणुकीमध्ये सहभाग घेताना उमेदवारी मिळून अर्ज भरताना, मतदार म्हणून मताधिकार बजावताना, महिला मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विसरतात. शिकलेल्या महिलांनी जर बाबासाहेब वाचले महिलांचा इतिहास जर वाचला तर मताधिकार समान वेतन प्रसूती रजा आणि पगार या गोष्टीसाठी अनेक पुढारलेल्या देशांमध्ये सुद्धा मोठमोठे आंदोलने करावे लागलेत परंतु बाबासाहेबांनी हे तुम्हाला फक्त दिले याची जाणीवच महिलांना नाही. अजून एक सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे महिलांना मानसन्मान व स्वातंत्र्य मिळावे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चार वर्षे अभ्यास करून सर्व गोष्टींची समीक्षा करून नऊ प्रकरणाचे 139 कलमांचे आणि सात परिशिष्टांचे हिंदू कोड बिल तयार केले. ज्यामध्ये महिलांच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामाच मांडलेला होता. अनेक महिलांना तर हिंदू कोड बिल काय आहे याची सुद्धा माहिती नसेल. परंतु हिंदू कोड दिलाचा फायदा आज प्रत्येक महिला घेत आहे. ज्या महिलांना बाबासाहेब आंबेडकर बौद्धांचे अस्पृश्यांचे उद्धारक वाटतात. त्या महिलांनी एकदा हिंदू कोडबील वाचून घ्यावे. भारतीय महिलांना कोणत्या ना कोणत्या कारणामुळे शिक्षण संधी यापासून दूर ठेवून पुरुषांपेक्षा हीन दुय्यम समजून विषमता निर्माण केली जात होती. महिलांना पुरुषांसमोर उभे राहणे, बोलणे अशा कोणत्याही प्रकारचे अधिकार नव्हते. तर बाकीच्या गोष्टी महिलांना म्हणजे कल्पनाशक्तीच्या बाहेरचे होते. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून महिलांच्या सर्वांगीण स्वातंत्र्याचा जाहीरनामाच मांडला त्यावेळी मात्र महिलांच्या मागासलेपणाला, महिलांच्या अज्ञानाला महिलांच्या विषमतेला, धर्माची जोड देऊन महिलांचे हक्क अधिकार नाकारण्याचा प्रयत्न त्यावेळेच्या लोकांकडून झाला. हिंदू कोड बिल काय होते? थोडक्यात जर सांगायचे झाले तर अगोदरच्या काळामध्ये एक पुरुष अनेक महिलांसोबत लग्न करू शकत होता. पुरुषाने स्त्रीला कितीही छळले तरीही पत्नी धर्म म्हणून स्त्रीला तो छळ सहन करावा लागत होता. परंतु हिंदू कोड बिल नुसार पतीला एक पत्नी जिवंत असताना दुसरी पत्नी करण्याचा अधिकार नाकारण्यात आला व एखाद्या महिलेला एखाद्या पुरुषांसोबत राहायचे नसेल किंवा पुरुष महिलेला छळत असेल अशावेळी महिलेला पुरुषांपासून घटस्फोट याचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. आज जर कोणती महिला नवऱ्याला दुसरी बायको कशी करतो म्हणून मी बघतेच अशी बोलायची हिंमत करत असेल तर, त्या बाईला ही हिंमत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच दिली. धर्म तर बोलण्याचा अधिकार सुद्धा महिलांना देत नव्हता. महिलांना वडिलांच्या संपत्ती मधील अर्धा हिस्सा हिंदू कोड बिलानुसार मिळालेला आहे. पूर्वी महिला या वारस म्हणून नसायच्या हिंदू कोड बिना मुळे संपत्तीतील वारस म्हणून महिलांचा समावेश करण्यात आला. आता वडील किंवा आईच्या निधनानंतर ज्या महिला मोठ्या थाटामाटाने भावाच्या घरी जाऊन सही देतात, आणि सही करताना जो गर्व त्यांना येतो की माझ्या सहीमुळे ही प्रॉपर्टी भावाला मिळत आहे मी जर सही नाही केली तरी प्रॉपर्टी मधील अर्धी प्रॉपर्टी मी घेऊ शकतेे. हा गर्व हा स्वाभिमान फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच आहे. एखाद्या महिलेला जर मूलबाळ होत नसेल तर त्या महिलेला एखादे बाळ दत्तक घेण्याचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या महिलेंना बहाल केलेला आहे. याच पद्धतीने अनेक महिलांना स्वातंत्र्य बहाल करणारे अनेक मुद्दे हिंदू कोड बिलांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चार वर्षे विचार विनिमय करून मांडले. होते नव विभागात विभागले गेलेले हिंदू कोड बिल 139 कलमांचे व सात परिशिष्टांचे एवढे मोठे होते. परंतु आज महिलांना हक्क अधिकार त्यामुळे महिलांचा विकास होत आहे .परंतु हिंदू कोड बिल पासच होऊ नये म्हणून त्यावेळी अनेक लोकांनी प्रयत्न केले होते. हिंदू कोड बिलाला विरोध करून आणि हिंदू कोड बिल सनातनी धर्म नष्ट करत आहे असा आरोप करण्यात येत होता. आणि हे आरोप करणारे साधेसुधे लोक नव्हेत तर देशाचे तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद देशाचे तत्कालीन प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू व त्यांचे सहयोगी यांनी हिंदू कोड बिलाला कडाडून विरोध केला. आणि ते बिल पास होऊ दिले नाही. नेहरूंनी बाबासाहेबांची समजत काढतात निवडणुका झाल्याच्या नंतर हिंदू कोड बिल पास करून देतो असा शब्द दिला म्हणजेच राजकीय सत्ता मिळवण्यासाठी महिलांना गुलाम जरी ठेवण्याचे काम पडले तरी चालेल परंतु राजकीय सत्ता हातातून जाऊ नये हा उद्देश जवाहरलाल नेहरू यांचा होता. