मनोहर कुळकर्णी उर्फ संभाजी भिडेला महाराष्ट्रातून तडीपार करा

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार मंचाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

0 94

मनोहर कुळकर्णी उर्फ संभाजी भिडेला महाराष्ट्रातून तडीपार करा
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार मंचाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

 

तिवसा : राष्ट्रपिता महात्मा गांधी, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू, संत तुकाराम महाराज, बहुजन समाजातील संत, महापुरुष आणि आमच्या तमाम माता भगिनींच्या संदर्भात अत्यंत खालच्या दर्जाचं अपमान जनक विधान करुण समाजात तेढ निर्माण करण्याचे काम मनोहर कुळकर्णी उर्फ संभाजी भिडे हा वाचाळवीर नेहमी करत असतो. अलीकडेच अमरावती येथील जाहीर सभेत राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विषयी अत्यंत आक्षेपार्ह विधान केले.

त्याच्या या विधानामुळे समाजात अत्यंत संतप्त प्रतिक्रिया येत असून तीव्र नाराजी व्यक्त केल्या जात आहे. तेव्हा अशा विकृत मेंदूच्या माणसाने केलेल्या या देशद्रोही कृत्यामुळे आमच्या भावना दुखल्या असून आम्ही मनोहर कुळकर्णीचा जाहीर निषेध करतो. तेव्हा शांतता प्रस्थापित करण्यासाठी मनोहर कुळकर्णी उर्फ संभाजी भिडे ह्याला तात्काळ अटक करुण महाराष्ट्रातून तडीपार करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन तिवसा तहसीलदार यांच्या मार्फत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्याच्या वतीने देण्यात आले. यावेळी अध्यक्ष अमर वानखडे, सहसचिव प्रशांत सुरोसे, तिवसा तालुका अध्यक्ष रोशन ठाकरे, सचिव कुणाल राऊत, संजय ताथोडे, पंकज पांडे, पवन खरासे, आशीष कोल्हे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.