मी लस घेणार नाही!

0 39
मी लस घेणार नाही!

 

रचना ©
संविधानाच्या पडद्याआड संघोट्यांचा लिंबू या पुस्तकाचे लेखक
नवनाथ दत्तात्रय रेपे

 

सरकार वारंवार म्हणतय लस घे लस घे
मी म्हणतो फक्त पंधरा लाख दे लाख दे
सरकार वारंवार बांध मास्क म्हणतं तोंडाला
मी म्हणतो मास्क बांधुन काय खाऊ पोटाला ?

 

 

सरकार म्हणत धुवा साबण सँनिटायझने हात
मी म्हणतो तुम्हीच लावली ओ देशाची वाट
सरकार म्हणते दोन फुट अंतराची ठेवा दुरी
मी म्हणतो दोन फुटावरून कसा करेल कारभारी

 

सरकार म्हणत लस घ्या नका ठेवू अफवावर विश्वास
मी म्हणतो लस चांगली यावर नाही माझा विश्वास
सरकार म्हणत तांदुळ गहू दाळ घ्या फुकट
मी म्हणतो सरकारी योजना द्या ना सरसकट
सरकार म्हणतय लस आहे बंधनकारक
तर न्यायलय म्हणते लस नाही हो बंधनकारक
तरीही डाँक्टर लस लोकांना ठासत आहेत
मग लोक पण लस दिलेली जागा घासत आहेत

 

रेल्वे प्रशासन म्हणतेय लस घ्यावीच लागेल
टिसी म्हणतोय कोवीड टेस्टची पावतीच लागेल
सरकार लोकांना जे पाहीजे ते देऊच शकत नाही
म्हणून मी माझ्या घरच्यांना लस घेऊच देत नाही
(सदरील कविता ही १७ आॅगस्ट २०२१ रोजी लिहीलेली आहे.)
Leave A Reply

Your email address will not be published.