धर्म आणि नामांतराचे राजकारण

0 196

धर्म आणि नामांतराचे राजकारण
___________________________________________
राजू बोरकर
मु. पो. ता. लाखांदूर
जि. भंडारा
७५०७०२५४६७
__________________________________________
राज्यातील आणि देशातील जी धार्मिक स्थिती आज बघायल मिळते आहे ती लक्षात घेता कुणाला काय हवे आणि काय मिळते आहे, हे विचार करून बघण्याची वेळ आलीय. मला प्रवासादरम्यान काही अनुभव आलेत. ते अनुभव सुखद होते. म्हणून ते तुमच्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न करतो आहे. एकदा मी पुण्याला चार चाकी गाडीने जायला निघालो. अर्थात त्यासाठी समृद्धी महाममर्गाला.प्रथम पसंती दिली. समृद्धी महामार्ग त्यावेळी एक कुतुहूलचा विषय होता. जाताना हा मार्ग बघता येईल, लवकर जाता येइल असं मनात होतं . नागपूरपासून हा प्रवास कारंजा लाड पर्यंत झाला आणि अचानक बैटरी फुटली. महामार्गावर वर्दळ तशी फार नव्हती. मोजक्या गाड्यांची ये जा सुरू होती. त्यातही वेगात गाड्या असल्याने काहींनी मदत केली नाही.काही वेळाने चार पाच तरुणांनी मदतीसाठी गाडी थांबविली . मदत केंद्राला त्यांनीच फोन केला. माझ्या छोट्या मुलीला चिप्स पाॅकेट ,मुंग डाळ पाॅकेट आणि पाण्याची बाटली दिली. मदत केंद्रातून चार तरुण आले. त्यांनीही माझ्या मुलीला पोळी भाजी दिली.

