इल्युमिनाटीची प्रबुद्ध परिभाषा..!

0 315

इल्युमिनाटीची प्रबुद्ध परिभाषा..!

 

लेखन-© हर्षद रुपवते

 

इल्युमिनाटीचा मराठी किंवा हिंदी भाषेत शब्दशः अर्थ “प्रबुद्ध” असा होतो. इंग्रजीत त्यास Enlightened म्हणजे ज्ञानी असे म्हणतात. दुसऱ्या अर्थाने “इल्युमिनाटी” म्हणजे “ज्ञानाच्या प्रकाशाचे वाहक” होय. हा झाला इल्युमिनाटीचा शब्दशः अर्थ, आता या शब्दाचा इतिहास पाहिला तर असे समजते की, मुळ इटालियन शब्द इल्युमिनेटो किंवा लॅटिन इल्युमिनॅटस शब्दाचे अनेकवचन म्हणून ‘इल्युमिनाटी’ हा शब्द प्रथम 16 व्या शतकाच्या उत्तरार्धात वापरात आला.

स्पॅनिश लोकांच्या एका पाखंडी संप्रदायाने हा शब्द प्रथम वापरला आणि विशेष धार्मिक ज्ञानाचा दावा केला होता. अशाप्रकारे पुढे अनेक संघटनांनी ‘इल्युमिनाटी’ हे नाव वापरले, मात्र ऐतिहासिक अर्थाने, “इल्युमिनाटी” या शब्दाचा संदर्भ बाव्हेरियन इलुमिनाटी या एका सिक्रेट सोसायटीशी जास्त संबंधित राहिला आहे. जी संस्था 1776 ते 1785 या काळात एक दशक उघडपणे चालली होती.

जर्मनीच्या अप्पर बाव्हेरिया येथे 1 मे 1776 रोजी ‘द ऑर्डर ऑफ द इलुमिनाटी’ नावाने या संस्थेची स्थापना जर्मन कायद्याचे प्राध्यापक ॲडम वेईशॉप्ट यांनी केली होती, ज्यांचा आत्मज्ञानाच्या आदर्शांवर ठाम विश्वास होता. माजी ख्रिश्चन धर्मीय असलेल्या वेईशॉप्टला ख्रिश्चन धर्माच्या जागी तर्कशुद्ध धर्म घ्यायचा होता आणि आपल्या इल्युमिनाटी सदस्यांना तर्क, परोपकार आणि इतर धर्मनिरपेक्ष मूल्यांबाबत शिक्षित व प्रबोधित करायचे होते, जेणेकरून ते सत्तेवर आल्यावर राजकीय निर्णयांवर प्रभाव टाकू शकतील. त्यांच्या सोसायटीतील सदस्य स्वतःला “परफेक्टिबिलिस्ट” असे म्हणत. जर्मनीतील बव्हेरियन इलुमिनाटी गट हा मुक्त विचारांची लोकशाहीवादी चळवळ होती आणि इलुमिनाटी नावाशी संबंधित सर्वात प्रमुख गट होता.

ॲडम वेईशॉप्टने जेव्हा त्याच्या सिद्धांताचा प्रसार सुरू केला तेव्हा केवळ संपत्ती आणि सामाजिक महत्त्व असलेल्या लोकांनाच यासाठी लक्ष्य केले. सुरुवातीच्या काळात हा गट काही मोजक्याच लोकांचा होता. त्याची सदस्य संख्या 2,000 पेक्षा जास्त झालेली कधीही दिसत नाही. मात्र इतर गटांमध्ये एक प्रकारचा स्लीपर सेल बनून हा गट त्या आकारात वाढत होता.

1778 पासून या इलुमिनाटीने अंतर्गत स्पर्धात्मक गटबाजीतून त्यांच्या सोसायटीसाठी सदस्यांची भरती करण्यासाठी विविध मेसोनिक लॉजशी म्हणजे चर्चशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आणि अनेक इल्युमिनाटी सदस्य फ्रीमेसन लॉजमध्ये सामील झाले. अशाप्रकारे इलुमिनाटीने फ्रीमेसन लॉजद्वारे युरोपमधील अनेक सदस्यांची भरती केली. यामुळे इल्युमिनाटीत फ्रिमेसन्संनी घुसखोरी केली आणि त्यांच्याशी जुळवून घेतले. संस्थेतील पदानुक्रम आणि रहस्यमय विधींसह त्यांनी आपली सोसायटी फ्रीमेसनवर आधारित ठेवली आणि शिक्षित सदस्यांच्या प्रबुद्ध आदर्शांना प्रतिबिंबित करण्यासाठी त्याला ‘द ऑर्डर ऑफ इलुमिनाटी’ असे नाव दिले.

बाव्हेरियन इल्युमिनाटी लवकरच इटलीपासून डेन्मार्कपर्यंत आणि वॉर्सा ते पॅरिसपर्यंत विस्तारलेल्या मोठ्या क्षेत्रामध्ये कार्यरत झाली होती. मात्र 1785 मध्ये कॅथोलिक चर्चच्या पुढाकाराने व बाव्हेरियाचे शासक चार्ल्स थिओडोर याच्या आदेशानुसार इलुमिनाटी, फ्रीमेसनरी आणि इतर गुप्त संस्थांना बेकायदेशीर ठरवण्यात आले. शेवटी या चळवळीवर बंदी घालण्यात आली आणि त्यांच्यात सामील झालेल्या प्रत्येकासाठी गंभीर शिक्षा ठोठावल्या. तसेच वेईशॉप्टचे प्राध्यापकपद काढून त्यांना जर्मनीतून हद्दपार करण्यात आले.

