तुम्ही जे गोमूत्र प्राशन करता, ते मानवासाठी धोकादायक संशोधकाचा निष्कर्ष

0 150

तुम्ही जे गोमूत्र प्राशन करता, ते मानवासाठी धोकादायक संशोधकाचा निष्कर्ष

 

 

नवी दिल्ली : आयुर्वेदाचा संदर्भ देऊन काही आजारांमध्ये गोमूत्राचे सेवन फायदेशीर असल्याचे सांगत ते पिण्याचा सल्ला अनेकवेळा दिला जातो. मात्र असे असले तरीही गोमूत्र सेवन करणे मानवासाठी चांगले नाही, असे नुकत्याच झालेल्या एका संशोधनातून स्पष्ट झाले आहे. या संशोधनानुसार, यातील काही बॅक्टेरिया हानिकारक देखीदेखील ठरू शकतात. उत्तर प्रदेशातील बरेली येथील इंडियन व्हेटर्नरी रिसर्च इन्स्टिट्यूट, या देशातील प्रमुख प्राणी संशोधन संस्थेत केलेल्या संशोधनात असे आढळून आले की म्हशीचे मूत्र काही जीवाणूंवर अधिक प्रभावी होते.

गेल्या काही वर्षात आपल्या देशात गायीवरुन जोरदार राजकारण सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. गाईचे महत्त्व पटवून देण्यासाठी आणि गाय हा किती उपयुक्त पशू आहे हे पटवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात असतात. अशातच गाईचे मूत्र अर्थात गोमुत्र हे किती फायदेशीर आहे हे कायमच सांगितले जाते. हिंदू संस्कृतीमध्ये गोमुत्राचे खूप महत्त्व असून अनेक शुभकार्यात गोमुत्राचा वापर केला जातो. तसेच ताजे गोमूत्र अत्यंत पवित्र मानले जाते. अनेक आजारांवर उपाय म्हणून गोमुत्र प्यायला दिले जाते. मात्र नुकत्याच झालेल्या संशोधनातून वेगळीच माहिती समोर आली असून गोमूत्रात धोकादायक जीवाणू असतात, अशी माहिती समोर आली आहे. हे बॅक्टेरिया मनुष्यासाठी धोकादायक ठरू शकतात.

विशेष म्हणजे, भारतीय बाजारपेठेत अनेक पुरवठादारांकडून गोमूत्र मोठ्या प्रमाणावर भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) ट्रेडमार्कशिवाय विकले जाते. बरेली येथील ICAR-इंडियन व्हेटर्नरी रिसर्च इन्स्टिट्यूट (IVRI)संस्थेत भोजराज सिंह यांच्या नेतृत्वाखाली पीएचडीच्या तीन विद्यार्थ्यांनी गोमूत्राचा मानवावर वापर करण्याबाबत संशोधन करण्यात आले. या संशोधनात असा दावा करण्यात आला आहे की निरोगी गायी आणि बैलांच्या लघवीच्या नमुन्यांमध्ये कमीतकमी 14 प्रकारचे हानिकारक जीवाणू असतात, ज्यामध्ये एस्चेरिचिया कोलाईचा समावेश आहे, ज्यामुळे पोटात संक्रमण होऊ शकते.

या संशोधनाचे निकाल रिसर्चगेट या ऑनलाइन संशोधन वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आले आहेत. या संस्थेतील एपिडेमियोलॉजी विभागाचे प्रमुख असलेले सिंग म्हणाले की, गाय, म्हशी आणि मानवांच्या 73 लघवीच्या नमुन्यांचे सांख्यिकीय विश्लेषण दाखवते की म्हशीच्या मूत्रातील किटाणूंच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ गायींच्या लघवीपेक्षा कितीतरी पटीने चांगला आहे. म्हशीच्या मूत्राचा एस एपिडर्मिडिस आणि E. rapontici सारख्या किटाणूंवर तीव्र प्रभाव पडतो

आम्ही स्थानिक डेअरी फार्ममधून तीन प्रकारच्या गायी – साहिवाल, थारपारकर आणि विंदावणी (एक संकरित जाती) तसेच म्हशी आणि मानवांच्या लघवीचे नमुने गोळा केले. जून आणि नोव्हेंबर 2022 दरम्यान केलेल्या आमच्या अभ्यासात असा निष्कर्ष काढण्यात आला आहे की, वरवर पाहता निरोगी व्यक्तींच्या लघवीच्या नमुन्यांच्या मोठ्या प्रमाणात संभाव्य रोगजनक जीवाणू असतात, असे त्यांनी सांगितले. कोणत्याही परिस्थितीत मानवी वापरासाठी लघवीची शिफारस केली जाऊ शकत नाही, असेही ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.