लसीकरणाची रक्तरंजित कहाणी

0 376

लसीकरणाची रक्तरंजित कहाणी

 

✍🏻 हर्षद रुपवते
सोशल हेल्थ मुव्हमेंट

मो. 8055404020

 

जगात लस निर्माण झाल्यापासून लसीकरण कार्यक्रमांमागील उद्देश आणि हेतू संशयास्पद आहेत. लसी आपल्याला संभाव्य रोगांपासून कितपत संरक्षण देऊ शकतात हे नेेहमीच विवादित आणि संशयास्पद आहे. कोविड-19 चा लसीकरण कार्यक्रम भारतात सुरू करण्यात आला आहे, भारत सरकार हा कार्यक्रम का आणि कोणत्या प्रकारे चालवित आहे, आणि याचे काय परिणाम होऊ शकतात हे जाणून घेण्यापूर्वी आजपर्यंत जगात आणि भारतात झालेल्या लसीकरण कार्यक्रमांची आणि त्याच्या परिणामांची पार्श्वभूमी प्रातिनिधिक स्वरूपात जाणून घेणे महत्वाचे आहे.

जग आणि भारतामधील लसीकरणाचे परिणाम-

1. १८८९ मध्ये लंडन (युरोप) मध्ये स्मॉल-पॉक्स साथी विरूद्ध लसीकरण केले गेले. त्याच्या ४५ वर्षांच्या नोंदणीकृत आकडेवारीवर अल्फ्रेड आर. वॉल्स (एल.एल.डी.) यांनी संशोधन केले, परिणामी त्यांनी लसीकरणाला बेकार आणि घातक असल्याचे स्पष्ट केले. आपल्या संशोधनात त्यांनी पुढील निष्कर्ष मांडले आहेत.

(१) मृत्यू आणि त्यांच्या कारणांची नोंद केल्यानंतर ४५ वर्षांत स्मॉल-पॉक्समुळे होणारा मृत्यू दर काहीसा कमी झाला, मात्र शेवटच्या बारा वर्षांत स्माॅल-पॉक्सची सर्वात गंभीर महामारी दिसून आली.

(२) हे दर्शविण्यासाठी कोणताही पुरावा नाही की स्मॉल-पॉक्सने होणारे मृत्यू लसीकरणामुळे कमी झाले.

(३) लसीकरणातून स्मॉल-पॉक्सची गंभीरता कमी होऊ शकली नव्हती.

(४) योगायोगाने लसीकरणामुळे आजारांच्या संख्येत भयानक वाढ झाली.

अफ्रीकेत १९७२ मध्ये स्मॉल पॉक्ससाठी WHO ने लसीकरण कार्यक्रम राबवला. या कारणामुळे तेथील काळ्या लोकांमध्ये एचआयव्ही उद्भवला. जागतिक आरोग्य संघटनेचे स्मॉल-पॉक्स वरील १३ वर्षे चाललेले लसीकरण अभियान विकसनशील देशांमध्ये १९८१ मध्ये समाप्त झाले. ११ मे १९८७ रोजी, विज्ञान संपादक पियर्स राईटने लंडन टाईम्समध्ये लिहिले, “स्माॅल-पॉक्सवरील लसीकरणामुळे एड्स निर्माण झाला.” ती लस एड्सच्या विषाणूंनी दुषित होती. जागतिक आरोग्य संघटनेने आपल्या तपासात हे मान्य केले की लस दुषित आहे, मात्र तीने आपले हे निष्कर्ष दाबून टाकले. या दडपलेल्या नरसंहाराची कहाणी “डब्ल्यूएचओ. मर्डरड अफ्रीका” डॉ.विलियम कॅम्पबेल डगलस, (एम.डी.) या नावाने इंटरनेटवर उपलब्ध आहे. अशा प्रकारे पुढील दहा वर्षांत अफ्रीकामध्ये ७५% लोक मारले गेले असावेत. जगभरात ३० मिलियनपेक्षा अधिक लोक एड्स मुळेे मृत्यू झाले आहेत. त्यात जवळपास ७०% आफ्रिकेत मृृत्यूूू पावले आहेत.

