परिवर्तनाचा दीपस्तंभ : महात्मा बसवेश्वर 

विषमतेच्या खडकाला अवीरत धडका मारून विज्ञानाच्या प्रवाहाने प्रवाहीत झालेली व भगवान बुध्दाच्या धम्मसागराला मिळालेली ज्ञानगंगा म्हणजे बसवेश्वर. दगडाला देव माणणा-या व माणसाला दगड मानणा-या मनात माणूसकीची ज्योत पेटवणारा दिपस्तंभ म्हणजे बसवेश्वर.'

0 609
परिवर्तनाचा दीपस्तंभ : महात्मा बसवेश्वर 

 

✍️ रेपे नवनाथ दत्तात्रय
     लेखक
      १. भट बोकड मोठा
      २. संविधानाच्या पडद्याआड संघोट्यांचा लिंबू
      ३. डोळ्यात माणसांच्या फेकून धूळ गेला !
      मो. ९७६२६३६६६२

 

“पाषाणाचा देव, तो नव्हेचि देव ! मत्तिकेचा देव, तेथे नाही देव !
सेतू रामेश्वर गोकर्ण केदारी ! पुण्य काशीक्षेत्र, तेथ नाही देव !
अडूसष्ट तीर्थी तयाची वसती ! ऐसे जरी बोलती, तेथ नाही देव !”
अस म्हणणा-या महात्मा बसवेश्वरांचा जन्म ११०५ मध्ये अक्षय तृतीयेच्या दिवशी कर्नाटक राज्यातील विजापूर जिल्ह्यातील बागेवाडी येथे झाला.  महात्मा बसवेश्वरांची पहीली जयंती १९९३ मध्ये कर्नाटकचे गांधी म्हणून ओळखले जाणारे हर्डेकर मंजप्पा यांनी कर्नाटक येथिल दावणगेरे येथे सुरू केली. याच बसवेश्वरांविषयी किसन सुर्यवंशी म्हणतात की, सुर्याची उष्णता, चंद्रांची शितलता, पृथ्वीची सहनशीलता आणि हवेची उदारता म्हणजे बसवेश्वर. विषमतेच्या खडकाला अवीरत धडका मारून विज्ञानाच्या प्रवाहाने प्रवाहीत झालेली व भगवान बुध्दाच्या धम्मसागराला मिळालेली ज्ञानगंगा म्हणजे बसवेश्वर. दगडाला देव माणणा-या व माणसाला दगड मानणा-या मनात माणूसकीची ज्योत पेटवणारा दिपस्तंभ म्हणजे बसवेश्वर.’ बहुजन समाजाला सांगाव वाटत की, जयंती ही कोणाचीही साजरी केली जात नाही कारण समाजात अनेक लोक होऊन गेले पण त्यांची जयंती कोणी सुरू करते का ?तर नाही कारण ते स्वतःच आयुष्य केवळ स्वतःच्या कुटुंबियांसाठी खर्च करत असतात. मात्र बहुजन समाजातील महापुरुषांनी स्वतःच आयुष्य केवळ समाजाच्या उद्धारासाठी व उन्नतीसाठी खर्ची घातल म्हणून त्यांच्या कार्याला नव्याने उजाळा देऊन त्या कार्याचा आजचा तरुणांनी बोध घेऊन त्या महापुरुषांच्या विचारांचा वसा आणि वारसा पुढे घेऊन जावा हाच जयंती करण्यामागचा उद्देश असतो. पण आजचे जयंतीबहाद्दर लोक केवळ चौकात महापुषाचे पुतळे उभा करून एक दिवसाचा उदो करून बाकीचे दिवस त्या महापुरुषांच्या विचार व कार्याचा विसर पाडतात हीच खुप मोठी शोकांतिका आहे.
बसवेश्वरांची बुध्दी तल्लख  चाणाक्ष असल्यामुळे ते हुशार होते कारण त्यांनी बालपणीच अनेक प्रश्न उपस्थित करत नवी आव्हणे उभी केली होती. एकदा बसवण्णाचे वडील देवपुजा करत होते, बस्वण्णा खेळून धापा टाकत घरी आले असता त्यांनी वडीलांना पाणी मागताच त्यांनी थोडा वेळ थांबण्यास सांगितले. तेव्हा बस्वणणानी घरातील कुदळ  घेऊन खड्डा खोदण्यास सुरुवात केली. तेव्हा वडीलांनी विचारले की, काय करत आहेस तेव्हा बसण्णांना म्हणाले मला तहाण लागली आहे त्यामुळे कोणत्या खड्यात पाणी आहे हे बघत आहे. त्यावेळी वडील म्हणाले अनेक ठिकाणी खड्डे खाणण्यापेक्षा एकच खड्डा असता तर पाणी लागले असते. तेव्हा एका क्षणात बस्वण्णा म्हणाले की, तुम्ही तर घरात अनेक देवांची पुजा करता, त्यापेक्षा एकाचीच पुजा मन लावून केली तर तो देव प्रसन्न होणार नाही का ? तुम्हाला अनेक देवांची पुजा करण्याची गरजच पडणार नाही असे उद्गार त्यांनी काढले.
