शुध्द बुद्धीवादी बुध्द धम्म

बौद्ध धर्म हे धार्मिक सामाजिक आणि बौध्दीक गुलामगिरीच्या विरूद्ध क्रांतीकारक बंड आहे.

1 488
‘शुध्द बुद्धीवादी बुध्द धम्म

 

नवनाथ दत्तात्रय रेपे
भट बोकड मोठा या पुस्तकाचे लेखक
मो. ९७६२६३६६६२

 

नाशिक जिल्ह्यातील येवला येथे १३ ऑक्टोबर १९३५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो, तरी हिंदू म्हणून मरणार नाही, अशी घोषणा केली अन त्यानंतर तब्बल २१ वर्षानंतर नागपूर येथील दीक्षाभूमीवर १४ ऑक्‍टोबर १९५६ ला लाखो अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. त्यामुळेच येवला मुक्तीभूमी धर्मांतराचा पाया, तर नागपूरची दीक्षाभूमी हा कळस मानला जातो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पवित्र दीक्षाभूमीवर समता तसेच सामाजिक क्रांतीची मुहूर्तमेढ रोवली आणि त्यामुळेच संपूर्ण समाज प्रगतीपथावर अग्रेसर होऊ शकला. ही दीक्षाभूमी अवघ्या विश्वासाठी त्याग, शांती आणि मानवतेची प्रेरणा देणारी आहे. बाबासाहेबांनी आपल्या या अनुयायांना धम्मदीक्षेपूर्वी स्वतःच्या २२ प्रतिज्ञा दिल्या. एकाच वेळी आणि शांततामय मार्गांनी घडून आलेले बौद्ध धर्मांतर जगाच्या इतिहासातील सर्वात मोठे सामूहिक धर्मांतर होते. बाबासाहेबांनी दीक्षा घेतल्यानंतर या स्थानाला महत्त्व प्राप्त झाले. बावीस प्रतिज्ञांना ‘धम्म प्रतिज्ञा’, ‘डॉ. आंबेडकरांच्या प्रतिज्ञा’, ‘बौद्ध प्रतिज्ञा’, ‘नवबौद्ध प्रतिज्ञा’ किंवा ‘नवयानी प्रतिज्ञा’ असेही म्हटले जाते.
राजेंद्रपाल गौतम हे दिल्लीच्या विधानसभेचे सदस्य आहेत. ते अनुसूचीत प्रवर्गातील असून आम आदमी पार्टीचे सदस्य व आमदार आहेत आणि ते दिल्लीच्या सीमापुरी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. ते दिल्ली सरकार मधे समाजकल्याण मंत्री होते. दिल्लीला ०५ ऑक्टोबर २०२२ म्हणजे अशोक विजयादशमीला १० हजार लोकांनी राजेंद्र पाल गौतम यांच्या उपस्थिती मध्ये बौध्द धम्माची दीक्षा घेतली. त्यावेळी २२ प्रतिज्ञा घेतल्या. तोच राजेंद्र पाल गौतम यांच्या विरोधी लोकांनी राजेंद्र पाल गौतम यांच्यावर हिंदू देवतांचा अपमान केल्याचा आरोप करत त्यांच्या विरोधात आंदोलन केले. हा प्रचंड विरोध बघून राजेंद्र पाल गौतम यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. (बुद्धीष्ट भारत १० आक्टो २२) केजरीवाल यांचा गुजराती माॅडेलप्रमाणे डंका वाजवत प्रसारमाध्यमांनी बहुजन समाजासमोर एक बागुलबुवा उभा केला पण हा व्यक्ती खरच बहुजनवादी व क्रांतीकारी आहे का ? तर याच उत्तर नाहीच असं येईल. कारण केजरीवाल म्हणतात की, ‘मी संघाच्या विचारधारेतून आलो’ हे त्यांच एक जूने वक्तव्य मा. बी.जी. कोळसे पाटील लोकांना सांगून केजरीवाल यांचा खरा चेहरा उघडा पाडतात. त्यामुळे जसा काॅग्रेस सापनाथ व भाजप नागनाथ आहे तसाच आप हा पक्ष या दोघांचं नवीन विषारी वर्जन आहे असं म्हटलं तर चुकीचे काय ? म्हणून तर बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम म्हणतात की,  केजरीवाल व भाजपच्या विचारधारेत काहीच अंतर नाही. कारण ब्राम्हणवादी लोकांना आपल्यासोबत घेण्यासाठी यांची स्पर्धा आहे. राजपाल गौतम यांचा दोष असेल तर तो ब्राम्हणवादी केजरीवाल यांच्यासोबत आहेत हाच आहे. राजेंद्रपाल यांचा भ्रम झाला की, केजरीवाल क्रांतीकारी आहे पण तो त्यांचा भ्रम आहे. https://youtu.be/9HX1vMWKuxo
डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अनुयायांना ज्या २२ प्रतिज्ञा दिल्या यात स्वतंत्र्य भारतात काहीच वाईट किंवा कोणाच्या भावना दुखावत नव्हत्या मात्र आताच का दुखत आहेत ? यामागचे कारण असे की, लोक आता सरस्वती व ब्रम्हदेवाचे गबाळ उघड पाडून त्यांना नागडं करताना दिसत आहेत तर ‘रामायणातील सत्य’ या पेरियार रामासामी यांच्या पुस्तकाचे संदर्भ देऊन रामाचा विकृतनामा लोकांपुढे मांडून नंतर  मी ब्रह्मा, विष्णू, महेश, व राम कृष्ण यांना देव मानणार नाही ही डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली प्रतिज्ञा प्रतिगामी बांडगुळाच्या तोंडावर भिरकावत आहेत. त्यामुळे भेदरलेल्या अवस्थेत असलेली प्रतीगामी श्वान पुच्छ लोक जीवाचा जळफळाट करून घेताना दिसतात. कारण त्यांना त्यांचा पृष्ठभाग ठणका देतो. पण त्यांच्या ठणकावर एकमात्र जालिम उपाय म्हणजे बुद्ध तुकोबा शिव फुले शाहु पेरियार आंबेडकर आणि अण्णाभाऊ यांच्या विचारांचे टाॅनिक आहे ते प्रत्येकाने प्राशन केलं पाहीजे. हे टाॅनिक प्राशन करणारा व्यक्ती माणसात आल्याशिवाय राहणार नाही. कारण विना विचारांचा माणूस आज तरी माणसात राहीलेला नाही. त्यामुळे महापुरुषांच्या विचारांचा अंगिकार करून त्याचा प्रचार प्रसार करा कारण विचारच माणसाला माणुसपण देऊ शकतात.
देवाच्या अवतारावर विश्वास नाही म्हटल्यास भटांनी अवतार रुपी स्थापलेली मंदीरे चालतील का ? गौतम बुद्ध हा विष्णूचा अवतार ठरवून दुकाने चालू केलेल्या लोकांना दुकान बंद करण्याची वेळ येईल. श्राद्धपक्ष व पिंडदान ही योजना जर समाजाने बंद पाडण्यासाठी नाकारली तर आजचे भटुर्डे काय वाटी वस्तरा घेऊन लोकांच्या बगला भादरतील का ? कोणतेही क्रियाकर्म ब्राह्मणाच्या हातून करून नाही घेतल्यास विदेशी ब्राम्हणांना देशातून काढता पाय घ्यावा लागेल याची भिती भटुर्डांना सतावत आहे. मनुष्यषांना असमान ठरवून त्यांना साडेसहा हजार जातीत विभागून आपल्या जातीयवादी नरकनदीच्या पाटाचे पाणी प्राशन करण्यास भाग पाडले. जातीयवादाला खतपाणी घालणा-या भटांना सर्व मनुष्यमात्र समान आहेत हे कसे पटणार आहे ? विषमता प्रस्थापीत करणा-या भटांना इथे समता प्रस्थापित झालेली चालणार तरी आहे का ? ज्यांच्या बापजाद्यांनी कालपर्यत गायी कुत्रे मांजर कापून खाली त्यांच्यासोमर जर कोणी प्राणी मात्रावर दया करताना दिसले तर थोडीच या विदेशी भटांना चांगले वाटणार आहे. विजय माल्या, निरव मोदी यांच्यासोबत ज्या राजकीय दलालांचे हात काळे झालेले आहेत त्यांच्यासोर जर कोणी मी चोरी करणार नाही अशी शपथ घेत असेल तर या विदेशी श्वानांना थोडेच ते सहन होणार आहे. ब्राम्हणांनी जे देव आम्हा बहुजनांपुढे मांडले त्यातील नव्वद टक्के