उप-सहारा आफ्रीकेत २००२ मध्ये ‘Men Afri Vac’ मोहिमेच्या वेळी, बिल गेट्सच्या परिचालकांनी meningitis आजारावर हजारों आफ्रिकन बालकांचे जबरदस्ती लसीकरण केले होते. त्यात ५०० पैकी ५० मुलांमध्ये लसींमुळे लकव्याची समस्या निर्माण झाली होती. दक्षिण अफ्रीकी वृत्तपत्रांनी तक्रार केली होती की, “आम्ही औषध निर्मात्यांसाठी गिनीपीग आहोत.” नेल्सन मंडेला यांच्या सोबतचे ज्येष्ठ अर्थतज्ञ, प्रोफेसर पेट्रिक बाँडने बिल गेट्सच्या परोपकारी प्रथांंना “क्रूर आणि अनैतिक” म्हटले होते.

बिल गेट्सची संस्था बिल एंड मलिंडा गेट्स फाउंडेशनने PATH (Program for Appropriate Tech in Health) नावाच्या संस्थेला फंड देऊन तीच्या माध्यमातून २००९-१० मध्ये आंध्रप्रदेश-तेलंगणाच्या खम्मम जिल्ह्यातील १६००० आणि गुजरात-बडौदा जिल्ह्यातल्या आश्रमशाळेतील १४००० गरीब आदिवासी मुलींना अवैध पद्धतीने HPV लसी दिल्या. ज्यामुळे खूप संख्येने मुली आजारी पडल्या आणि काहींचा मृत्यूही झाला. राज्यसभेच्या एका समितीने ऑगस्ट २०१३ मधील आपल्या अहवालात म्हटले आहे की आंध्र आणि गुजरातमध्ये ३०००० मुलींना अवैध पद्धतीने HPV लसींंच्या चाचण्या केेल्या गेल्या, या अपराधिक कृत्यासाठी बिल गेट्सने फंडिंग केले होते.

२०१४ मध्ये यूनो-डब्ल्यूएचओच्या माध्यमातून केनियातील २३ लाख महिलांना टिटनेस (धनुर) च्या लसी दिल्या गेल्या. त्यानंतर केनियाच्या कॅथोलिक डॉक्टर्स असोसिएशनने “टिटनेस वैक्सीन अभियान” अंतर्गत लाखो महिलांची अनैच्छिक नसबंदी केल्याचा डब्ल्यूएचओवर आरोप केला होता. या लसीकरणाचा काय परिणाम झाला असावा? हे निश्चित करण्यासाठी डॉ. वाहोमनगारे नावाच्या डॉक्टरांवर जबाबदारी सोपविण्यात आली. त्यांनी शोधून काढले की, महिलांची फर्टिलीटी (प्रजनन क्षमता) कमी करण्यासाठी लसीत हार्मोन टाकलेले होते. आरोप नाकारल्यानंतर डब्ल्यूएचओने शेवटी मान्य केले की, ते दशकाहून अधिक काळापासून वांझपणाच्या लसी विकसित करीत होते. याच प्रकारचे आरोप टांझानिया, निकारागुआ, मेक्सिको आणि फिलीपीन्सने देखील डब्ल्यूएचओवर केले होते.

संशोधकांना २०१६ मध्ये एका अभ्यासात असे आढळले की, ज्या लोकांनी सतत तीन वर्षे फ्लु विरोधात लस घेतली होती, प्रत्यक्षात त्यांनाच संक्रमित होण्याचा जास्त धोका होता.

सन २०१७ च्या एका अभ्यासातून (morgenson et.el. 2017) असे आढळले आहे की, डब्ल्यूएचओची लोकप्रिय डीटीपी वैक्सीन आजारांना थांबविण्यापेक्षा जास्त तर अफ्रीकी मुलांना मारत आहे. डीटीपी-लसीकरण झालेल्या पिडित मुलींना १० पेक्षा जास्त मुलींच्या मृत्यूूदराचा सामना करावा लागला होता, ज्यांचे अजून लसीकरण केलेले नव्हते. डब्ल्यूएचओने ही घातक लस मागे घेण्यास नकार दिला आहे जी दरवर्षी लाखो अफ्रीकी मुुलांना दिली जात आहे.