आज आमचे सुशिक्षित तरुण जातीवाद व वर्णव्यवस्थेचे समर्थक असून ते मंदीरातील गटारगंगेत स्नान करून स्वतःच्या पापाची मुक्ती केल्याचा आव आणत नवीन कुकर्म करण्यासाठी परवाना रिनिव्ह करून घेतात त्यांना सागावं वाटत की, आज तुम्ही विज्ञान युगात खुळचट कल्पनांच्या आहारी गेलात पण १२ व्या शतकात बस्वण्णा विचार करत की, उच्च कुळातल्या व्यक्तीचे व खालच्या वर्गातील व्यक्तीचे रक्त लालच आहे. मग हा भेदभाव का ? एकदा गुरुकुलात समारंभ आयोजित केला होता त्यात बस्वण्णा म्हणाले की, पाणी पाहता डुबकी मारणे, झाडाला प्रदक्षिणा घातल्याने देवाचे स्वरूप कळणे शक्य नाही. काशीच्या गंगेत स्नान केल्याने पापक्षालन होते ही समजूत खुळी आहे. तसेच देव व मुर्तीविषयी बसवेश्वर म्हणत की,
“लाखाने घडली मुर्ती ती पघळे, देवत्व कैसे अग्नीत वितळे ?
गरजेनूसार ते जाती विकले, सांगा तयांना का देव मानू ?
भीतीने दडती मातीत लपती, सोन्या चांदीची ऐशीच मुर्ती
सहज भावे निजेकेय असती, कुडलसंगमदेवास देव मानू.”
आज तेहतीस कोटी देवांचा भरणा असतानाही देशात काही ठिकाणी नरेंद्र मोदी, नथुराम गोडसे यांची मंदीरे स्थापन करून नवा उद्योग निर्माण करण्याच काम देशात सनातनी बांडगूळ करू पाहत आहेत. त्यांना सागावं वाटत की, महात्मा बसवेश्वरांनी अनेक देव देवतांची पुजा नाकारून चिरंतन, निराकार, निर्गुण, सर्वव्यापी असलेल्या वस्तूची पुजा करण्यासाठी बसवण्णांनी ‘इष्टलिंग’ देऊन कधीही केव्हाही कितीही वेळा देवपुजा करण्याचा मार्ग दाखवला. इष्टलिंगाची पुजा करतेवेळी कोणत्याची पुरोहीताची गरज नाही म्हणजे देव व भक्त यातील दलालांना हद्दपार करण्याच काम महात्मा बसवेश्वरांनी केल. देवा धर्माच्या नावावर बहुजन समाजाचा जेवढा छळ होतो मात्र त्यांना त्यातच सुख वाटत कारण उच्चवर्णीयांना वगळता आजही इतरांना मंदीराच्या गाभा-यात प्रवेश न देता त्यांना धक्कबुक्की करून ञास दिला जाते. म्हणून बसवेश्वरांच्या शब्दात सांगावं वाटत की,
“देव चांगला आहे म्हणून त्याच्या नादी नको लागू
ञास देणारा कधी चांगला असतो ?
रडविणारा हसविणारा कधी चांगला आहे ?.”
आजच भयानक वास्तव म्हणजे आमचे बहुजन समाजातील उच्च शिक्षित तरुण रस्ता ओलांडताना समोर मांजर जरी गेली तरी अपशकून मानतात यांना खरच उच्चशिक्षित म्हणावे का ?कारण मग हे असे अंधश्रध्दाळू लग्न उत्सव करताना मुहुर्त, कुंडली, राशी बघितल्याशिवाय कोणतही काम करताना दिसत नाहीत. ते शकून अपशकूनच्या फे-यात गुंतले आहेत त्यामुळे यातील अनेकांच्या लग्नपत्रिका जूळत नसल्या कारणाने अनेकांनी स्वतःचे विवाह मोडले आहेत आहेत. बसवण्णाच्या काळातही ते शकून अपशकून कंडली पत्रिका यांचे थोंताड होते तेव्हाही अनेक अनेकांची लग्न मोडल्याचे उदाहरण होती म्हणून महात्मा बसवेश्वर म्हणत की,
