आळंदी येथील समाधी ज्ञानेश्वराची का अन्य कोणाची ?

0 493

आळंदी येथील समाधी ज्ञानेश्वराची का अन्य कोणाची ?

प्रश्नकर्ता विष्णू तपसे चंदन सावरगाव
मो. 99 75 20 76 35

श्री ज्ञानेश्वरी २९२ अध्याय आठव्या अध्यायात ज्ञानेश्वर म्हणतात की,

अक्षरब्रह्मयोगः
अग्निर्ज्योतिरहः शुक्लः षण्मासा उत्तरायणम् । तत्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्म ब्रह्मविदो जनाः ॥२४॥
आंत अग्निज्योतीचा प्रकाशु । बाहेरी शुक्लपक्षु आणि दिवसु । आणि सामासांमाजीं मासु । उत्तरायण ॥२२०॥ ऐशिया समयोगाची निरुती । लाहोनि जे देह ठेविती । ते ब्रह्मचि होती । ब्रह्मविद ॥२२१॥ अवधारीं गा धनुर्धरा । येथवरी सामर्थ्य यया अवसरा । तेवींचि हा उजू मार्ग स्वपुरा । यावयां पैं ॥२२२॥ एथ अग्नी हें पहिलें पायतरें । ज्योतिर्मय हें दुसरें । दिवस जाणें तिसरें । चौथें शुक्लपक्ष ॥२२३॥ आणि सामास उत्तरायण । तें वरचील गा सोपान । येणें सायुज्यसिद्धिसदन । पावती योगी ॥२२४॥ हा उत्तम काळु जाणिजे । यातें अर्चिरा मार्गु म्हणिजे । आतां अकाळु तोही सहजें । सांगेन आईक ॥२२५॥

वरील ओवी ज्ञानेश्वरी अध्याय आठ श्लोक क्रमांक २४ मधील असून ज्ञानेश्वर महाराज माणसाला मरण काळ कधी असावा हे सांगतात. आज एकादशी उद्या द्वादशी आणि त्रयोदशीला ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी घेतात फरक जाणून घ्या.
ज्ञानेश्वर महाराज सांगतात उत्तरायण शुक्लपक्ष आणि दिवस या दिवशी माणसाला मरण चांगले असे ज्ञानेश्वर सांगतात मग ते विरोधात का समाधी घेतात.
आता सध्या दक्षिण यान चालू आहे वैद्य पक्ष आहे, वध्यत्रयोदशीला समाधी घेतात मग समाधी घेतली का दिली तिच समाधी ज्ञानेश्वराची का अन्य कोणाची आहे ? जर ज्ञानेश्वराला समाधीच घ्यायची होती तर ती समाधी आपण ज्ञानेश्वरीत सांगितल्याप्रमाणे उत्तरायण सुरू होण्यास अवघा एकच महिना बाकी आहे एक महिन्यानंतर समाधी घेण्याच्या ऐवजी अगोदर का घेतली हा आमचा सर्वसामान्यांचा प्रश्न आहे यावर चिंतन म्हणून करून निष्कर्ष काढून खरी परिस्थिती समाजासमोर मांडावी अशी मी एक विनंती करतो.

Leave A Reply

Your email address will not be published.