एक संशोधनातून समोर आले आहे की, बिल गेट्स फाउंडेशनने भारतात ओरल पोलिओ वॅक्सीनेशन करविले, ज्यात सन २००० ते २०१७ दरम्यान जवळपास पाच लाख (४.९ लाख) मुले अपंग झाली आहेत.

भारतात पोलिओच्या ओरल वैक्सीनमुळेच ४७००० मुले पोलिओची शिकार झाली आहेत. वैज्ञानिकांनी केवळ या पोलिओ आजाराचे नाव बदलून ‘Non Polio Acute Flacid Paralysis’ असे नामांतर केले. जगात अशा एकुण केसेस पैकी ४६ टक्के इतकी संख्या तर भारतातच आहे. (खरेेतर उत्तर अमेरिका आणि युरोपमध्ये जेव्हा या लसींवर बंदी आली, त्या अतिरिक्त लसींचे जुगाड करण्यासाठी Polio Pulse Program चे आयोजन झाले. जेव्हा कि त्याच्या एक वर्षाआधीच २०१० मध्ये भारताला पोलिओ मुक्त म्हणून जाहीर केले होते हे विशेष!)

जागतिक आरोग्य संघटनेने २०१७ मध्ये अनिच्छेने स्वीकार केले होते की, पोलिओच्या वाढत्या दराचे मुख्य कारण वैक्सीन स्ट्रेन आहे. काँगो, अफगानिस्तान आणि फिलीपिन्स मधील भयावह महामारीच्या सर्व घटना लसीकरणाशी संबंधित आहेत. खरं तर, २०१८ पर्यंत वैश्विक पोलिओच्या ७०% प्रकरणांमध्ये वैक्सीन स्ट्रेन जबाबदार होती. संशोधक म्हणतात की, पल्स पोलिओ प्रोग्रामची फ्रिक्वेंसी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रूपात ‘नॉन-पोलिओ एक्यूट फ्लासिड पॅरालिसिस’ च्या घटनांशी संबंधित आहे, अर्थात पोलिओ लसीकरण पॅरालिसिसचे कारण आहे.

२०१८ मधील एका अभ्यासात आढळून आले की, गैर-इंफ्लुएंझा श्वसन पेथोजेनच्या कारणाने मुलांमध्ये श्वसन संक्रमणाची तीव्रता वाढली, जी विना लसीकृत मुलांच्या तुलनेत इन्फ्लूएंझा लसीकरणानंतर वाढली.

अमेरिकेच्या कायद्याप्रमाणे प्रत्येक अमेरिकन बालकाला त्याच्या वयाच्या पाच वर्षांत सन १९६२ सालापर्यंत ३ तीन प्रकारच्या आणि सन १९८३ पर्यंत १२ प्रकारच्या लसी घ्याव्या लागत होत्या. आता तर बालक पाच वर्षांचा होईपर्यंत त्याला २७ प्रकारच्या लसी घेणे अनिवार्य आहे. तो १८ वर्षांचा होतो तोपर्यंत ही संख्या ५० पर्यंत पोहचते (भारतात ३०). बालकांना लसी देण्याचे प्रमाण जसजसे वाढत गेले, तसतसे त्यांच्यात कितीतरी आजारांंचे प्रमाण वाढत गेले. १९८० मध्ये अमेरिकेच्या प्रत्येक १०,००० मुलांमध्ये एक मुल ऑटिझम (मेन्टली डिसऑर्डर अँड अदर प्रोब्लम्स) म्हणजे मंदबुद्धी या आजाराची शिकार बनत होते, आणि सन २०१७ मध्ये ३६ मुलांमध्ये एक मुल ऑटिझमची शिकार बनत होते. ज्यासाठी केवळ वॅक्सीनेशनची वाढती व्यापकता जबाबदार होती. १० वर्षांच्या कालावधीत, भारतात सरकारी लसीकरणाच्या कार्यक्रमानंतर १०६१२ मुलांचा मृत्यू झाला आहे आणि प्रत्येक वर्षी अंदाजे ६ लाख प्रतिकुल व घातक परिणाम दिसून येतात.