प्रसंग दुसरा – आज चंद्रपूर जिल्ह्यातील काही प्रेक्षणीय स्थळं बघायचे म्हणून दहा/बारा दिवसांपूर्वी चिमूर मार्गे निघालो रामदिघी हे प्रेक्षणीय स्थळ बघुन पुढे जवळ पडेल ते स्थळ बघायचे असं ठरलं . पण चिमूर आणि शंकरपुरच्या मध्ये गाडी बंद पडली. ह्यावेळी डिझलमोटार-बिघडली. दोनही बाजूला, लगेच जाता येणं शक्य नव्हतं. गाडी जिथे बंद पडली. तिथे
बाजुच्या शेतात चार तरुण मुलं फिश पाॅंड तयार करण्याच्या कामात व्यस्त होते. त्यांनी जवळ येऊन चौकशी केली. त्यांनी गाडीला लागणारे सामान आण्यासाठी स्वतःची बाईक दिली. चिमूरला जाऊन सामान आणलं. पण गाडी सुरू झाली नाही त्यांनी त्यांच्या मालकाला फोन लावला. ते फोरव्हीलरने आले. आमची -अडचण जाणून घेतली. आता गाडी दुरुस्त होऊ शकत नाही आणि पुढचा प्रवासही शक्य नाही म्हणून परतीचा प्रवास करावा लागणार होता. पण बसस्थानक लांब होतं. त्या मुलांच्या मालकाने त्यांच्या गाडीने आम्हाल बस स्थानकापर्यंत सोडून दिलं . त्या दरम्यान असं लक्षात आलं की ते फार श्रीमंत व्यक्ती होते . शंभर एकर जमीन असल्याचं त्यांनीच सांगितलं. एवढा श्रीमंत माणूस पण त्यालाश्रीमंतीचा कुठेच गर्व दिसला नाही. ठाकरे त्यांचं आडनाव त्यांनी सांगितलं . मी माझे आडनाव बोरकर असं सांगितलं पण कोणती जात? कोणता धर्म ? असल्या फडतुस प्रश्नांच्या चौकशीत ते अडकले नाहीत. काम करणारी चार मुलं , त्यांचे मालक ठाकरेसाहेब हे आणि समृद्धी महामार्गावरील मदत करणारे हे तरुण या सर्वांनी जात आणि धर्म मल़ा विचारला नाही. अनेकदा अपघात होतात. तेव्हा मदत करणारे अपघातग्रस्तांची जात आणि धर्म अशा चौकशीत न अडकता आपल्यातील माणूसकीचं दर्शन घडवतात. हे अनेकदा लक्षात येतं . असा अनुभव तुमच्यापैकी अनेकांना आला असेल. मला हेच सुचवायचंय, की लोकांच्या मनात जात धर्म ह्या कल्पना बोथट झाल्या आहेत. त्यांना सामाजिक ऐक्य हवे आहे. मी सांगितलेल्या काही प्रसंगातून ते लक्षात येतं . तर मग राजकारण धर्माशिवाय का होत नाही?स्व्त:ची राजकीय पोळी भाजून घेणारे सामान्य जनतेला ‘आपसात लढवतात, आणि मग आपल्यातील काही लोक जीवणातून उठतात. सध्याचं राजकारण हे धर्म आणि जातीवादात फार अडकलं आहे. आपल्या समस्या वेगळ्याच आहेत, कित्येक जिल्हा परिषद शाळा बंद पडल्या आहेत. उदयाचंभविष्य अंधकारमय झालं आहे. एकीकडे मराठा शाळा बंद पडतात. आणि नेते दुकानाच्या पाट्या मराठी लावण्याचा आग्रह धरतात. आणि काही बिनडोक लोक त्यांच्या सुरात सुर मिसळतात. एखादयाचं पोट दुखलं तर मेडिकल एण्ड जनरल स्टार्स लिहिलं आहे म्हणून तिथे तुम्ही गोळी घेणार नाही आणि औषधालय अशी मराठी पाटी शोधत फिराल का? एखाद महाभाग असा असेलही! पण मला वाटतं अनेक जन औषधालय अशी मराठी पाटी लावलेलं दुका शोधण्याच्या भानगडीत न पडता मेडिकल एण्ड जनरल स्टोर अशी पाटी असलेल्या दुकानातून पोट दुखण्याची गोळी घेतील. कारण पोट दुखणं थांबनं हे महत्वाचं आहे. किंवा दुसऱं उदाहरण घ्या. तुम्ही एखाद ठिकाणी अडलात रात्रीचा स्वयंपाक करायचा आहे .तांदूळ घ्यायचे आहेत आणि किराणा स्टोर असं लिहलयं म्हणून तिथे तांदूळ, डाळ विकत न घेता उपाशी रात्र काढणार का ? रेस्टारेंट लिहलयं म्हणून जेवणार नाही का? इथे एखाद महाभाग जाणार नाही कदाचित! कारण डोक्यात भरलेलाभुसा मेंदूच्या जागेवर आहे. शहराचे नावंबदलण्याचा सपाटही असाच सुरु आहे. माझा तुम्हाला असा प्रश्न आहे की, संभाजीनगरचे औरंगाबादब हे नाव होतं तेव्हा एखाद हिंदू तहसीलदाराने, जिल्हाअधिकाऱ्याने, ठानेदारांने औरंगाबाद मुसलमानांच्या
नावावर शहर आहे म्हणून तिथे नोकरी नाकारलीय का ? नागपूरच्या माणसाने औरंगाबाद हे मुसलमानांच्या नावावर शहर आहे म्हणून औरंगाबादला मुलगी दिली नाही का? तिथला जावई करुन घेतला नाही का ? मुलीने ते शहर मुसलमानाच्या नावावर आहे म्हणून लग्न नाकारलंय का? आणि आता संभाजी नगर असं नाव झाल्याने काय फरक पडलाय ? पूर्वीही तिथे सर्वांनी नोकरी केलीय. नागपूर औरंगाबाद ची सोयरीक जात धर्माने तेव्हाही नाकारली गेली नाही . आणि आताही नाकारली जात नाही. मग शहरांची नावे बदलुन दुकानांच्या मराठी पाट्या बदलुन कोणते जनतेचे प्रश्न राजकारण्यांनी सोडवीलेत? नाव बदलण्याच्या कामात तरुण पिढी बर्बाद होते आहे.