“पुजता स्वजन सांगा हीच शुभघटी शुभलग्न,
सांगा हो जमल्या राशी ऋण संबंधही जुळले
आज सांगा हा चंद्रबल ताराबलही लाभले
सांगा हा उद्यापेक्षा आजचा दिन मंगल हे.”
आमच्या लोकांची कमई कमी अन् हे धर्मांच्या नावाने जास्त उधळपट्टी करताना दिसतात. लेकरांच्या शिक्षणासाठी पैसा खर्च करण्यासाठी पालकांचे हात थरथर कापतात पण मंदीराच्या दानपेठ्या भरताना मात्र यांच्या हाताला थरथरी सुटत नाही त्या बांडगुळांना सांगाव वाटत की, महात्मा बसवेश्वरांनी देवळातील स्थावर लिंगाची पूजा करण्यापेक्षा ‘इष्टलिंग’ तळहातावर ठेवून कोठेही पूजा करा. ते गळ्यात धारण करा मग तुमचा देहच देवालय बनेल असे सांगून मनापासून केलेले प्रत्येक काम हीच खरी शिल उपासना असून शारीरिक श्रम व व्यवसाय हाच स्वर्ग आहे असा सिध्दांत मांडला आहे. मग आज तुम्ही नेमक करतात तरी काय ?हा एक मोठा संशोधनाचा विषय होऊ शकतो. तसेच आज एखाद्या कुटुंबातील तरुणांने आंतरजातीय विवाह केल्यानंतर समाज त्याला हीनतेची वागणूक देतो त्या विकृत लोकांना सांगावं वाटत की, बसवेश्वरांनी तत्कालीन समाजव्यवस्थेतील धर्ममार्तंडाना हादरा देत १२ व्या शतकात मागास समाजातील संत हरळ्या यांचा मुलगा शीलवंत व ब्राम्हण समाजातील मंत्र्यांची मुलगी कलावती यांचा विवाह घडवून आणला होता. त्यामुळे तत्कालिन ब्राम्हण समाजाने बस्वण्णांना हद्दपार करण्याचा कट केला होता त्यात मंत्री मंचण्णा, नारायण भट, विष्णुभट्ट, राजकुमार व इतर ब्राम्हणांची गुप्त बैठक झाली होती. मग आज आमचा बहुजन समाज या भटानच्या पायावर माथा का टेकतोय ?बसवेश्वरांनी ब्राम्हण व ब्राम्हणी व्यवस्थेला नाकारल होत मात्र आज त्यांचेच भक्त भटांच्या पायावर लोळण घेत नाक घासताना दिसतात ही खुप मोठी शोकांतिका आहे. पण भटांच्या चरणावर लोळण घेणा-यांना सांगावं वाटत की, महात्मा बहवेश्वरांनी शास्ञ वेद नाकारले होते म्हणून तर ते म्हणतात की,
“वेदांवर खड्ग चालवीन , शस्ञांना बेड्या घालीन !
तर्काच्या पाठीवर चाबकाचे फटकारे ओढेन !.”
चर्चा, परिसंवाद यांच्या माध्यमातून लोकांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने बसवेश्वरांनी अनुभव मंडपाची स्थापना केली. ही संस्था म्हणजे त्या काळातील पहीली लोकशाही संसद होती. मंडपातील एकूण सभासद  संख्या ७७० होती. यात संवाद वाद विवाद व विचारांचे आदान प्रदान करण्यासाठी सर्वजण जमत असत. त्याचबरोबर जगात कोणी लहान मोठा उच्च निच नसून ख-या देवाच्या दर्शनाला जायची गरज नाही अशी शिकवण अनुभव मंडपातून दिली जाऊ लागल्यामुळे ब्राम्हण वर्ग पिसाळल्या सारखे करू लागला. त्यांनी अनुभव मंडपावर बंदी घालण्याचीही मागणी केली होती. पण आज मंदीरासमोरील लांबच रांग पाहील्यास वाटत की, समाजाला महात्मा बसवेश्वर समजलेत का ?म्हणून तर परिवर्तनाचा दीपस्तंभ महात्मा बसवेश्वर या पुस्तकात किसन सुर्यवंशी म्हणतात की, अनुभव मंडप म्हणजे सामान्य माणसांच्या वेदनेवर मानवी मूल्यांची उथळ माथ्याने उधळणारी मुक्ताफळे. समता, मानवतेच्या तत्वाची चर्चा करणारी एक धर्मसंसद. विषमता अज्ञानाच्या जगात तळपणा-या जीवांना जीवन जगण्याची कला शिकविणारे विद्यापीठच होय.