या अधिकृत माहितीनुसार जगात आजपर्यंत झालेल्या लसीकरणाचा किती भयंकर परिणाम झाला आहे हे प्रातिनिधिक स्वरूपात लक्षात येते. शिवाय हे लसीकरण कार्यक्रम यापुर्वी इतक्या मोठ्या प्रमाणावर राबविण्यात आलेले नाहीत जितके की आज कोविडच्या नावाखाली जगभरात लसीकरण केले जात आहे. आज कोविडचे लसीकरण हे जागतिक स्तरावर खूप भव्य प्रमाणावर केले जात आहे, यावरुन त्याचे प्रतिकुल परिणाम देखील तितक्याच मोठ्या प्रमाणात उद्भवले जाऊ शकतात हे विदारक सत्य नाकारता येत नाही. अर्थात आता जगातील सर्व ७ बिलियन लोकांचे जे कोरोना व्हॅक्सिनेशन सुरू आहे, जे कितीतरी अधिक पटीने घातक ठरु शकते..!

भारतात जगातील सर्वात मोठ्या स्तरावरचे कोविड लसीकरण केले जात आहे. या लसी घेतलेल्या लोकांवर कोणकोणते घातक परिणाम होऊ शकतात याची माहिती भारत सरकारने जरी दिलेली नसली तरी ही माहिती अमेरिकेच्या FDA ने दिलेली आहे. फुड अँड ड्रग्स ॲडमिनिस्ट्रेशन (FDA) ने २२ संभाव्य गंभीर प्रतिकूल परिणामांचा खुलासा एका सुचीद्वारे केला आहे. प्रतिकूल परिणामात Guillain-Barré syndrome (शरीराची रोगप्रतिकार यंत्रणे भोवती मज्जासंस्थेच्या काही भागांवर आक्रमण करणारी व्याधी), Convulsions/ seizures (झटके किंवा फिट येणे), Stroke (स्ट्रोक – आघात/ झटका), Autoimmune disease (स्वयंप्रतिकार रोग), Pregnancy and birth outcomes (प्रेरित गर्भपात किंवा मुदतीपूर्वीचा जन्म), Thrombocytopenia (रक्तातील प्लेटलेटची संख्या कमी होणे), Disseminated intravascular coagulation (छोट्या नसांमध्ये रक्ताच्या लहान लहान गुठळ्या होणे), Vaccine enhanced disease (लस वर्धित रोग) तसेच Deaths (मृत्यू) असे गंभीर परिणाम कोविड-19 वरील वॅक्सीन घेतल्यानंतर होऊ शकतात. हे सर्व विनाशकारी आणि घातक विकार प्रतिकूल परिणाम त्या सुचीमध्ये दिलेले आहेत. २२ ऑक्टोबर २०२० रोजी वैक्सीन संबंधित सल्लागारांची एक मिटिंग झाली होती, ज्या मिटिंगमधील प्रोसिडिंगच्या पान नंबर १७ वर FDA safety surveillance of Covid-19 vaccines: ही हेडिंग प्रविष्ट केलेली आहे. तिथे हे २२ संबंधित परिणाम दिलेले आहेत.

यादीत दिलेले परिणाम आज लस घेतलेल्या लोकांमध्ये दिसून येऊ लागले आहेत. द्विधा इतकीच आहे की सर्वसामान्य लोकांना हे सहसा लक्षात येत नाही की उद्भवलेले परिणाम किंवा आजार हे लसीमुळे आहे की अन्य कारणांमुळे आहे. कारण हे परिणाम सर्वांमध्ये एकसारखे होत नसतात. माणसांची शरिर प्रकृती वेगवेगळी असते त्यामुळे प्रत्येकाच्या शरीर प्रकृतीनुसार हे परिणाम वेगवेगळ्या काळात, वेगवेगळ्या प्रकारे उद्भवू शकतात. म्हणून कोविडच्या लसीकरणामुळे जे भयंकर परिणाम दिसून येऊ लागले आहेत त्याची काही प्रातिनिधिक उदाहरणे तपासून पाहिली पाहिजेत.

