खेळ कुणाला अफवांचा कळला…!

0 99

खेळ कुणाला अफवांचा कळला…!

 

✍🏻हर्षद रुपवते
सोशल हेल्थ मुव्हमेंट

मो.8055404020

 

जगात न्यू वर्ल्ड ऑर्डर अर्थात नवी विश्वव्यवस्था गतीने लागू केली जात आहे, ही नवी विश्वव्यवस्था स्थापित करण्यासाठी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम या जागतिक भांडवलदारांच्या संघटनेने 2015 मध्ये युनोच्या माध्यमातून अजेंडा-2030 बनविला आहे. आणि हा अजेंडा 193 देशाच्या सरकारांनी सह्या करून स्विकारलेला आहे. तो अजेंडा सुज्ञ पालकांनी, नागरिकांनी एकदा उघडून, तपासून बघावा. हा अजेंडा राबविण्यासाठी एकुण 17 क्षेत्र निवडलेले आहेत त्यापैकी एक क्षेत्र आहे शिक्षण.

नवी जागतिक शैक्षणिक व्यवस्था GPE अर्थात Global Policy of Education या धोरणानुसार जगभरात लागू केली जात आहे. प्रत्येक देशाचे सरकार आपापल्या देशात वेगवेगळ्या नावांनी हे धोरण लागू करीत आहे. भारतात या धोरणाचे नाव ‘शिक्षानिती-2020’ तथा ‘National Education Policy 2020 (NEP 2020) किंवा मराठीत ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०’ असे देखील आहे. राज्य व केंद्रशासित प्रदेश सरकारांसह सर्व स्टेकहोल्डर्स म्हणजे भांडवलदार भागधारकांशी सविस्तर सल्लामसलत केल्यानंतर एनईपी 2020 निश्चित करण्यात आले आहे.

सुज्ञ पालकांनी, नागरिकांनी या ‘शिक्षानिती-2020’ धोरणाचा देखील थोडा अभ्यास करावा. यात दोन गोष्टी प्रमुख आहेत.. एक म्हणजे ‘ऑनलाईन एज्युकेशन’ आणि दुसरे म्हणजे ‘100% इम्यून वॅक्सीनेशन.’

अनेक कथित सुशिक्षित लोकांना अजूनही ही गोष्ट लक्षात आलेली नाही की, कोरोना महामारी ही एक अफवा आहे आणि न्यू वर्ल्ड ऑर्डरचा अजेंडा-2030 लागू करण्यासाठीच या अफवेला ‘सेंटर पॉइंट’ बनविण्यात आले आहे. या सेंटर पॉइंटच्या आधारेच सर्व धोरणे अत्यंत कुटनितीने लागू केली जात आहेत.

विद्यार्थी आणि पालक या दोघांनाही ऑनलाईन शिक्षणाची सवय लागावी म्हणून नकली महामारीची भीती दाखवून विद्यार्थ्यांना घरी बसवले आहे आणि ऑनलाईन पद्धतीचे शिक्षण शिकण्याकरीता भाग पाडले आहे. तसेच मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याच्या नावाखाली ‘इम्यून वॅक्सीनेशन’ हा दरवर्षी नवीन लसीकरणाचा अत्यंत भयंकर प्रकार 2030 पर्यंत राबविला जाणार आहे. मुळात लसीकरणाचा संबंध कोणत्याही महामारीशी नाही. ‘अजेंडा 2030’ धोरणांमध्ये लसीकरण हा सर्वात महत्त्वाचा अवयव आहे. 2015 मध्येच या अजेंड्यात लसीकरण अभियानाचा समावेश केलेला असून हे अभियान राबविण्यासाठीच मेडिकल क्षेत्रांचा गैरवापर करून 2021 पासून नकली महामारी निर्माण केली आहे. (आता आपली लिंक बरोबर लागली असावी असे समजूया) अशाप्रकारे महामारीला सेंटर बनवून 2030 पर्यंत अनेक धोरणे लागू केली जाणार आहेत.