आज घडीला शिकली सवरलेली लोक नवी मंदीर बांधण्यासाठी एकमेकांच्या कत्तली करताना दिसत आहेत. तर काही देवा धर्माच्या नावाने राजकारण करून फायदेपंडीत होताना दिसत आहेत. पण प्रबोधनकार ठाकरे म्हणतात की, आजपर्यत एकही भट मंदीरासाठी मेला याची इतिहासात नोंद नाही. मग प्रश्न पडतो की, मंदीरासाठी मरतात कोण तर बहुजनातील तरुण त्या तरुणांना सागावं वाटत की, केवळ महापुरुषांच्या जयंत्या करून उपयोग होणार नाही तर त्या महापुरुषांचे विचार डोक्यात घेऊन जयंती साजरी करावी व ती करताना महात्मा बसवेश्वरांचे विज्ञानवादी विचार घराघरापर्यत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील तेव्हाच ख-या अर्थाने महापुरुषांच्या अपेक्षित असलेली समाज व्यवस्था निर्माण होईल. नाहीतर महापुरुषांना विसरल्यामुळे समाजाचा सत्यानाश तर होतच आहे.
आमच्या बहुजन समाजाने महापुरुषांना डोक्यावर घेऊन कर्नकर्कश आवाजात धांगडधिंगा करण्यापेक्षा त्यांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी गावागावात तुकोबांच्या गाथेच पारायण, महात्मा जोतिबा फुलेंच्या अखंडाचे वाचन व बसवणांच्या विचारांचे जाहीर कार्यक्रम लावले तरच हा अंधश्रद्धेच्या चिखलात रुतून बसलेला समाज बाहेर येईल. महापुरुषांना वाचलेला माणूस कधीच धर्माचा गांजा खेचून त्यांची नशा करत नाही, पण आमचे येडे मात्र महापुरुषांच्या विचारांना तिलांजली देत रामदासी पंथच्या नादी लागून भलत्याच विकृतींना डोक्यावर घेऊन मिरवतो या मानसिकतेला दुस-याचा बाप आपलाच आहे असं समजणं आहे पण हे आमच्या मुर्खांना कळत तरी कुठे. तेव्हा अशा या तमाम मुर्खांना सांगाव वाटतं की, तुम्ही कधी वाचणार आहेत महापुरुषांना, डोक्यावर घेऊन मिरवणे म्हणजे महापुरुषांच्या विचारांचा असणे नव्हे ! आपण आपल्या समाजाला महापुरुषांचे विचार जेव्हा समजून सांगाल तेव्हाच ख-या अर्थाने महापुरुषांची जयंती साजरी झाली असे म्हणता येईल अन्यथा तुम्ही करताय ते वर्तन म्हणजे छोट्या लेकरांप्रमाणे नाच रे पोरा डीजेच्या तालात असंच म्हणावं लागेल ही खुप मोठी शोकांतिका आहे.
“धनिक बांधती देवालय, देवा गरीब मी करू काय ?
देहच माझे देवालय, पायच माझे देवळांचे खांब
मस्तक माझे देवळाचे कळस, स्थावर नावे पारा !”
सर्व भारतीयांना महात्मा बसवेश्वर जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…!

 

(नाचणे बंद अन् वाचणे सुरू करा – नवनाथ दत्तात्रय रेपे)

नवनाथ रेपे लिखित खालील पुस्तके घरपोहोच मिळतील

      १. भट बोकड मोठा
      २. संविधानाच्या पडद्याआड संघोट्यांचा लिंबू
      ३. डोळ्यात माणसांच्या फेकून धूळ गेला !
संपर्क : रुक्माई प्रकाशन, अंजनडोह (बीड)
rukmaipub@gmail.com
मो. ९७६२६३६६६२
Leave A Reply

Your email address will not be published.