नारेबाजीत घसा कोरडा करून नेत्यांसाठी घाम गाळणारे तरुण हातासाठी काम मागत नाही. आणि राजकारण्यांना ह्या तरुणांच्या हातात बैनर, सतरंज्या दऱ्या आणि झेंडे देण्याशिवायदुसरे काम नाही. त्यातही ही तरुण मंडळी कोणता झेंडा घेऊ हाती ? ह्या प्रश्नातच अडकली आहे. त्यांना कधी भाषा, काही धर्म तर कधी नामांतर हेच प्रश्न महत्वाची वाटतात. औरंगाबादचं संभाजीनगर असं नामांतर झालं तेव्हा फटाक्यांची अतिशबाजी करणारे आणि चौकात नाचनारे तरुण आपल्या चुलीचा धुर निघतो की नाही ? आज चुल पेटणार की नाही? माय बापांच्या डोळ्यांतील आपल्या विषयी बघितलेलं स्वप्न फुलणार की नाही’ अशा पश्नोत्तरातून अगदीचं मुक्त आहेत. गायी म्हशीचे ट्रक अडवून गोभक्ती व्यक्त करण्यात ते धन्यता मानतात आणि राजकारणी हीच संस्कृती असल्याच्या बाता झोडतात.तरुण धर्मात गुरफटलाय. तो कधी विचार करत नाही. पूर्वी पोलिसाचा मुलगा बापाच्यानंतर पोलीस ही हक्काची नोकरी करायचा.पोलिस भरतीत त्याला काही सवलती होत्या . आज पोलिसाच्या मुलाल पोलिस होणं तेवढ शक्य नाही. कारण भरत्या थांबल्याआहेत.जोखमीचे काम कमी मजूरीत होमगार्ड करतायत.तिकडे देशाची सुरक्षा वाऱ्यावर येणार. तिथे अग्नीविर नेमनं सुरु आहे. कवडीमोलाने तरुणांचे कष्ट सुरक्षेवर चार वर्षे घेतले जातील. आता जवळपास सौनिक भरत्या बंद होऊ शकतात. कारण जेवढे सैनिक निवृत्त होतील तेवढे अग्नीवीर प्रशिक्षित करून सिमेवर तैनात केले जातील. ना जीवाची हमी ना पगाराची हमी अशी देशसेवा इथल्या बहुजनांकडून केली जाणार. देश अशा अनेक प्रश्ननी ग्रासले आहे. शिक्षण महाग झालंय. मराठी शाळा बंद पडतायत. आणि मराठीचे ठेकेदार मराठी भाषेचे गोडवे गातायत, आणि आपले तरुण घोषणाबाज आहेत. आपण मराठी बोलतोय की हिंदी, इंग्रजी . किंवा आनखी अन्य ह्या प्रश्नांचा भुकेचा संबंध नाही.पोट ,भुक हया प्रश्नात गुंतून जात नाही. त्यासाठी दानापानी लगतो. आणि त्यासाठी क्रयशक्ती असावी लागते. विकत घेण्याची ताकत असावी लागते . पैसा ही विकत घेण्याची ताकत आहे. पण पैसा येण्यासाठी हाताल काम हवं. नोकरी आणि व्यवसाय हवा. आणि दुर्दैव असं आहे की राजकारणी हाताला काम देत नाहीत.ह्या साऱ्या प्रश्नांची तक्रार करु नये म्हणून रेशन दुकानात मोफत रेशन देण्याची सुविधा केली. आणि आर्थिक शर्यतीतुन बाद केलं . पेट्रोल डिझेल वाढलं आणि गॅस वाढली की मिलीजुली सरकार जिंदाबाद मुर्दाबाद च्या घोषणा देतात. तिथेही घोषणेसाठी हा तरुण तयारच असतो. पण ज्यावेळी पेट्रोल डीझेल गॅस वाढतो त्यावेळी औषधांच्या २०/१० टक्के किंमती वाढून येतात. किती नेत्यांनी आवाज उठवलाय? ईथे तरुणही निवांत असतो . आपले प्रश्न वेगळे आहेत. धर्म आणि पुजा हे सर्वांचा घटनादत्त अधिकार आहेत. ती वैयक्तिक बाब आहे परंतु देव्हाऱ्यातील देव आणि घरातील धर्म रस्त्यावर आणून देशातील तरुणांची माथी भडकवण्याचं काम सध्या नेते मंडळी करतायत. मी दोन घटनांतील माझा अनुभव सांगितलाय . दैनंदिन जीवनात लोक सहकार्याच्या भावनेने राहतात. एकमेकांना मदत करतांना जात आणि धर्म विचारत नाहित. त्यामुळे नेत्यांच्या गुलामगिरितुन तरुणांनी मुक्त झाले पाहिजे. बिहारमधुन मुंबईला कामा करण्यासाठी आलेल्यांना परप्रांतीय म्हणनाऱ्यांनी परप्रांतीय शब्दाची व्याख्या सांगावी. देशाच्या अखंडतेशी त्याचा काय परिणाम होईल तेही स्पष्ट करावं. कार्ल मार्क्स धर्म ही अफुची गोळी आहे असं म्हणतो. नेते ही कदाचित असचं काहिसं मानतात. म्हणूनच धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्या नेत्यांची संख्या वाढत चाललीय. मराठी शाळा बंद पडत असल्या , नोकऱ्या संपत चालल्यात तरी बियर बार आणि देशी दारुची दुकानं वाढत चाललीत. नामांतर, जात आणि धर्माची नशा ह्यातून माणसं मुक्तच होवू नये म्हणून राजकारण्यांचे प्रयत्न सलग सुरु आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आता अहमदनगरचं नामांतर तरुणांच्या डोक्यात भरलं जातंय. अगदी काही दिवसांपुर्वी विनायक दामोदर सावरकरांची जयंती साजरी करण्यासाठी अहिल्याबाई होळकर आणि सावित्री मायींचा पुतळा हटविण्यात आला होता. पण धर्माच्या नशेत आकंठ बुडालेल्यांना ते कसं दिसेल! ते सारे नशेखोर शुद्धीवर येण्याची मी वाट बघतोय. न्याय, समता आणि बंधुत्वाची स्वप्न घेऊन…..

Leave A Reply

Your email address will not be published.