व्यभिचारी व कामलंपट आहेत ? त्यांच्या जीवावर ब्राम्हणांनी लाखो रुपयांचा मलीदा लाटला ते प्रतीग्यामांचे माणवभक्षक किडे मी व्याभिचार करणार नाही असं कशाला म्हणून घेतील ? २०१४ साली लोकांना खोटी आश्वासने व खोटी स्वप्ने दाखवून ज्यांनी सत्ता स्थापन केली, त्यांना लोकांनी खरे बोलण्याची घेतलेली शपथ चालेल का ? घरोघरी दारू पोहोच करण्याचा व दारूच्या बाटलीला बाईचे नाव द्या म्हणणा-या सडक्या किड्यांसमोर लोकांनी दारू सोडण्याची शपथ घेतल्यास सोमरस प्राशन करणा-या किंड्यांच्या मस्तकात जाळ का होणार नाही ? हिंदुराष्ट्राची स्वप्ने पाहणा-या लोकांना बौद्ध धम्माची घेतलेली दिक्षा व त्यांचे प्रसारमाध्यमांनी दाखवलेले व्हिडिओ बघावे वाटतील का ? मनुष्यापेक्षा प्राण्यांना हिंदू धर्मात चांगले स्थान  आहे पण हा धर्म त्यागून लोकांनी बौध्द धर्मात प्रवेश केला तर हिंदु धर्माच्या ठेकेदारांचे दुकान बंद होणार नाही का ? बौद्ध धम्मा म्हणजे शहाणपणाचा धर्म आहे असं प्रा. मा. म. देशमुख म्हणतात. (वाचा बौध्द धर्म आणि शिवधर्म) पण आमच्या लोकांना भटांनी काल्पनीक देवांच्या व दगडांच्या नादी लावून मलीदा चाखण्याचे काम केले म्हणून तर ‘असे हे धर्म’ या पुस्तकात भाई माधवराव बागल म्हणतात की, ‘दगडाने चालत्या बोलत्या माणसाला दगड बनवल’ याची लाज डोकं ठिकाणावर असलेल्या शहाण्यांना तरी वाटायला नको काय ?.’
दिल्लीत झालेल्या या कार्यक्रमानंतर अनेकांनी आपली प्रतिक्रिया दिली त्यात अभिनेते अरुण गोविल म्हणतात की, या पृथ्वीवर सध्या हे काय सुरू आहे. नागरिकांना अशी शपथ दिली जातेय की ब्रह्मा, विष्णू,महेश, हनुमान, राम यांचे आस्तित्व मान्य करू नका. काली, सरस्वती, दुर्गा यांची पूजा करू नका. राजकीय स्वार्थासाठी लोकांना असं काही सांगण्याचं काम पाल करत आहेत. पण जे शपथ घेत आहेत त्यांनी हा विचार करावा की, काय योग्य आणि काय अयोग्य आहे. राजकीय स्वार्थासाठी लोकांवर मतं लादू नका. लोकांनी याचा विरोध केला पाहिजे. जे हिंदू देवदेवतांना विरोध करत आहेत त्यांना त्यांचं स्थान माहिती नाही. गीतेची शपथ आजही न्यायालयात घेतली जाते, ती गीता सांगणाऱ्या कृष्णाचा हा अपमान आहे. (मटा १५ आक्टो. २०२२ ) काल्पनिक ग्रंथाचे आधार घेऊन काल्पनीक पात्रांचा अभिनय करणा-यांनी लोकांना अकलेचे डोस पाजू नयेत कारण लोकांना सत्य असत्याची ओळख होत आहे. तोंडातून मानव जातीची निर्मीती करणारा आमचा आदर्श होऊ शकतो का ? पेरियार रामास्वामी यांनी लिहलेले ‘रामायणातील सत्य’ हे पुस्तक वाचल्यास अभिनेते गोविल सांगतात त्यांच सर्व थोतांड उघड नागडं पडत. त्यामुळे आम्हाला याचे डोस घेणे आवश्यक वाटत नाही. सरस्वती व ब्रम्हदेवाचे प्रकरण लोकांना माहीत झाल्यास अभिनेते गोविल यांचं टाळक बहुजन समाज पायतानाने फोडल्याशिवाय राहणार नाही. ज्या लोकांनी शपथ घेतली आहे त्यांना सत्य असत्य समजते त्यामुळेच त्यांनी शपथ घेतली आहे, हे जर गोविल यांना कळत नसेल तर त्यांनी आपल्या अकलेचे प्रदर्शन घडवू नये. गीतेची शपथ न्यायालयात देऊन खोटं बोलण्याला बळकटी