कृषीमंत्र्याच्या गावात शेतकऱ्यांची सर्रास पणे लुट – एमआरपी ८६४ रु. ची बॅग १३०० ते १४०० रुपयाला

0 52

कृषीमंत्र्याच्या गावात शेतकऱ्यांची सर्रास पणे लुट

– एमआरपी ८६४ रु. ची बॅग १३०० ते १४०० रुपयाला

– बी बियाणे चड्या भावाने विक्री करणाऱ्या दुकानावर तात्काळ कारवाई करुन शेतकऱ्याची होणारी लूट थांबवा अन्यथा आंदोलन करणार
तालुकाध्यक्ष देवराव लुगडे महाराज

परळी : कृषी मंत्र्यांच्या होम ग्राउंड परळी मध्ये शेतकऱ्यांची अतोनात लूट सध्या चालू असुन ही लूट तात्काळ थांबवा अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) तालुकाध्यक्ष देवराव लुगडे महाराज यांनी दिला आहे. सध्या पेरणीची लगबग सुरू झाली असून शेतकऱ्यांची बी बियाणे खरेदी करण्यासाठी दुकानापुढे रांगा लागल्या असून याचाच फायदा घेत दुकानदार कापसाची एमआरपी 864 रुपयाची बॅग 1300 ते 1400 रुपयाला शेतकऱ्यांना विक्री करून 864 रुपयाची पावती देत आहेत व शेतकऱ्यांकडून वाढीव प्रति बॅग 864 च्या वर 500 ते 600 रुपये मिळून 1300 ते 1400 रुपये घेत आहेत ही बाबा अत्यंत गंभीर असून ही शेतकऱ्यांची लुट तात्काळ थांबवावी अन्यथा परळी तालुक्यातील शेतकऱ्यांना सोबत घेऊन लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुकाध्यक्ष देवराव लुगडे महाराज यांनी दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.