झेंडेबहाद्दरांच राजकारण

0 137

झेंडेबहाद्दरांच राजकारण

किरण रोहिदास मराठे
मो. 8408808924

आज आमच्या मुख्यमंत्र्यांची रिक्षा धुळे दौऱ्यावर आहे. परंतु त्यापैकी रिक्षाचे एक चाक मागेच राहिले आहे. म्हणून शंका घेण्यास मोठा वाव आहे. कारण, पुढचे जे मुख्य चाक आहे तेच नाही , मागील बाजूचे दोन चाक आलीत खरी परंतु मुख्य चाक मागे का राहिले ? यावरून कुछ तो गडबड हैं दया. उपमुख्यमंत्री उर्फ गृहमंत्री हे धुळे दौ-यास उपस्थिस राहिले नाही हा विषय काही साधा सुधा नाही. मगाशी मी किल्ले लळिंग समिती कार्यकर्त्यांच्या भावना समजल्या आणि त्या योग्यही होत्या की, एकाच ठिकाणी एकाच वेळी उपस्थित राहायचे होते. तर मग वेगवेगळ्या दोन हेलिकॉप्टरने प्रवास करत जनतेच्या पैशाची उधळण कश्यासाठी तोच पैसा तुम्ही गड संवर्धन समितीला दिला असता तर. संपुर्ण महाराष्ट्राचे आराध्यदैवत शिवरायांच्या गड किल्यांच्या संवर्धनासाठी निधी प्राप्त झाला असता तर महाराजांनाही आनंद झाला असता. माझा जीव की प्राण असणारे माझे गड किल्ले माझे मावळे त्याचे रक्षण व संरक्षण करीत आहेत त्याचा अभिमान द्विगुणित झाला असता. परंतु दुर्दैव महाराजांचे नाव फक्त मतांपुरते मर्यादित झाले आहे. दुसरी गोष्ट आज शहराच्या चौका चौकात नेत्यांपेक्षा लक्ष वेधत होते ते म्हणजे राजकीय पक्षांचे झेंडे ……
चला तर…थोडे झेंड्याबद्दल पहिला झेंडा घेऊ तो भाजपचा कमळचा मालक जे दिल्लीत बसुन आपल्या १०५ कर्मचाऱ्यांचा मुकादम अगोदर फौजदार पदावर कार्यरत होते. त्यांच्या मदतीने दगाबाजी करून आपल्या जुन्या मित्राचा धनुष्यबानाशी विश्वासघात करत त्यांचा पक्ष,चिन्ह,झेंडा आणि काही विकाऊ कर्मचारी विकत घेतले असे जवळजवळ ५० +१०५ आणि इतर १० ते १५ असे मिळुन १७० चा आकडा जुळवत अगोदरच्या फौजदाराला बढोतरी(खच्चीकरण)करत हवालदार तर साध्या कारणुकाला नामधारी फौजदार(मुख्यमंत्री) केले. सर्व चालु असताना वेळेचा अनुभव असणारा घड्याळाचा बलाढ्य झेंडा मालकाचा मॅनेजर व सुपरवायजर यांच्या मदतीने आणखी ३५ कर्मचारी मॅनेजर ला फौजदार पदाची(मुख्यमंत्री) लालसा देत आपल्या बाजुने घेतले परंतु यांच्या झेंड्याची करामत वेगळीच या घड्याळाचा झेंड्याचा मालक हुशार निघाला तो म्हणतो माझा पक्ष,झेंडा,चिन्ह आणि माझा फोटो मी अजिबात कोणाला देणार नाही. यांचा आणि माझा काहीच संबंध नाही.मी नवीन कर्मचारी भरणार येणाऱ्या लोकशाहीच्या कुंभमेळ्यात शेवटचा झेंडा मालक म्हणजे मुरलेला येथेच घोळ झाला कारण अगोदरच विना कोळशाने चालणारे डबल इंजिन आता पंक्चर चाकाला घेऊन रिक्षातर सजवली. परंतु कमळावर प्रेम करणारे खरे मालक म्हणजे त्यांचे पारंपरिक मतदार व वैचारिक नाळ जोपणारे कार्यकर्ते प्रचंड नाराज झाले आहेत. तोच प्रकार धनुष्य बाण वर प्रेम करणारे खरे मालक व मतदार यांचा अगोदरच आक्रोश आहे त्यातच ना नेता,ना झेंडा,ना पक्ष काहीच नाही कुठलाही विचार न करता आपली विचारधारा विकायला निघाले,घड्याळाचा मालकाचे संपुर्ण ६० वर्षाचे आयुष्याचे नाव बदनाम करायला निघाले. तर…,आपला विषय झेंड्याचा होता तर कुठला झेंडा कोणाशी मेळ खात आहे. तर कुठला अजिबातच कुठलाही दिशेने पाहिला तरीही मेळ खात नाही. म्हणून चौका चौकात लावलेले सर्व पक्षीय झेंडे पाहून मतदार व जनता जनार्दन यांची सेवा करण्याचे आव आणण्याचे नाटकं करणारे ह्या झेंडा वाल्यांची जनतेचे मनात प्रंचांड चीड निर्माण झाली आहे एवढे मात्र नक्की.

Leave A Reply

Your email address will not be published.