दिली जाते तो ग्रंथ बहुजनांच्या जीवनात काय घट्यांची प्रगती आणणार आहे ? कर्म करा पण फळाची अपेक्षा करू नका म्हणणारा ग्रंथ काय म्हणून आमच्या लोकांनी वाचावा ? त्यापेक्षा आम्हाला आमचे हक्क आणि अधिकार देणारे संविधान ग्रेट आहे. म्हणून तर भाई माधवराव बागल म्हणतात की, गीता, महाभारत, मनुस्मृती हे हिंदू धर्माचे आधारभूत ग्रंथ मानले जातात. पण ‘हिंदू धर्म ही बांधलेली इमारत नसून वाढलेले जंगल आहे.’
लक्ष्मण यादव म्हणतात की, ‘राम कृष्ण यांना देव माणायच की नाही हा अधिकार भारतीय राज्यघटना देते. गौतम बुद्ध विज्ञानवादी होते, कबीर व संत रवीदास पाखंडाच्या विरोधात होते. पेरियार रामसामी यांनी ईश्वराचे अस्तित्व नाकारले, भगतसिंग नास्तिक होते तर मग यांच्याबदल भारतीय जनता पार्टीची काय भुमिका आहे ?कारण विदेशात गेल्यास बुद्ध बुद्ध आणि देशात आल्यास युद्ध युद्ध असे भाजपचे वर्तन आहे.’ लक्ष्मण यादव यांनी जे सांगितले ते योग्य आहे कारण ‘नरेंद्र मोदी विदेशात गेल्यास तिथे ‘मैं राम कृष्ण परशुराम आसाराम की भुमी से आया हू ?’ असे किंवा ‘मैं दिनदयाळ उपाध्याय, हेडगेवार सावरकर, नथुराम की भुमी से आया हू ?’ असं तरी म्हणतात का ? मात्र हेच नरेंद्र मोदी विदेशात गेल्यास मैं बुद्ध की भुमी से आया हू! असं सांगतात त्यामुळे त्यांचा विदेशात सन्मान होतो नाहीतर दिनदयाळ उपाध्याय हेडगेवार गोळवलकर सावरकर यांना विदेशात विचारतो तरी कोण ? लोकांनी कोणता धर्म स्विकारावा यांचा अधिकार भारतीय राज्यघटनेने दिला आहे. त्यामुळे संघी मानसीकतेच्या लोकांनी इतरांना अक्कल शिकवू नये.’ कारण ‘असे हे धर्म’ या पुस्तकात भाई माधवराव बागल म्हणतात की, ‘देव हा पोटाचा धंदा बनविला आहे. देवाचे मालक म्हणजे हे भट, बडवे व गुरव. हे आपआपल्या देवाच्या पुराणाच्या भाकडकथा अज्ञ जनतेत पसरवून आपले गि-हाईक वाढवितात.’
‘हा ईश्वर कोण आहे. कसा अस्तित्वात आला या प्रश्नाला उत्तर नाही. कोणीही ईश्वराला पाहीलेले नाही. लोक फक्त ईश्वरासंबंधी बोलतात कोणीही असे सिध्द करू शकत नाही की ईश्वराने सर्व जग रचले. जग हे रचलेले नसून विकास पावलेले आहे. ईश्वरावर विश्वास ठेवण्यात काही लाभ नाही असं तथागत गौतम बुद्ध म्हणतात म्हणून शेवटी बहुजन समाजाला सांगावं वाटतं की, बुद्ध आणि त्यांचा धम्म समजून घ्या कारण बुध्द म्हटलं की, अनेकांच्या डोक्याबाहेरचा विषय वाटतो पण तो डोक्यात घ्यायचा विषय आहे हे विसरू नका. कारण तथागत गौतम बुद्ध व त्यांच्या धम्माविषयी अनेक विचारवंतानी आपले मत व्यक्त केले आहे. त्यात आचार्य भागवत म्हणतात की, ‘गौतम बुद्ध हा या देशातील पहीला संत होय….सर्व संतांच्या शिकवणीत कारुण्य हे श्रेष्ठ असून सर्व संतपणाची गंगोत्री गोतम बुद्ध होय.’ तसेच आचार्य जावडेकर म्हणतात, बुद्ध धर्म शुध्द बुद्धीवादी आहे, त्यात कोणत्याही अंधश्रद्धेला जागा नाही.’ तर ‘गौतम बुद्धाने नवविचाराच्या खड्गाने भिक्षुकी जीर्ण मताचा चक्काचूर केला….. बौद्ध धर्म हे धार्मिक सामाजिक आणि बौध्दीक गुलामगिरीच्या विरूद्ध क्रांतीकारक बंड आहे.