कोविड लसीकरणाचे काही प्रमुख परिणाम-

अमेरिकन सीडीसीचा ऑगस्ट २०२१ पर्यंतचा VARS डेटा दर्शवितो की जवळपास पाच लाख लोकांना तीव्र साईट इफेक्ट, स्ट्रोक, हार्ट फेलर, रक्त गुठळ्या, ब्रेन डिसऑर्डर, फिट येणे, मेंदूला सुज येणे आणि पाठीचा कणा सुजणे, ऍलर्जी रिॲक्शन, ऑटोम्यून्यूस, संधिवात, गर्भपात, वंध्यत्व, स्नायूत अशक्तपणा, बहिरेपणा, अंधत्व असे गंभीर परिणाम भोगावे लागले. याशिवाय प्रायोगिक कोविड लसीकरण केल्यामुळे अंदाजे १६००० लोक मरण पावले अशी माहिती सीडीसीने दिली. मात्र तपासणी तज्ज्ञ म्हणतात की सीडीसीने दाखविलेल्या संख्येपेक्षा मृत्यूंची संख्या कमीत कमी पाच पटीने जास्त आहे. अर्थात मृत्यूची मुळ आकडेवारी लपवली जात आहे. १५०००० रिपोर्ट व्हीएआर सिस्टमद्वारे नाकारले किंवा स्क्रब केले गेले आहेत. तसेच लसीकरण झालेले लोक ज्यांचा दोन आठवड्याच्या आत मृत्यू झाला आहे त्यांची नोंद केली जात नाही. लाझार्स रिपोर्टनुसार असे दिसून येते की प्रतिकुल केसेस मधील केवळ १% लोकांचीच सार्वजनिकरित्या नोंद केली जात आहे.

युरोपियन युनियनमधील (५० युरोपियन देशांपैकी २७ देश) युग्राव्हिलन्सचा १८ ऑगस्ट २०२१ रोजीचा अहवाल अधिकृतपणे मान्य करतात की, लसीकरणामुळे २२००० लोक मरण पावले आणि २ मिलियन लोकांना दुष्परिणाम झाले, ज्यापैकी ५०% गंभीर आहेत.

युनायटेड किंग्डममध्ये ब्रिटिश सरकारने प्रतिकूल घटनांच्या पहिल्या सिरीजचा अहवाल प्रकाशित केला, ज्यात लसीकरणाच्या पहिल्या मोहिमेतच स्ट्रोक, गर्भपात, हार्ट फेलर, पॅरालिसिस, ऑटोइम्युन, आणि अंधत्वाच्या १२६० प्रकरणांसह १००००० गंभीर परिणामांचा समावेश आहे. शिवाय लसीकरणानंतर फक्त सहा आठवड्यांतच गर्भपाताच्या संख्येत ३६६ टक्के वाढ झाली आहे.

मॉडर्ना लसीचे तर केवळ तीन महिन्यांच्या काळातच ३०००० पेक्षा अधिक घातक परिणामांचे रिपोर्ट मिळाले आहेत.

ब्राझिलमध्ये ५ महिन्यांच्या कालावधीत लसीकरणामुळे झालेल्या मृत्यूची अधिकृत संख्या ३२००० आहे.

असे विविध देशांमधील लसीकरणाचे काही संशोधित अहवाल समोर येऊ लागले आहेत. यावरुन असे म्हणता येईल की, सध्या होत असलेले कोविड वॅक्सीनेशन असो किंवा त्यापुर्वी विविध आजारांच्या नावाखाली झालेले वॅक्सीनेशन असो त्यामागील परिणामांचा अभ्यास केल्यास ही गोष्ट स्पष्ट होत आहे की, कोणतेही व्हॅक्सिनेशन लोकांच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरलेले नाही.