2023 पासून सर्व शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्था टप्प्याटप्प्याने पुर्णपणे बंद करुन केवळ विद्यापीठांमधूनच शैक्षणिक प्रकिया सुरू राहील असे दिसून येत आहे. कारण यासंबंधीचे प्रस्ताव विद्यापीठांकडून मागवले जात आहेत. याचा अर्थ असा की, पुढील शिक्षण हे अधिकाधिक ऑनलाईन पद्धतीनेच असेल. शाळा महाविद्यालयाची जागा आता भांडवलदारांच्या ‘खाजगी शैक्षणिक कंपन्या’ घेतील. कारण मुळातच हा जागतिक वर्चस्ववादी भांडवलदार समुहाचा म्हणजेच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम या खाजगी संघटनेचा कॉर्पोरेट अजेंडा आहे.

कायम गुलाम मानसिकतेत जगणाऱ्या पालकांना, नागरिकांना अशा शोषण व्यवस्थेचे ना कोणते गांभीर्य असते ना कोणती चिंता. असे लोक केवळ जशी व्यवस्था निर्माण होईल तसे ॲडजस्टेबल होण्याचा आणि ती व्यवस्था सहन करण्याचे प्रयत्न व कौशल्य आजमावत जगत राहतात. अशा लोकांना ही कल्पना देखील नसेल की, नव्या शैक्षणिक धोरणात आपले स्थान कुठे असू शकते.

सुज्ञ पालकांनी इतका तरी विचार केला पाहिजे की, खाजगी शैक्षणिक कंपन्याची ॲडमिशन फी देखील तितकीच तगडी असेल. लवकरच 5G इंटरनेट सुरू होईल त्याचे रिचार्ज आज पेक्षा जास्त महागडे असतील, 5G इंटरनेट सुरू होताच आपले जुने 4G मोबाईल फोन आणि 4G सिम टाकून द्यावे लागतील आणि महागडे 5G फोन घ्यावे लागतील. एका घरात जितके मुले असतील तितके मोबाईल फोन किंवा लॅपटॉप हे ‘ई लर्निंग’ अर्थात ऑनलाईन एज्युकेशनसाठी घ्यावे लागतील. सर्वांचे महागडे रिचार्ज वेळोवेळी करावे लागतील. अशा अनेक प्रकारची कायमस्वरूपी दमछाक किती लोकांना जमणार आहे? शिवाय इतकी कसरत करुनही ऑनलाईन पद्धतीच्या शिक्षणात आपल्या मुलांना कोणत्या दर्जाचे शिक्षण मिळणार आहे? कोणत्या प्रकारची गुणवत्ता वाढणार आहे?

विद्यार्थी आणि पालकांनी ही गोष्ट वेळीच लक्षात घेणे गरजेचे आहे की एकदा का शिक्षण व्यवस्थेवर भांडवलदारांची मक्तेदारी आली की विद्यार्थी आणि पालकांचा बाजार उठलाच म्हणून समजावा. शिवाय जोडीला दरवर्षी लसींचे डोसवर डोस देऊन शरिराचे रुपांतर केमिकल प्रयोगशाळेत झाले असेल ते वेगळेच. मग अशा व्यवस्थेतून पुढे केवळ डिजिटली आणि केमिकली गुलामांच्या मानसिक विकलांग पिढ्या आपण जन्माला घालणार आहोत का?? या प्रश्नांची उत्तरे पालकांनी, नागरिकांनी आपल्या स्वतःच्या मनाला आणि बुद्धीला जरुर विचारावेत. योग्य उत्तरे मिळालेले सुज्ञ लोक मात्र महामारीच्या अफवांचा आणि सक्तीने लादण्यात येणाऱ्या धोरणांचा रस्त्यावर उतरून जगभरात विरोध करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.