वयोवृद्धांच्या हाती नोटा; तरुणांच्या हाती दंगलीचा गोटा

0 126

वयोवृद्धांच्या हाती नोटा; तरुणांच्या हाती दंगलीचा गोटा

 

बीड : एकीकडे सुशिक्षित बेरोजगार तरुण नौकरीच्या शोधात आहे त्याच्या हाताला काम मिळत नाही. मात्र दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये रिक्त असलेल्या जागेवर सेवा निवृत्त शिक्षकांची कंत्राटी तत्वावर तात्पुरत्या स्वरुपात नियुक्ती करण्याचा राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे तरुणांमध्ये प्रचंड चिड निर्माण झाली असून ते वयोवृद्धांच्या हाती नोटा; तरुणांच्या हाती दंगलीचा गोटा या सरकारचे धोरण आहे असे म्हणताना दिसत आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने काढलेल्या परिपत्रकात सांगितले की, राज्यातील सर्व शाळा ह्या जून महिन्यात सुरु झालेल्या असून जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच, नियोजित शिक्षक भरती संदर्भात मा. उच्च न्यायालयात दाखल रिट याचिकांमुळे भरती प्रक्रीयेस विलंब होत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. या सर्व परिस्थिती विचारात घेऊन पवित्र प्रणालीमार्फत नियमित शिक्षक भरतीमधून शिक्षक उपलब्ध होईपर्यंत, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळांतील व खाजगी शिक्षण संस्थांच्या अनुदानित शाळांतील सेवानिवृत्त शिक्षकांमधून कंत्राटी तत्त्वावर तात्पुरत्या स्वरुपात जिल्हा परिषद शाळांतील रिक्त शिक्षकीय पदे येणार आहेत.
राज्य सरकारकडून या शिक्षक भरतीसाठी कमाल वयोमर्यादा ७० वर्ष अशी केली आहे. या सेवा निवृत्ती शिक्षकांना प्रतिमहा मानधन रु.२०,०००/- (कोणत्याही इतर लाभाव्यतिरीक्त) मिळणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्यावतीने शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्याशी करारनामा स्वाक्षरीत करणे आवश्यक असणारं आहे. तसेच बंधपत्र / हमीपत्र: नियुक्तीच्या कालावधीत करार पध्दतीने शिक्षकीय पदाचे विहीत काम पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित व्यक्तीची राहणार असून आशयाचे बंधपत्र / हमीपत्र द्यावे लागणार आहे.
शालेय शिक्षण विभागातील रिक्त जागा तात्काळ भराव्यात या मागणीसाठी अनेक वर्षांपासून आंदोलने निदर्शने करणा-या तरुणांसाठी हा शासन निर्णय म्हणजे धोक्याची घंटा असल्याचं सांगितलं जातं आहे. उच्चशिक्षित तरुण नोकरीच्या शोधात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना दरवर्षी दोन कोटी तरुणांना नोकरी देऊ असं सांगितलं होते, आता मात्र तरुणांना दंगलीसाठी प्रवृत्त करून हाती दगड गोटे दिले आहेत तर दुसरीकडे वयोवृद्ध निवृत्तधारकांना नोकरीच्या संधी निर्माण करून हाती मानधनाच्या नोटा दिल्या जात असल्याने तरुणांमध्ये प्रचंड चिड निर्माण झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.