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी क्षणाचाही विलंब न करता जर माझ्या माता भगिनींना स्वातंत्र्य बहाल करण्यात येत नसेल तर माझा मंत्रीपदावरती राहून काही उपयोग नाही म्हणून मंत्री पदाला लाथ मारून राजीनामा दिला. महिलांनी डोकं शांत ठेवून जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हिंदू कोड बिल वाचले, आणि प्रामाणिकपणे विचार केला तर महिलांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या कार्याची माहिती होईल. ज्या महिलांचे मन प्रामाणिक आहे त्या महिलांच्या डोळ्यातून अश्रू आल्याशिवाय राहणार नाही. कारण एवढे मोठे महान कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले असताना आजपर्यंत त्या कार्याची जाणीव आम्ही करून घेतली नाही. याचा पश्चाताप महिलांना झाल्याशिवाय राहणार नाही.आज प्रेमविवाहाच्या नावाखाली जे काही आंतरजातीय विवाह होतात, या आंतरजातीय विभागाची तरतूद सुद्धा हिंदू कोड बिलामध्येच होती. आणि म्हणून या हिंदू कोड बिल आला तत्कालीन सत्तेतील लोकांनी विरोध करताना तुम्ही हिंदू धर्मातील जाती, धर्म नष्ट करण्यासाठी हे हिंदू कोड बिल तयार केलेले आहे अशी कडवट टीका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर केलेली आहे. हिंदू कोड बिल म्हणजे धर्मांचा तिरस्कार करणारे बील आहे मग हिंदू कोड बिल म्हणजे हिंदू धर्मातील अनिष्ट चाली रुढी परंपरा या बाजूला सारून महिलांना मानसन्मान स्वाभिमान व समता बहाल करणारे हिंदू धर्मातीलच संशोधित कार्य केलेले बिल होते. परंतु बाबासाहेबांनी मांडलेले बिल तत्कालीन लोकांना कळेल एवढी त्यांची विद्वत्ता व समज नसेल. म्हणून त्यांनी त्यावेळेस त्या बिलाचा विरोध केला. मग प्रश्न हा आहे आज जेव्हा महिला वडिलांच्या संपत्तीचा अर्धा हिस्सा घेतात तेव्हा धर्म बुडतो का ?विधवा महिलांनी पुनर्विवाह केला तर धर्मापुरतो का ? विधवा महिलांनी पुनर्विवाह करण्याची परवानगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हिंदू कोड बिलामुळे. मिळाली महिलांनी एखाद्याला दत्तक घेतले किंवा प्रेमविवाह करून आपला संसार थाटला तर धर्म पडतो का? महिलांनी आपली आवड निवड व आपले मत मांडले तर धर्माबुडाला
तो का ? आणि ज्या महिलाना जर वाटत असेल बाबासाहेबांनी आमच्यासाठी काहीच केले नाही तर वरील लाभ ज्या महिला घेतात त्यांनी लाभ हे बंद करावे. कारण ही सर्व देण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे. आज महिला अनेक मागण्या सरकार समोर मांडतात परंतु सरकार त्यांची दखल सुद्धा घेत नाही. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांना जे काही दिले त्याची मागणी कोणी केली नव्हती उलट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा महिलांना हे देण्याचे ठरवले तेव्हा अनेक लोकांनी त्याला विरोध केला, तरीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मतावर विचारावर ठाम राहिले आणि त्यावेळेस नाकारलेले हिंदू कोड बिल वेगवेगळ्या भागांमध्ये मान्य करून त्याच्या कायद्यात रूपांतर करण्यात आले.म्हणून महिलांनी एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य ,हिंदू कोड बिल वाचायला पाहिजेत. महिलांच्या हितासाठी स्वतःच्या स्वतःच्या मंत्री पदाचा राजीनामा देऊन फक्त आणि फक्त महिलांचे हक्क अधिकार बहाल करण्यासाठी लढणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करण्याचा ठेका फक्त बोद्धांचा नाही आहे. प्रत्येक महिलांनी दररोज बाबासाहेबांचे कितीही आभार मानले तरीही बाबासाहेबांच्या ऋणातून त्या कधीही मुक्त होऊ शकत नाहीत. एवढे अपार मोठे कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आहे. परंतु शोकांतिका अशी आहे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांच्या हक्क अधिकारासाठी मानवी स्वातंत्र्यासाठी मंत्रीपदाचा राजीनामा दिला ,ते बाबासाहेब त्या बाबासाहेबांचे विचार आजही महिलांना माहिती नाहीत. कधी वाचले नाहीत कधी समजून घेतले नाहीत. आणि ज्या लोकांनी हिंदू कोड बिलाला अर्थातच महिलांच्या सर्वांगीण विकासाला विरोध केला होता त्या लोकांचे गुणगान गायले जाते. थोडक्यात काय तर महिलांचा विकास म्हणजे धर्माचा नाश समजावून समजणाऱ्या लोकांचे कार्य महिलांना माहिती आहेत .परंतु महिलांचा विकास म्हणजे समाजाचा विकास आणि हा विकास होण्यासाठी आयुष्यभर ज्या महामानवांनी त्या महामानवाबद्दलच आज समाजामध्ये अज्ञान आहे. हीच खूप मोठी शोकांतिका आहे. किमान येणाऱ्या जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य विचार व हिंदू कोड बिल महिलांनी वाचून समजून घेतले तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांसाठी केलेल्या कामाचे सार्थक होईल. व महिलांना आपल्या उद्धारकर्त्यांची जाणीव होईल.

Leave A Reply

Your email address will not be published.