चार्ल्स थिओडोर या शासकाने इल्युमिनाटी बंद केली कारण त्याला भीती होती की, ती आपली सत्ता काढून घेईल. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता आणि या सिक्रेट सोसायटीत जगाच्या अनेक भागांमधून सदस्य झाले होते, तसेच लोकांमध्ये ती वेगाने पसरली होती, जीचा लोकांच्या मनावर खोलवर परिणाम झाला होता.

बंदी घातल्यानंतरही त्यानंतरच्या वर्षांत ती थांबली नाही, तर सार्वजनिकची ती खाजगी झाली. सामान्य जीवनात कोणाला काही कळू नये म्हणून इल्युमिनाटी भूमिगत राहिली. 1785 नंतरच्या ऐतिहासिक नोंदीमध्ये बाव्हेरियन ऑर्डरचा कोणताही पुरावा दिसत नाही. इल्युमिनाटी कायमची बंद झाली की गुप्तपणे कार्यरत आहे ही बाब अनेक वर्षे संशयास्पद राहिली.

ॲडम वेईशॉप्टची समानधर्मी बंधूची जागतिक मेसोनिक अशी एक सोसायटी, जी नंतरच्या काळात रॉथ्सशिल्ड, रॉकफेलर अशा यहुदी एलिट्स समूहाच्या छत्रछायेखाली एकत्र काम करू लागली. हळूहळू ती आजच्या षडयंत्रकारी स्वरुपात आकारात आली.

इल्युमिनाटी शब्दाचा अर्थ ‘प्रबुद्ध’ म्हणजे “ज्ञानाच्या प्रकाशाचे वाहक” असा होत असला तरी आज दुसरीकडे याचा अर्थ “सैतानाचे पुजारी” असाही होतो. ऑक्सफर्ड डिक्शनरीच्या व्याख्येनुसार, इल्युमिनाटी ही एक सिक्रेट सोसायटी आहे जीचे सदस्य सैतानाशिवाय कोणत्याही देवतेची पूजा करत नाहीत. संपूर्ण जगातून सर्व धर्मांचा नायनाट करणे व त्यांच्या सैतानी (Satan) धर्माचे संरक्षण करणे आणि जगावर राज्य करणे हा त्यांचा प्रमुख उद्देश आहे. जरी हे लोक जगभर पसरलेले असले तरी त्यांचे मुख्य केंद्र युरोप, अमेरिका, इस्रायल आहे. जगातील सर्व श्रीमंत आणि शक्तिशाली लोकांपैकी 70% इल्युमिनाटीचे सदस्य आहेत.

इल्युमिनाटी म्हणजे बौद्धिक आणि आर्थिक दृष्ट्या असाधारण असे विशेष लोक या अर्थाने ते स्वतः प्रबुद्ध असल्याचा दावा करतात. मात्र इल्युमिनाटी (प्रबुद्ध) शब्दाचा खरा अर्थ सचेत, आत्मबोध झालेला असा आहे. धम्म तत्वज्ञानाने त्याची व्याख्या अशी होईल की, “प्रबुद्ध (इल्युमिनेट) तोच असतो जो प्रत्येक गोष्टीचा प्रत्येक दृष्टीकोनातून सारासार विचार करून त्याचे विश्लेषण सामान्य माणसांसमोर न्यायपूर्वक मांडतो.” साधारणतः ही व्याख्या सचेत बौद्ध व्यक्तीला लागू होऊ शकते.

आज जो गुप्त समूह स्वतःला इल्युमिनाटी संबोधून घेतो, काय त्याला वरील व्याख्या लागू पडेल? निश्चितच नाही. म्हणूनच तात्पर्य हे आहे की, कुणी शब्दशः अर्थ घेऊन आजच्या इल्युमिनाटी एलिट्स समूहाला सचेत जागृत प्रबुद्ध असल्याचे मानत असेल तर ते पुर्णपणे अतार्किक व अज्ञानपण आहे. उदा. एखाद्या व्यक्तीचे नाव सम्राट ठेवले तर तो राजा होत नसतो. म्हणूनच जगाला गुलाम करुन त्यावर राज्य करु पाहणारा जागतिक पातळीवरील षडयंत्रकारी समूहाचे नाव इल्युमिनाटी आहे म्हणून तो समूह शब्दशः अर्थाने प्रबुद्ध असत नसतो. आशा आहे की, जागतिक गुप्त सोसायटीचे नाव असलेल्या इल्युमिनाटी शब्दाची परिभाषा आणि इल्युमिनाटी अर्थात प्रबुद्ध शब्दाची खरी परिभाषा यात निर्माण केलेली जटिलता सोडविण्यास सदर लेख उपयोगी ठरेल.

Leave A Reply

Your email address will not be published.