जगभरातील असंख्य प्रामाणिक वैद्यकीय संशोधक या गोष्टीशी सहमत आहे की, एखादा आजार झाल्यास त्यावर इलाज करणे योग्य आहे परंतु सुदृढ निरोगी व्यक्तीने भविष्यात विशिष्ट आजार होऊ नये यासाठी आधीच लसीकरण करून घेणे हे सायन्स नाही, आणि अशा प्रयोगाला कोणताही सायंटिफिक आधार नाही.

वॅक्सीनेशन करुन घेणे म्हणजे भविष्यातला पेशंट आपल्या शरीरात तयार करून ठेवणे होय. म्हणूनच प्रामाणिक जागतिक वैद्यकीय संशोधकांचे असे प्रसिद्ध विधान आहे की, “वॅक्सीनेशन इज ए फेक सायन्स.”

वास्तविक पाहता कोणत्याही नवीन वॅक्सीनचे प्रयोग आधी जनावरांवर केले जातात त्याचे योग्य रिझल्ट आल्यावर त्यांना मानवांसाठी वापरण्यास मान्यता दिली जाते. परंतु कोविड लसीकरणाला एमर्जेंसीच्या नावाखाली थेट माणसांवर प्रयोग करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. थोडक्यात असे म्हणता येईल की सध्या कोविड लस टोचून घेणारे लोक हे जनावरांच्या भुमिकेत आहेत. अशा लोकांनी स्वतःच्या मेंदूवर अज्ञानाची झापडे लावून आपले अनमोल शरीर वॅक्सीन कंपन्यांना एक प्रयोगशाळा म्हणून बहाल केले आहे. ही गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे की कोविडच्या नावाखाली सुरू असलेले फोर्स वॅक्सीनेशन एक घातक क्लिनीकल ट्रायल आहे. समजा काही दिवसांनी लसीकरणाच्या घातक परिणामांचे रिपोर्ट समोर आले व लोकांनी विरोध सुरू केला आणि म्हणून सरकारकडून त्या लसींवर बंदी घालण्यात आली तर लस घेऊन बसणाऱ्यांची अवस्था काय होईल याची कल्पना लसइच्छुकांनी अवश्य करावी. लसीकरणामुळे झालेली लोकांची शारीरिक हानी सरकार किंवा लस कंपन्या भरुन देतील का? खरेतर कथित कोरोना व्हायरसशी या लसीकरणाचा काहीही संबंध नाही. हवे तर लस घेण्याची इच्छा असणाऱ्या लोकांनी तशी सायंटिफिक माहिती सरकारकडे जरुर मागावी. त्यामुळे हे लक्षात येईल की, केंद्र व राज्य सरकार आरोग्य मंत्रालयाकडे यावरील कोणतीही सायंटिफिक अधिकृत माहिती उपलब्ध नाही.

वास्तव हे आहे की या लसीकरण कार्यक्रमाचा संबंध कोणत्याही महामारीशी नाही तर हा जागतिक वर्चस्ववादी भांडवलदार समुहाचा म्हणजेच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम या खाजगी संघटनेचा कॉर्पोरेट अजेंडा आहे. या लसीकरण कार्यक्रमाचा समावेश २०१५ सालीच ‘युनो अजेंडा-2030’ मध्ये करण्यात आलेला आहे. जो अजेंडा १९३ देशांनी अधिकृतपणे स्विकारला आहे. हा अजेंडा पुर्णत्वास नेण्यासाठी जे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स (SDGs) ठरविण्यात आले आहेत त्यातील १७ पैकी १४ गोल्समध्ये वॅक्सीनेशन अनिवार्य केले आहे. यावरुन स्पष्ट होते की ‘वॅक्सीनेशन अभियान’ हा ‘अजेंडा 2030’ मधील सर्वात मुख्य कार्यक्रम आहे. म्हणूनच हे विविध वॅक्सीनेशनचे अभियान सन २०३० पर्यंत सक्तीने चालवले जाणार आहे. हा वॅक्सीनेशन अजेंडा लोकांनी थांबविल्याशिवाय अजिबात थांबणार नाही. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम हा अजेंडा वर्ल्ड बँक, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन अशा जागतिक संस्थांच्या माध्यमातून आणि विविध देशांतील सरकारांना आपल्या दावणीला बांधून जगभरात राबवित आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.