 

नवनाथ दत्तात्रय रेपे लिखित खालील पुस्तके घरपोहोच मिळतील

१. संविधानाच्या पडद्याआड संघोट्यांचा लिंबू

२. भट बोकड मोठा

३. डोळ्यात माणसांच्या फेकून धूळ गेला !

संपर्क – रुक्माई प्रकाशन, अंजनडोह (बीड)

मो. ९७६२६३६६६२

rukmaipub@gmail.com

1 Comment
  1. प्रमोद आनंद कांबळे says

    खूप खूप छान लेख आहे.जर देवांमध्ये इतकी ताकद असेल तर मग हरामी समाजकंटक विचारवंतांना मारण्यासाठी देवांचा का वापर करत नाहीत? दाभोळकर ,कलबुर्गी, गौरी लंकेश, गोविंद पानसरे यांना मारण्यासाठी मानवानेच बनवलेल्या पिस्तुलाचा का वापर केला?
    सगळं थोतांड आहे सचिन माळीने त्याच्या गीतामध्ये म्हटले ना
    33 कोटींचा देवांचा जथ्था,
    एखाचा बी लागेना पत्ता,
    हे थोतांड भीमाने हेरलव
    आम्ही देवार बाजूला सारलवं
    जय भीम 🙏🏻 नमो बुध्दाय.

Leave A Reply

Your email address will not be published.